Team WebNewsWala
Other ऑटो व्यापार

Bajaj Auto ने बंद केली Bajaj Chetak इलेक्ट्रिक ची बूकिंग

Bajaj Auto ने या वर्षी बाजारात आपली इलेक्ट्रिक स्कूटर Bajaj Chetak ही आकर्षक लूक आणि दमदार इलेक्ट्रिक मोटर असलेली स्कूटर आणली होती

देशातील प्रमुख दुचाकी कंपनी Bajaj Auto ने या वर्षीच्या सुरूवातीला बाजारात आपली पहिली इलेक्ट्रिक स्कूटर Bajaj Chetak लाँच केली होती. अत्यंत आकर्षक लूक आणि दमदार इलेक्ट्रिक मोटर असलेली ही स्कूटर कंपनीने दोन व्हेरिअंटमध्ये आणली होती. पण आता कंपनीने या स्कूटरसाठी बूकिंग स्वीकारणं बंद केलं आहे. कंपनीच्या अधिकृत वेबसाइटवर या स्कूटरसाठी केवळ रजिस्ट्रेशन सुरू आहे.

कंपनीने या वर्षीच्या सुरूवातीला जानेवारी महिन्यात Bajaj Chetak इलेक्ट्रिक स्कूटर लाँच केली, सुरूवातीला कंपनीने ही स्कूटर पुणे आणि बंगळुरू या दोन शहरांमध्ये लाँच केली होती. ग्राहकांकडून मिळणाऱ्या प्रतिक्रिया आणि प्रतिसादानंतर देशातील अन्य शहरांमध्ये ही स्कूटर टप्प्याटप्प्याने लाँच करण्याची कंपनीची योजना होती. पण मार्चमध्ये देशभरात लॉकडाउन लागू झाल्यानंतर कंपनीच्या योजनेला फटका बसला आणि स्कूटरचं प्रोडक्शन थांबलं. नंतर मार्च आणि एप्रिल महिन्यात कंपनीने स्कूटरसाठी बूकिंग बंद केली होती.

जून महिन्यात चेतकची बूकिंग पुन्हा सुरू 

जून महिन्यात अनलॉक प्रक्रिया सुरू झाल्यानंतर चेतकची बूकिंग पुन्हा सुरू झाली. पण, आता सप्टेंबरमध्ये पुन्हा एकदा कंपनीने या स्कूटरची बूकिंग बंद केली आहे. बूकिंग बंद करण्याचं कोणतंही कारण कंपनीकडून सांगण्यात आलेलं नाही. पण, करोना महामारीचा स्कूटरच्या विक्रीला बसलेला फटका, सप्लाय चेनवर झालेला परिणाम, चीनमधून येणारे काही पार्ट्स, कमी डिमांड आणि प्रोडक्शनची मागणी पूर्ण होत नसल्याने कंपनीने स्कूटरची बूकिंग बंद केल्याची शक्यता वर्तवली जात आहे.

स्पेसिफिकेशन्स :-

  • नव्या चेतक इलेक्ट्रिकमध्ये Eco आणि Sport मोड देण्यात आले आहेत. ही स्कूटर बनवण्यासाठी सॉलिड स्टील फ्रेम आणि हार्ड शीट मेटल बॉडीचा वापर करण्यात आलाय.
  • स्कूटरमध्ये एलईडी हेडलाइट, एलईडी डेटाइम रनिंग लाइट्स आणि फुल-डिजिटल इंस्ट्रुमेंट कन्सोल आहेत. इंस्ट्रुमेंट कन्सोलमध्ये बॅटरी रेंज आणि रिअल-टाइम बॅटरी इंडिकेटरसह अन्य माहिती मिळते.
  • स्कूटरच्या दोन्ही बाजूंना 12-इंचाचे अॅलॉय व्हिल्स आहेत. उल्लेखनीय म्हणजे नव्या इलेक्ट्रिक चेतकमध्ये रिव्हर्स गिअरचाही पर्याय आहे. या स्कूटरवर तीन वर्षे किंवा 50 हजार किलोमीटरची वॉरंटी मिळेल, याशिवाय बजाजकडून या स्कूटरसाठी तीन फ्री सर्व्हिस मिळतील. बजाज चेतकची इलेक्ट्रिक मोटार 5.36 bhp पीक पावर आणि 16 Nm टॉर्क निर्माण करते.

Bajaj Auto ने या वर्षी बाजारात आपली इलेक्ट्रिक स्कूटर Bajaj Chetak ही आकर्षक लूक आणि दमदार इलेक्ट्रिक मोटर असलेली स्कूटर आणली होती

  • चेतकमध्ये 3kWh लिथियम-आयन बॅटरी पॅक आहे. या स्कूटरमध्ये फिक्स्ड टाइप बॅटरीचा वापर करण्यात आलाय, घरातल्या स्टॅंडर्ड 5-15 amp आउटलेटद्वारे चार्ज करता येणं शक्य आहे. एका तासात 25 टक्के आमि पाच तासात फुल चार्ज होते. चेतकमध्ये दिलेल्या बॅटरीची लाइफ जवळपास 70 हजार किलोमीटर आहे असा दावा कंपनीकडून करण्यात आला आहे.
  • मोनोशॉक सस्पेंशन यामध्ये दिलं असून दोन्ही टायर्सना डिस्क ब्रेक आहेत. मल्टी स्पोक अॅलॉय व्हीलसह ट्यूबलेस टायर असलेल्या या स्कूटरच्या पुढील बाजूला कंपनीने राउंड शेप हेडलाइट दिले आहेत.

इको मोडमध्ये ही स्कूटर 95 किलोमीटरची रेंज, तर स्पोर्ट मोडमध्ये 85 किलोमीटरची रेंज देईल असा कंपनीचा दावा आहे. स्कूटरमध्ये डिजिटल इंस्ट्रुमेंट क्लस्टर, की-लेस इग्निशन, पुढील बाजूला हेडलँप्सजवळ ओव्हल LED स्ट्रिप यांसारखे अनेक प्रीमियम फीचर्स आहेत.

किंमत :-

ड्रम ब्रेक असलेल्या अर्बन व्हेरिअंटची किंमत एक लाख (एक्स-शोरुम) आणि डिस्क ब्रेक असलेल्या प्रीमियम व्हेरिअंटची किंमत 1.15 लाख(एक्स-शोरुम) रुपये आहे.

आमच्या आणखी बातम्या पाहण्यासाठी क्लिक करा : webnewswala.com आमच्या सर्व बातम्यांसाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | youtube | Sharechat | Copyright © Webnewswala All rights reserved.

Related posts

मनोरंजन क्रांतीचे उत्तम उदाहरण म्हणजे OTT

Team webnewswala

Corbevax सर्वात स्वस्त लस, 30 कोटी डोसची प्री-बुकिंग

Web News Wala

गणेशोत्सवानिमित्त ११ भागांची मालिका देवा श्री गणेशा

Team webnewswala

Leave a Reply