Team WebNewsWala
आंतरराष्ट्रीय क्रीडा

BCCI कडून IPL च्या नवीन हंगामाची तयारी सुरु

IPL 2021 Update आयपीएल 2021 च्या उर्वरित सामने खेळवण्यासाठी बीसीसीआयनं 31 सामन्यांच्या आयोजनासाठी संयुक्त अरब अमिरातीची निवड केली.

भारतात करोनामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे बीसीसीआयने IPL च्या तेराव्या हंगामाचं आयोजन युएईत केलं. दीड महिन्यापेक्षा जास्त काळ चाललेल्या स्पर्धेत मुंबई इंडियन्सने दिल्लीवर मात करत सलग दुसऱ्यांदा विजेतेपद पटकावलं. तेरावा हंगाम संपुष्टात आल्यानंतर बीसीसीआयने लगेच पुढच्या हंगामाची सुरुवात केली आहे.

पुढील हंगामात आणखी एक संघ जोडला जाण्याची शक्यता

द हिंदू ने दिलेल्या वृत्तानुसार बीसीसीआय पुढील हंगामासाठी लिलाव आयोजित करण्याच्या तयारीत असून पुढील हंगामात आणखी एक संघ जोडला जाण्याची शक्यता आहे. यासाठी बीसीसीआयचे अधिकारी संघमालकांच्या संपर्कात आहेत. २०२१ च्या हंगामासाठी BCCI सर्व IPL खेळाडूंचं मेगा ऑक्शन करण्याच्या तयारीत होतं. परंतू करोनामुळे निर्माण झालेली परिस्थिती पाहता काही महिन्यांपूर्वी बीसीसीआयने लिलाव करण्याचा विचार स्थगित केला होता. परंतू तेराव्या हंगामाच्या यशस्वी आयोजनानंतर BCCI ने पुढील हंगामाच्या लिलावासाठी पावलं उचलायला सुरुवात केल्याचं कळतंय.

चौदाव्या हंगामाचं आयोजन भारतातच करण्याचा विचार

एप्रिल-मे महिन्यात आयपीएलच्या चौदाव्या हंगामाचं आयोजन भारतातच करण्याचा विचार बीसीसीआय करत आहे. अध्यक्ष सौरव गांगुली यांनी याआधीच आयोजनाबद्दलचे संकेत दिले आहेत. सर्व गोष्टी जुळून आल्या तर पुढील हंगामात अहमदाबादचा संघ आयपीएलमध्ये खेळताना दिसू शकेल.

आमच्या आणखी बातम्या पाहण्यासाठी क्लिक करा : webnewswala.com आमच्या सर्व बातम्यांसाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | youtube | Sharechat | Copyright © Webnewswala All rights reserved.

Related posts

पर्यावरण दिन श्रीलंकेजवळ बुडतंय रसायनांनी भरलेलं जहाज

Web News Wala

अमेरिका-युरोपप्रमाणे गांजाला कायदेशीर मान्यता द्या : तस्लिमा नसरीन

Team webnewswala

मुकेश अंबानी जगातील सर्वात श्रीमंत चौथी व्यक्ती

Team webnewswala

Leave a Reply