Team WebNewsWala
आंतरराष्ट्रीय क्रीडा

IPL 2021 पूर्ण करण्यास BCCI ची कसरत, वेळापत्रकात बदल

IPL 2021 Update आयपीएल 2021 च्या उर्वरित सामने खेळवण्यासाठी बीसीसीआयनं 31 सामन्यांच्या आयोजनासाठी संयुक्त अरब अमिरातीची निवड केली.

IPL 2021 पूर्ण करण्यास BCCI ची कसरत, वेळापत्रकात बदल

Webnewswala Online Team – कोरोना व्हायरसमुळे (Coronavirus) आयपीएल स्पर्धेचा 14 वा सिझन (IPL 2021) 29 सामन्यांनंतर स्थगित करावा लागला. आता उर्वरित 31 सामने सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्यात यूएईमध्ये होतील, असं बीसीसीआयं जाहीर केलं आहे. या स्पर्धेच्या तारखा अद्याप जाहीर झालेल्या नाहीत. मात्र IPL 2021 वेळापत्रकात मोठा बदल होण्याची शक्यता आहे. याच कारणामुळे बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली (Sourav Ganguly) आणि सचिन जय शहा (Jay Shah) हे दुबईला गेले आहेत. याबाबत ‘इनसाईड स्पोर्ट्स’ या वेबसाईटनं दिलेल्या वृत्तानुसार उर्वरित आयपीएल स्पर्धेच्या वेळापत्रकाची घोषणा लवकरच होण्याची शक्यता आहे.

या स्पर्धेतील उर्वरित 31 सामने 25 दिवसांच्या विंडोमध्ये पूर्ण करण्याची बीसीसीआयची योजना आहे. या 25 दिवसांमध्ये 8 ते 10 डबल हेडर (एकाच दिवशी दोन सामने) असतील. याचं वेळापत्रक बीसीसीआय सध्या तयार करत आहे.

17 ते 19 सप्टेंबर दरम्यान आयपीएल स्पर्धेला सुरुवात

कोरोना व्हायरसच्या उद्रेकामुळे आयपीएल स्पर्धा स्थगित झाली नसती तर आयपीएलमध्ये फक्त 6 डबल हेडर बाकी होते. आता ही संख्या 8 ते 10 पर्यंत करण्याचा बीसीसीआयचा विचार आहे. यंदा बोर्डाकडे 25 दिवसांची छोटी विंडो आहे. सर्व टीममधील खेळाडूंनी टी 20 वर्ल्ड कपची तयारी करण्यासाठी पुरेसा वेळ देखील द्यावा लागेल, त्यामुळे ही योजना तयार करण्यात आली आहे.

एकाच शहरात नॉक आऊट सामने

गेल्या आयपीएल प्रमाणे (IPL 2020) यंदाही यूएईमधील शारजा, अबूधाबी आणि दुबई या तीन शहरांमध्ये आयपीएलचे सामने होतील. या स्पर्धेतील सर्व नॉकआऊट सामने एकाच शहरात करण्याचा बीसीसीआयचा विचार आहे. या परिस्थितीमध्ये दुबईला प्राधान्य मिळण्याची शक्यता आहे.

Web Title – IPL 2021 पूर्ण करण्यास BCCI ची कसरत, वेळापत्रकात बदल ( BCCI’s exercise to complete IPL 2021, change in schedule )

webnewswala.com च्या Youtube चॅनेल वरील ताज्या बातम्या

आमच्या आणखी बातम्या पाहण्यासाठी क्लिक करा :webnewswala.com आमच्या सर्व बातम्यांसाठी फॉलो करा :फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | youtube | Sharechat | Copyright © Webnewswala All rights reserved.

 

Related posts

नेपाळचा भारतीय वृत्तवाहिन्यांवर सर्जिकल स्ट्राईक

Team webnewswala

लहान मुलांबाबत दिलासादायक बातमी; संशोधनाने कमी केली चिंता

Web News Wala

चिनी अलिबाबा साठी अमेरिकेची गुहा बंद होणार

Team webnewswala

Leave a Reply