Team WebNewsWala
नोकरी राष्ट्रीय

शिक्षकांसाठी मोठी बातमी TET Lifetime Validity वैध

TET Lifetime Validity news update : केंद्र सरकारने शिक्षकांसाठी टीईटी (TET) परीक्षा पास होणे अनिवार्य केले होते. केंद्र सरकारने शिक्षकांना आणि उमेदवारांना मोठा दिलासा

शिक्षकांसाठी मोठी बातमी TET Lifetime Validity वैध

Webnewswala Online Team – TET Lifetime Validity news update: सरकारी शिक्षक बनण्याचे अनेकांचे स्वप्न असते. परंतू वशिलेबाजी आणि दर्जेदार शिक्षकांचा अभाव यामुळे केंद्र सरकारने शिक्षकांसाठी टीईटी (TET) परीक्षा पास होणे अनिवार्य केले होते. केंद्र सरकारने देशभरातील शिक्षकांना आणि इच्छुक उमेदवारांना मोठा दिलासा दिला आहे.

केंद्र सरकारने शिक्षक पात्रता परीक्षेची 7 वर्षांची वैधता संपुष्टात आणली होती. शिक्षक किंवा इच्छुक उमेदवार एकदा का टीईटी परीक्षा पास झाला की, त्याचे ते प्रमाणपत्र सात वर्षेच वैध होते. ही मुदत संपवून केंद्र सरकारने एकदा परीक्षा पास झाला की टीईटी प्रमाणपत्र आयुष्यभरासाठी वैध करण्याचा निर्णय (TET Certificate Lifetime Validity) घेतला आहे. महत्वाचे म्हणजे हा निर्णय 2011 पासून लागू करण्यात येणार असल्याने लाखो शिक्षकांना मोठा दिलासा मिळाला आहे.

शिक्षण मंत्रालयाने (Education Ministry) आज याची घोषणा केली. शिक्षण मंत्रालयाने सांगितले की, टीचर इलिजिबिलीटी टेस्ट (Teachers Eligibility Test) ची वैधता आता लाईफटाईम असणार आहे. म्हणजेच ज्या उमेदवारांना 2011 मध्ये टीईटी पास केली आहे, तर त्यांचे सर्टिफिकेट आयुष्यभरासाठी वैध असणार आहेत.

सरकारी शाळांमध्ये किंवा अनुदानित शाळांमध्ये शिक्षकाची नोकरी मिळवायची असेल तर टीईटी परीक्षा पास होणे गरजेचे आहे. तसेच जे शिक्षक नोकरी करतात त्यांनाही टीईटी पास होणे गरजेचे आहे. आधीच्या नियमानुसार 7 वर्षांच्या आतच तो उमेदवार शिक्षकाच्या नोकरीसाठी अर्ज करू शकत होता. ती मुदत संपल्यावर पुन्हा टीईटी परीक्षा देणे बंधनकारक होते. आता हे टेन्शन मिटले आहे.

Web Title – शिक्षकांसाठी मोठी बातमी TET Validity लाईफटाईम वैध ( Big news for teachers TET Validity Lifetime Valid )

webnewswala.com च्या Youtube चॅनेल वरील ताज्या बातम्या

आमच्या आणखी बातम्या पाहण्यासाठी क्लिक करा :webnewswala.com आमच्या सर्व बातम्यांसाठी फॉलो करा :फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | youtube | Sharechat | Copyright © Webnewswala All rights reserved.

 

Related posts

पेट्रोल दरवाढीवर E20 पेट्रोल चा उतारा

Web News Wala

मोदीजी दाढी करा चहावाल्याने पंतप्रधानांना पाठवली मनीऑर्डर

Web News Wala

विजय मल्ल्याला बँका देणार दणका; ‘ब्लॉक’ डीलची तयारी

Web News Wala

Leave a Reply