Team WebNewsWala
राष्ट्रीय

CBI अधिकाऱ्यांच्या जीन्स, टी शर्ट, स्पोर्ट शूजवर बंदी

आता सीबीआयच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना ड्यूटीवर उपस्थित असताना, कार्यालयात येताना जीन्स,टी-शर्ट, स्पोर्ट्स शूज वापरण्यावर बंदी घातले आहेत.

CBI अधिकाऱ्यांच्या जीन्स, टी शर्ट, स्पोर्ट शूजवर बंदी

Webnewswala Online Team – केंद्रीय अन्वेषण विभागाचे (CBI) नवे संचालक सुबोधकुमार जयस्वाल यांनी ड्यूटीवर असलेल्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या पेहराव/गणवेशाबाबत नवीन नियमावली तयार केली आहे. यामुळे आता सीबीआयच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना ड्यूटीवर उपस्थित असताना, कार्यालयात येताना जीन्स,टी-शर्ट, स्पोर्ट्स शूज वापरण्यावर बंदी घातले आहेत. तसेच महिला कर्मचाऱ्यांना देखील फक्त साडी आणि फॉर्मल शर्ट वापरणे बंधनकारक केलं आहे. सीबीआय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी फॉर्मल कपडे परिधान करुनच कार्यालयात यावे असे आदेश सीबीआयचे संचालक सुबोधकुमार जयस्वाल यांनी दिले आहेत.

सीबीआय कार्यालयात येताना कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना फॉर्मल शर्ट-पँट आणि फॉर्मल शूज या गणवेशातच येणे बंधनकारक केले आहे. त्यामुळे आता जीन्स, टी-शर्ट,स्पोर्टस शूज किंवा चप्पल घालून कार्यालयात येण्यावर निर्बंध घातले आहेत. तसेच पुरुष अधिकाऱ्यांना आपली दाढी वाढवता येणार नाही.

सीबीआय कार्यालयातील महिला कर्मचाऱ्यांच्याही पेहरावात बदल करण्यात आला आहे. महिला कर्मचारी आणि महिला अधिकारी यांना कार्यालयात येताना साडी किंवा फॉर्मल शर्ट परिधान करण्याचे आदेश दिले आहेत. सीबीआयचे नवे संचालक सुबोधकुमार जयस्वाल येत्या काळात अनेक नियमांत बदल करणार असल्याची देखील चर्चा सुरु आहे.

दोन वर्षांच्या कालावधीसाठी सीबीआयच्या प्रमुखपदी

मुंबईचे पोलीस आयुक्त आणि महाराष्ट्राचे पोलीस महासंचालक म्हणून सुबोध जयस्वाल यांनी याआधी जबाबदारी पार पाडली आहे. मुंबईवरचा दहशतवादी हल्ला, तेलगी स्टॅम्प घोटाळा अशा अनेक महत्वाच्या घटनांचा तपास जयस्वाल यांनी केला आहे. जयस्वाल हे १९८५ च्या बॅचचे महाराष्ट्र कॅडरचे अधिकारी आहेत. त्यांची दोन वर्षांच्या कालावधीसाठी सीबीआयच्या प्रमुखपदी ही नियुक्ती करण्यात आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या अध्यक्षतेखाली असलेल्या समितीच्या शिफारशीनुसार, सीबीआयचे नवे प्रमुख म्हणून सुबोध कुमार जयस्वाल यांच्या नावाला मंजुरी देण्यात आली होती.

Web Title – CBI अधिकाऱ्यांच्या जीन्स, टी शर्ट, स्पोर्ट शूजवर बंदी ( Ban on jeans, T-shirts, sports shoes of CBI officials )

webnewswala.com च्या Youtube चॅनेल वरील ताज्या बातम्या

आमच्या आणखी बातम्या पाहण्यासाठी क्लिक करा :webnewswala.com आमच्या सर्व बातम्यांसाठी फॉलो करा :फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | youtube | Sharechat | Copyright © Webnewswala All rights reserved.

 

Related posts

कोरोनामुळं आरोग्य सेवकाचा मृत्यू झाल्यास 48 तासात 50 लाख मिळणार

Web News Wala

राम मंदिराप्रमाणे अयोध्या रेल्वे स्टेशन चाही कायापालट

Team webnewswala

10 वी पास उमेदवारांना रेल्वे मध्ये नोकरीची संधी

Web News Wala

Leave a Reply