ऑटो तंत्रज्ञान

सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार Storm R3 ची बुकिंग सुरू

या इलेक्ट्रिक कारला स्ट्रोम मोटर्सने बाजारात आणलं आहे. कारचं नाव Storm R3 असं आहे. कंपनीने भारतात कारच्या बुकिंगला सुरुवात केली आहे.

सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार Storm R3 ची बुकिंग सुरू

पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या दरामुळे सामान्य नागरिक त्रस्त आहे. गाडी चालवणं सुद्धा परवडत नसल्याचं अनेकांनी म्हटलं आहे. दरम्यान, पेट्रोल आणि डिझेलवरील गाड्यांना पर्याय म्हणून बाजारात इलेक्ट्रिक बाईक, कारचं आगमन झालं आहे. या गाड्या इलेक्ट्रीक गाड्यांना ग्राहकांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. दरम्यान, मुंबईतील एका स्टार्टअप कंपनीने ग्राहकांसाठी एक इलेक्ट्रिक कार आणली असून ही सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार मानली जात आहे.या इलेक्ट्रिक कारला स्ट्रोम मोटर्सने बाजारात आणलं आहे. कारचं नाव Storm R3 असं आहे. कंपनीने भारतात कारच्या बुकिंगला सुरुवात केली आहे.

Storm R3 ची प्री-बुकिंग मुंबई आणि दिल्ली-एनसीआरमध्ये केवळ १० हजार 

Storm R3 च्या लूक बद्दल बोलायचं झाल्यास या इलेक्ट्रिक कारला तीन चाकं आहेत. पण या कारला थ्री-व्हीलर जसा लूक दिला गेला नाहीय. थ्री-व्हीलर गाड्या आतात तसं एक चाक पुढे आणि दोन चाके मागे अशी या कारची रचना नसून या ठीक उलटी अशी रचान कारची आहे. आणि हेच या कारची सर्वात मोठी खासियत आहे. स्ट्रोम मोटर्सचं म्हणण आहे की, या कारची बुकींग पुढील काही आठवड्यांसाठी खुली राहील. पहिल्या ग्राहकांसाठी ५० हजार रुपयांपर्यंत फायदा मिळणार आहे. ज्यात कस्टमाइज्ड कलर ऑप्शन, प्रीमियम ऑडियो सिस्टम आणि तीन वर्षांपर्यंत फ्री मेन्टेनेंसचा समावेश आहे.

सिंगल चार्जमध्ये जवळपास २०० किमीचा पल्ला

कंपनीच्या दाव्यानुसार Storm R3 सिंगल चार्जमध्ये जवळपास २०० किमीचा पल्ला गाठू शकते. या कारमध्ये ४ जी कनेक्टेड डायग्नोस्टिक इंजन आहे. जे चालकाला ट्रॅक लोकेशन आणि चार्जचा स्टेटस सांगत राहते. कंपनीला विश्वास आहे की, स्ट्रोम आर ३ या टू-सीटर इलेक्ट्रिक कारचं या वर्षी बुकिंग पूर्ण झाल्यानंतर वितरण २०२२ पासून सुरू होईल. मीडिया रिपोर्टनुसार, कारची १६५ युनिट्स बुक झाली असून याचे मुल्य ७.५ कोटी रुपयांच्या जवळपास आहे. हा आकडा केवळ चार दिवसातील आहे.

फक्त दिल्ली आणि मुंबईमध्ये Storm R3 चे बुकिंग

सुरुवातीच्या टप्प्यात कंपनीने फक्त दिल्ली आणि मुंबईमध्ये स्ट्रॉम आर ३ चे बुकिंग सुरू केले आहे. परंतु लवकरच इतर शहरांमध्येही बुकिंग सुरू होईल. त्याची प्रारंभिक किंमत साडेचार लाख रुपये आहे. कंपनीचे म्हणणे आहे की, शहर परिसरात दररोज १० ते २० किलोमीटरच्या अंतरात प्रवास करू इच्छिणा-या लोकांना लक्षात घेऊन या कार निर्मिती करण्यात आली आहे. ही कार चालवण्याचा खर्च केवळ ४० पैसे प्रति किलोमीटर आहे. ही कार तीन प्रकारांमध्ये देण्यात येणार आहे.

स्ट्रोम मोटर्सची सुरुवात २०१६ मध्ये

स्ट्रोम मोटर्सची सुरुवात २०१६ मध्ये झाली होती. कंपनीचा प्लांट उत्तराखंडच्या काशीपुरमध्ये आहे. ज्याची उत्पादन क्षमता ५०० यूनिट्स प्रति महिना आहे. कंपनीने दावा केला आहे की रेग्यूलर कारच्या तुलनेत स्ट्रोम आर ३ चा मेंटेनन्स हा ८० टक्के कमी खर्चीक आहे.

आमच्या आणखी बातम्या पाहण्यासाठी क्लिक करा :webnewswala.com आमच्या सर्व बातम्यांसाठी फॉलो करा :फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | youtube | Sharechat | Copyright © Webnewswala All rights reserved.

Related posts

Door Step Banking आता घरपोच मिळणार बँकेच्या सेवा

Team webnewswala

चक्क आयफोनवर संपूर्ण ‘पिच्चर’ चे चित्रीकरण

Web News Wala

नवीन फिचर्स आणत Telegram ची Wats app ला टक्कर

Team webnewswala

Leave a Reply