Team WebNewsWala
राजकारण शहर

भिवंडी अतिक्रमण विभागाची कारवाई, भाजपाचे कार्यालय जमीनदोस्त

भिवंडी मनपाचे नगरसेवक सुमित पाटील यांचे निकटवर्तीय ठाणे जिल्हा ग्रामीण भाजपा युवा मोर्चा उपाध्यक्ष भावेश पाटील यांच्या कार्यालयावर कारवाई.
भिवंडी अतिक्रमण विभागाची कारवाई, भाजपाचे कार्यालय जमीनदोस्त
भिवंडी – भिवंडी मनपाचे नगरसेवक सुमित पाटील यांचे निकटवर्तीय ठाणे जिल्हा ग्रामीण भाजपा युवा मोर्चा उपाध्यक्ष भावेश पाटील यांच्या कार्यालयावर कारवाई करीत आज भिवंडी महापालिकेने जेसीबीच्या साहाय्याने जमीनदोस्त केल्याने खळबळ माजली आहे. भिवंडी महानगरपालिकेने संपूर्ण भिवंडी शहरात अनधिकृत बांधकामांवर तोडक कारवाईला सुरुवात केली आहे.
शहरातील अनेक अनधिकृत बांधकामांवर कारवाई 

शहरातील अनेक अनधिकृत बांधकामांवर भिवंडी मनपा आयुक्त डॉ. पंकज आशिया यांनी आदेश दिल्यानंतर शहरातील अनेक भागात अशा अनधिकृत बांधकामांवर कारवाई करण्यास महानगरपालिकेने सुरुवात केली आहे.

भावेश पाटील यांच्या कार्यालयावर हातोडा

भावेश पाटील यांच्या कार्यालयावर हातोडा

भिवंडी महानगरपालिकेने अजय नगर येथील भाजपा ठाणे जिल्हा ग्रामीण चे उपाध्यक्ष भावेश पाटील यांच्या कार्यालयावर हातोडा चढवीत कारवाई केली. यामध्ये भावेश पाटील यांच्या कार्यालयाची संपूर्णपणे जेसीबी लावून हे कार्यालय जमीनदोस्त करण्यात आले व शेजारीच असणार्‍या नर्सरी वरही महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी कारवाई केली. यावेळी महानगरपालिकेचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते व कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

आमच्या आणखी बातम्या पाहण्यासाठी क्लिक करा : webnewswala.com आमच्या सर्व बातम्यांसाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | youtube | Sharechat | Copyright © Webnewswala All rights reserved.

Related posts

राज्यस्तरीय चित्रकला स्पर्धेत अथर्व समीर शिरवडकर ची बाजी

Team webnewswala

नाटय़गृहांचे भाडे कमी करा अखिल भारतीय मराठी नाटय़ परिषद

Team webnewswala

योग्य किंमतीत मास्क मिळण्यासाठी महाराष्ट्राचा पुढाकार

Team webnewswala

Leave a Reply