Team WebNewsWala
मनोरंजन

बिग बॉस 14 मध्ये दोन नवे स्पर्धक करणार एण्ट्री

छोट्या पडद्यावरील वादग्रस्त पण तितकाच लोकप्रिय शो म्हणजे बिग बॉस. सध्या बिग बॉस 14 चे पर्व चर्चेत आहे. एकीकडे निक्की तंबोळी घरातून बाहेर पडली आहे

छोट्या पडद्यावरील वादग्रस्त पण तितकाच लोकप्रिय शो म्हणजे बिग बॉस. सध्या बिग बॉस 14 चे पर्व चर्चेत आहे. एकीकडे निक्की तंबोळी घरातून बाहेर पडली आहे तर दुसरीकडे दोन नवे स्पर्धक बिग बॉसच्या घरात एण्ट्री करणार आहेत.

नुकताच बिग बॉस 14 मध्ये विकेंडचा वार मध्ये सलमान खानने स्पर्धकांशी संवाद साधला. दरम्यान त्याने राहुल वैद्यला दिलेला टास्क योग्य पद्धतीने न खेळल्यामुळे सुनावले आहे. त्यानंतर त्याने बिग बॉसचे एक्स स्पर्धक मास्टर माइंड विकास गुप्ता आणि अभिनेत्री राखी सावंत हे बिग बॉस मध्ये सहभागी होणार असल्याचे सांगितले. शनिवारी या दोन्ही स्पर्धकांची बिग बॉसच्या घरात एण्ट्री झाली आहे.

दोन नवे स्पर्धक करणार एण्ट्री

कलर्स टीव्हीने त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर बिग बॉस 14 मधील एका भागाचा प्रोमो शेअर केला आहे. या प्रोमोमध्ये राखी सावंत डान्स करताना दिसत आहे. तर विकास गुप्ता शांत उभा असल्याचे दिसत आहे. शोमध्ये विकास आणि राखीची एण्ट्री झाल्यानंतर स्पर्धक आश्चर्यचकित झाले आहेत.

आमच्या आणखी बातम्या पाहण्यासाठी क्लिक करा : webnewswala.com आमच्या सर्व बातम्यांसाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | youtube | Sharechat | Copyright © Webnewswala All rights reserved.

Related posts

अक्षय कुमारने लॉन्च केला FAUG चा टीझर

Team webnewswala

सुनील ग्रोवर च्या ‘सनफ्लॉवर’ चा टिझर रिलीज

Web News Wala

Dhinchak Pooja नव्या गाण्यामुळे होतेय ट्रोल

Team webnewswala

Leave a Reply