Team WebNewsWala
अर्थकारण राष्ट्रीय

Bank Privatisation मोदी सरकार विकणार आणखी एक सरकारी बँक

मोदी सरकार विकणार आणखी एक सरकारी बँक बँक ऑफ इंडिया विकायचा विचार करीत आहे. म्हणजेच बँक ऑफ इंडिया देखील खाजगी हातात जाऊ शकते.

Bank Privatisation मोदी सरकार विकणार आणखी एक सरकारी बँक

Webnewswala Online Team – बँक खासगीकरणाबद्दल (Bank Privatisation) मोठी बातमी येत आहे. केंद्र सरकारने फेब्रुवारीमध्ये सादर केलेल्या अर्थसंकल्पात सार्वजनिक क्षेत्रातील दोन बँकांच्या खासगीकरणाची घोषणा केली होती. अर्थमंत्र्यांनी केलेल्या घोषणेनुसार, सेंट्रल बँक ऑफ इंडिया आणि इंडियन ओव्हरसीज बँकेतील हिस्सेदारी विकण्याची सरकारची योजना होती, पण आता अशी बातमी येत आहे की, मोदी सरकार विकणार आणखी एक सरकारी बँक बँक ऑफ इंडिया विकायचा विचार करीत आहे आणि त्यातही आपला हिस्सा विकू शकते. म्हणजेच बँक ऑफ इंडिया देखील खाजगी हातात जाऊ शकते.

सरकार बँक ऑफ इंडियामधील आपला हिस्सादेखील विकणार 

इंग्रजी वृत्तपत्र टाइम्स ऑफ इंडियामध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार, नीती आयोगाने दोन बँकांच्या नावांची शिफारसही केली आहे, परंतु आता अशी बातमी येत आहे की, सरकार बँक ऑफ इंडियामधील आपला हिस्सादेखील विकू शकेल. खासगीकरणाच्या या लिस्टमध्ये बँक ऑफ इंडियाचे नावही समोर येते आहे.

बँकांच्या शेअर्सची किंमत काय आहे ?
शेअर बाजारामधील या बँकांच्या शेअर्सच्या किंमतीविषयी बोलताना सेंट्रल बँक आणि इंडियन ओव्हरसीज बँकेची मार्केट कॅप 44,000 कोटी रुपये आहे, ज्यामध्ये IOB ची मार्केट कॅप 31,641 कोटी रुपये आहे.

अर्थ मंत्रालयाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, नीती आयोगाच्या प्रस्तावावर सध्या निर्गुंतवणूक विभाग (DIPAM) आणि वित्तीय सेवा (Bankibg Division) मध्ये विचार केला जात आहे. विनिवेश प्रक्रियेचा एक भाग म्हणून चालू आर्थिक वर्षात खाजगीकरण करण्यात येणाऱ्या PSB ची नावे नीती आयोगाने निर्गुंतवणुकीवरील कोअर कमिटी ऑफ सेक्रेटरीज कडे सादर केली आहेत. खाजगीकरणासाठी सार्वजनिक क्षेत्रातील दोन बँक आणि एका विमा कंपनीची नावे निवडण्याची जबाबदारी नीती आयोगाकडे सोपविण्यात आली आहे. खासगीकरणासंदर्भातील घोषणा 2021-22 या आर्थिक वर्षाच्या अर्थसंकल्पात करण्यात आली.

Web Title -Bank Privatisation मोदी सरकार विकणार आणखी एक सरकारी बँक ( Bank Privatization Another government bank to be sold by Modi government )

webnewswala.com च्या Youtube चॅनेल वरील ताज्या बातम्या

आमच्या आणखी बातम्या पाहण्यासाठी क्लिक करा :webnewswala.com आमच्या सर्व बातम्यांसाठी फॉलो करा :फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | youtube | Sharechat | Copyright © Webnewswala All rights reserved.

Related posts

IPL 14 Mumbai Indians संघाची नवी जर्सी लॉन्च

Web News Wala

संपणार लसींचे टेन्शन, जून महिन्यात 12 कोटी लस

Web News Wala

१ ऑक्टोबरपासून नवे बदल होणार गॅस सिलेंडरपासून आरोग्य विम्यापर्यंत

Team webnewswala

Leave a Reply