Team WebNewsWala
क्राईम मनोरंजन राष्ट्रीय व्यापार

BARC कडून पुढील 12 आठवडे TRP वर बंदी

TRP घोटाळा समोर आल्यानंतर पुढील 12 आठवड्यांसाठी BARC संस्थेने TRP वर बंदी आणली आहे. न्युज ब्रॉडकास्टिंग असोसिएशनने या निर्णयाचे स्वागत केले आहे.

TRP घोटाळा समोर आल्यानंतर पुढील 12 आठवड्यांसाठी BARC संस्थेने TRP वर बंदी आणली आहे. न्युज ब्रॉडकास्टिंग असोसिएशनने या निर्णयाचे स्वागत केले आहे. मुंबई पोलिसांनी टीआरपी घोटाळा समोर आणला होता. त्यानंतर बार्कने हा निर्णय घेतला आहे.

TRP मोजण्याच्या यंत्रणेचे परीक्षण करणार तोपर्यंत TRP वर बंदी

BARC आपल्या तांत्रिक समितीला टीआरपी मोजण्याच्या यंत्रणेचे परीक्षण करणार आहे. ही व्यवस्था सुधरवण्यासाठी किमान 8 ते 12 आठवड्यांचा  अवधी लागणार आहे. तोपर्यंत बार्क टीआरपी जारी करणार नाही. सध्या हिंदी, इंग्रजी, प्रादेशिक आणि बिजनेस वृत्तवाहिन्यांना हा निर्णय तत्काळ लागू होणार आहे.

टीआरपी घोटाळ्यावर सध्या सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू आहे. त्यात बार्कने पुढील 12 आठवडे टीआरपी जारी न करण्याचे जाहीर केले आहे. या निर्णयाचे नॅशनल ब्रॉडकास्टिंग असोसिएशने स्वागत केले आहे. कुठलेही महत्त्वाचे निर्णय घेण्यापूर्वी बार्कने एनबीएशी सल्ला घेतला पाहिजे असे मत एनबीएचे अध्यक्ष रजत शर्मा यांनी व्यक्त केले आहे.

टेलिव्हिजन प्रेक्षक संख्या मापणारी स्वायत्त संस्था

BARC म्हणजेच Broadcast Audience Research Council ही टेलिव्हिजनची प्रेक्षक संख्या मापणारी स्वायत्त संस्था आहे. ही संस्था जगातील एक मोठी संस्था असून 2010 साली या संस्थेची स्थापना झाली होती. या संस्थेचे मुख्य कार्यालय मुंबईत आहे.

आमच्या आणखी बातम्या पाहण्यासाठी क्लिक करा : webnewswala.com आमच्या सर्व बातम्यांसाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | youtube | Sharechat | Copyright © Webnewswala All rights reserved.

Related posts

विक्रम गोखले यांच्यासह 14 जणांवर फसवणुकीचा गुन्हा

Team webnewswala

सिनेमागृह, स्विमिंग पूल होणार सुरू आज येणार Unlock 5.0 गाइडलाइन्स

Team webnewswala

शिक्षकांसाठी मोठी बातमी TET Lifetime Validity वैध

Web News Wala

Leave a Reply