Team WebNewsWala
Other ऑटो

बुलेटला टक्कर देण्यासाठी बजाज Neuron ने कसली कंबर

बुलेटला टक्कर देण्यासाठी बजाज Neuron ही खास बाइक घेऊन येतोय, जाणून घ्या काय असेल विशेष जावा नंतर होंडानेही यात उडी घेतल्यामुळे बजाजनेही कंबर कसली आहे.

बुलेटला टक्कर देण्यासाठी बजाज Neuron ही खास बाइक घेऊन येतोय, जाणून घ्या काय असेल विशेष जावा नंतर होंडानेही यात उडी घेतल्यामुळे बजाजनेही कंबर कसली आहे. बजाजची Neuron जर बाजारात दाखल झाली तर

बजाजने केला बजाज Neuron बाइकचे नाव नोंदवण्यासाठी अर्ज

बुलेटला टक्कर देण्यासाठी बजाज Neuron बाइकचे नाव नोंदवण्यासाठी अर्ज केला आहे. त्यामुळे अशी शक्यता वर्तवली जात आहे की, ही एक क्रुझर बाइक असणार आहे आहे. त्यामुळे या बाइकचा थेट मुकाबला हा रॉयल एनफील्ड (Royal Enfield) क्लासिक 350, जावा, होंडा हायनेस सीबी 350 या बाइकशी होईल.

परंतु, बजाजकडून अद्याप ‘न्युरॉन’ बद्दल अधिकृत अशी घोषणा केली नाही. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, Neuron ही पूर्णपणे एक वेगळी बाइक असणार आहे. जर ही बाइक Sub-400cc क्रुझर बाइक प्रकारात आली तर यामध्ये  डोमिनार 400 चे 373.3cc सिंगल-सिलेंडर इंजिनचा वापर केला जाऊ शकतो.  दुसरी शक्यता अशी की, बजाजने आपली सर्वात लोकप्रिय असलेली  क्रुझर बाइक एव्हेंजरचा आधार घेऊन ही नवीन Neuron तयार केली असावी.

होंडा मोटरसायकल अँड स्कूटर इंडिया (HMSI) ने अलीकडे हायनेस सीबी 350 (Highness CB350) लाँच करून रॉयल एनफील्डला टक्कर दिली आहे, आता बजाज (Bajaj) ने सुद्धा यात उडी घेत एका दमदार बाइकची निर्मितीकडे पाऊल टाकले आहे.

बजाजकडे आधीच दोन प्रीमियम क्रुझ बाइक

एव्हेंजर सीरिजमध्ये  स्ट्रीट 160 आणि क्रुज 220 मॉडेल आहे. स्ट्रीट 160 ची दिल्‍लीमध्ये  सुरुवातीची एक्स शो रूम किंमत ही 99,597 रुपये आहे. तर क्रुझ 220 ची किंमत 1.21 लाख इतकी आहे.

स्ट्रीट 160 मध्ये 160 सीसी इंजिन दिले आहे.  जे 15 PS आणि 13.7 NM चा टार्क जेनेरेट करते. तर क्रुझ 220 मध्ये 220 सीसी सिंगल-सिलेंडर, ऑइल-कूल्ड इंजिन दिले आहे, जे 19.03 PS आणि 17.55 NM इतका टार्क जेनेरेट करते. स्ट्रीट 160 मॉडर्न स्ट्रीट डिझाइन आहे. तर  क्रुझ 220 ही मॉडर्न एलिमेंट्ससह एक प्रीमियम बाइक आहे.

परंतु, बजाजकडे आधीच दोन प्रीमियम क्रुझ बाइक आहे. त्यामुळे या दोन्ही बाइक पेक्षा Neuron ही वेगळी असण्याची शक्यता आहे.

याआधीही बजाजने रॉयल एनफील्डला टक्कर देण्याचा प्रयत्न केला होता

बुलेटला टक्कर देण्यासाठी बजाज Neuron ही खास बाइक घेऊन येतोय, जाणून घ्या काय असेल विशेष जावा नंतर होंडानेही यात उडी घेतल्यामुळे बजाजनेही कंबर कसली आहे.

डोमिनार 400 ची जाहिरात ही पूर्णपणे रॉयल एनफील्डला टक्कर देण्यासाठी होती. पण, दोन्ही गाड्या या वेगवेगळ्या सेगमेंटमधील होत्या. त्यामुळे ग्राहकांनी डोमिनार 400 ला फार पसंती दिली नाही. रॉयल एनफील्ड आधीपासून बाजारात आपली जागा कायम राखून आहे. आता  जावा नंतर होंडानेही यात उडी घेतल्यामुळे बजाजनेही कंबर कसली आहे.  बजाजची Neuron जर बाजारात दाखल झाली तर तिची किंमत ही एक्‍स-शोरूम 2 लाख रुपयांसह लाँच करू शकते.

आमच्या आणखी बातम्या पाहण्यासाठी क्लिक करा : webnewswala.com आमच्या सर्व बातम्यांसाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | youtube | Sharechat | Copyright © Webnewswala All rights reserved.

Related posts

भारताचा चीनवर educational स्ट्राईक

Team webnewswala

आयसीसीच्या एकदिवसीय क्रमवारीत भारतीय फलंदाजांचा दबदबा

Team webnewswala

भारतीय रेल्वेने केला तिकीट आरक्षणाच्या नियमांमध्ये बदल

Team webnewswala

Leave a Reply