पर्यावरण राष्ट्रीय

लॉकडाउन काळात ऑस्ट्रेलियातील Black Australop ला मोठी मागणी

मुळची ऑस्ट्रेलियातील असलेल्या व राज्यात देशी कुक्‍कुटपालनात विविध वैशिष्ट्यांमुळे Black Australop या प्रजातीची मागणी वाढली आहे.

लॉकडाउन काळात ऑस्ट्रेलियातील Black Australop ला मोठी मागणी

कोल्हापूर – Black Australop मुळची ऑस्ट्रेलियातील असलेल्या व राज्यात देशी कुक्‍कुटपालनात विविध वैशिष्ट्यांमुळे Black Australop या प्रजातीची मागणी वाढली आहे. देशी कुक्‍कुटपालनात अंडी व मांस या दोन्ही उत्पादनांना मोठी मागणी आहे. महत्वाचे म्हणजे या दोन्ही उत्पादनात ही प्रजात सरस असल्यानेच ग्राहकांचा त्याकडे ओढा आहे. या प्रजातीचे उत्पादन राज्यात केवळ कोल्हापूर जिल्ह्यातील अंडी उबवणी केंद्रामार्फत सुरु आहे. ऐन लॉकडाउनच्या काळातही या विभागाने राज्याच्या कानाकोपऱ्यात या कोंबडीच्या पिलांचा व खाद्याचा पुरवठा करत गोरगरीब, कष्टकरी लोकांना हमखास उत्पन्नाची व्यवस्था करुन दिली आहे.
कोल्हापूर जिल्ह्यातील अंडी उबवणी केंद्र हे राज्यातील अव्वल केंद्र आहे.

Black Australop मुळे शासनाच्या तिजोरीत 60 लाखांचे उत्पन्न 

पशुसंवर्धन विभागाच्या बहुतांश योजना यशस्वीपणे राबवणाऱ्या या केंद्राचा राज्यात प्रथम क्रमांक आहे. वर्षभर कोरोनाचे संकट असतानाही जवळपास 60 लाखांचे उत्पन्न या केंद्राने शासनाच्या तिजोरीत दिले आहे. कोरोनाचे संकट वाढेल तरी केंद्रातील पक्षी निर्मिती थांबली नाही. शासन अनुदान नसल्याने अनेक प्रजातींचे उत्पादन थांबले असताना मात्र Black Australop या प्रजातीचे उत्पादन मात्र सुरुच ठेवले. राज्यात इतरत्र याचे उत्पादन होत नसल्याने पशुसंवर्धन विभागानेही या प्रजातीच्या उत्पादनाला चालना दिली.

राज्याच्या कानाकोपऱ्यात Black Australop ची मागणी

राज्याच्या कानाकोपऱ्यात Black Australop ची मागणी वाढण्याचे कारण म्हणजे या पक्षांचा होणारा दुहेरी उपयोग. एकतर या कोंबडीचे वजन हे तीन महिन्यात दीड ते दोन किलोने वाढत असल्याने व एका अंडी चक्रात ही कोंबडी 180 ते 220 अंडी देत असल्याने तिच्या मागणीत मोठी वाढ होत आहे. गोरगरीब, कष्टकरी, मोलमजुर करणारे व कोरोनामुळे नोकरी, व्यवसाय गमावलेल्या अनेक युवकांनी कुक्‍कुटपालनास सुरुवात केली आहे. कमी कालावधीत चांगले उत्पन्न मिळत असल्याने ही प्रजाती अल्पावधीत लोकप्रिय झाली आहे. सध्या अंडी उबवणी केंद्रात या प्रजातीचे 1150 पक्षी आहेत. गावातील यात्रा, जत्रांपासून ते हॉटेल व्यावसायिकांपर्यंत या पक्षांना मागणी आहे. पक्षांच्या पुरवठ्यासह खाद्याचा पुरवठाही या विभागाकडून केला जात आहे.

कमी किंमतीत जास्तीत जास्त प्रोटीन

कोरोनाच्या काळात प्रतीकारशक्‍ती वाढवण्यावर भर देण्यात आला. त्यामुळे नागरिकांनी हाय प्रोटीनच्या खाद्याला प्राधान्य दिले. यासाठी बक्‍कळ पैसाही मोजला. मात्र अंड्यांमधून कमी किंमतीत जास्तीत जास्त प्रोटीन मिळत असल्याने अंड्यांच्या मागणीत वाढ झाली. याचा परिणाम कुक्‍कुटपालनावरही झाला. अंड्यांचे चांगले उत्पादन देणाऱ्या Black Australop या प्रजातिची मागणीही त्यामुळेच वाढली. आता अंडी उबवणी केंद्रातून इतर प्रजातींची पैदासही केली जाणार आहे. – डॉ.ए.एस.नाईक, पशुसंवर्धन विभाग

आमच्या आणखी बातम्या पाहण्यासाठी क्लिक करा :webnewswala.com आमच्या सर्व बातम्यांसाठी फॉलो करा :फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | youtube | Sharechat | Copyright © Webnewswala All rights reserved.

Related posts

राज्यपालांनी लॉकडाउनमध्ये लिहिली १३ पुस्तके

Team webnewswala

बुलेट ट्रेन फक्त गुजरातमध्येच धावणार रेल्वे मंडळाची माहिती

Web News Wala

व्यवसायासाठी मुद्रा लोन मिळवण्याची सुवर्णसंधी

Web News Wala

Leave a Reply