Team WebNewsWala
राजकारण शहर समाजकारण

स्व. बाळासाहेब ठाकरे रस्ते अपघात विमा योजनेला मंजुरी

ठाकरे सरकार कडून पुन्हा एकदा सोमवार पासून अनलॉक करण्यात आले आहे. त्यानुसार नवी नियमावली राज्य शासनाने शुक्रवारी मध्यरात्री जाहीर केली

स्व. बाळासाहेब ठाकरे रस्ते अपघात विमा योजना संपूर्ण राज्यात राबवण्याचा निर्णय आज राज्यमंत्रिमंडळानं घेतला आहे. या विमा योजनेसाठी राज्य आरोग्य हमी सोसायटीला आर्थिक अनुदान उपलब्ध करून दिलं जाणार आहे. त्याचप्रमाणे विहित पद्धतीने विमा कंपन्यांची निवड करण्यात येणार आहे.

रस्त्यांवर होणाऱ्या अपघातात तातडीने उपचार व्हावेत यासाठी ही योजना असल्याचं सांगण्यात आलं  आहे. या योजनेसाठी १२५ कोटी रुपये लागणार आहेत. राज्यातील तत्कालीन शिवसेना-भाजपच्या सरकारच्या कार्यकाळातील ही योजना असून, चार वर्षांनी अखरे या या योजनेस मंजुरी मिळाली आहे.

स्व. बाळासाहेब ठाकरे रस्ते अपघात विमा योजना
अपघातानंतर मोफत उपचार

अपघातानंतर मोफत उपचार मिळावेत, यासाठी ही योजना सुरू करण्यात येत आहे. या योजनेत ७४ पॅकेज असतील. तसेच, राज्यातील अनेक रुग्णालयांचा यामध्ये समावेश केला जाणार आहे.

महाराष्ट्रातील रस्त्यावर झालेल्या अपघातामधील व्यक्तींना या योजनेचा लाभ मिळणार आहे. ही व्यक्ती कोणत्याही राज्य, देशाची असली तरीदेखील त्यांना योग्य ते वैद्यकीय उपचार मिळणार आहेत.

सुमारे ७४ उपचार पद्धतीतून ३० हजार रुपयांपर्यंतचा खर्च मोफत केला जाणार आहे. यामध्ये अतिदक्षता विभाग व वॉर्डामधील उपचार, अस्थिभंग तसेच रुग्णलयाच्या वास्तव्यातील भोजनाचा समावेश असणार आहे.

आमच्या आणखी बातम्या पाहण्यासाठी क्लिक करा : webnewswala.com आमच्या सर्व बातम्यांसाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | youtube | Sharechat | Copyright © Webnewswala All rights reserved.

Related posts

उपनगरीय स्थानकांतही स्वयंचलित प्रवेशद्वार 

Team webnewswala

गणेशोत्सवानन्तर नवरात्रीलाही कोरोनाचा फटका

Team webnewswala

विद्यार्थ्यांसाठी दोन डोसमधील कालावधी कमी करा, पालिकेचं केंद्राला पत्र

Web News Wala

Leave a Reply