Team WebNewsWala
आरोग्य

Tearm insurance घेताना या १० महत्वपूर्ण चुका टाळा

आता जर तुम्ही Tearm Insurance विकत घेण्याचं ठरवलं असेल तर तुमच्या मनातील अनेक चिंता लवकरच दूर होतील. शेवटी मुदत विमा योजना जीवनाला सुरक्षा कवच पुरवतं आणि आर्थिक बाजू सांभाळणाऱ्या व्यक्तीच्या मृत्यूनंतरही कुटुंबाला राहणीमानात कोणतीही तडजोड करावी लागणार नाही

Tearm insurance घेताना या १० महत्वपूर्ण चुका टाळा 

मुंबई – webnewswala Online Team 

आता जर तुम्ही Tearm Insurance विकत घेण्याचं ठरवलं असेल तर तुमच्या मनातील अनेक चिंता लवकरच दूर होतील. शेवटी मुदत विमा योजना जीवनाला सुरक्षा कवच पुरवतं आणि आर्थिक बाजू सांभाळणाऱ्या व्यक्तीच्या मृत्यूनंतरही कुटुंबाला राहणीमानात कोणतीही तडजोड करावी लागणार नाही हे सुनिश्चित करतं. याशिवाय Tearm Insurance घेतल्यास मुलांचं शिक्षण, घर खरेदी या गोष्टीही रुळावरच राहतात. मुदत विमा योजनेबद्दल चांगली गोष्ट म्हणजे हा विमाचा सर्वाधिक शुद्ध प्रकार आहे. सोप्या शब्दांत सांगायचं तर, तुम्ही भरलेला प्रीमियम पूर्णपणे जीवनाला संरक्षण देण्याच्या दिशेने जातो.

मुदत विमा योजनेतून जास्तीत जास्त चांगलं मिळावं यासाठी काही महत्वपूर्ण चुका टाळल्या पाहिजेत. जाणून घ्या…
विम्याच्या हप्त्यांची तुलना न करणे 

Tearm Insurance योजनेत कव्हर रक्कम ते विम्याच्या हप्त्याचं प्रमाण खूप जास्त असतं. याचं कारण विम्याच्या हप्त्याची कमी रक्कम देऊन, आपण जास्त रक्कम मिळवू शकता. मात्र तरीही वेगवेगळ्या विमा कंपन्यांच्या विमा हप्त्याच्या रकमेत खूप मोठा फरक असतो. म्हणूनच, योजनेसंबंधी अंतिम निर्णय घेण्यापूर्वी काही विमा कंपन्यांच्या मुदत विमा हप्त्याची तुलना करणं चांगलं आहे. दुसरीकडे जर तुम्हाला अधिक व्याप्ती मिळत नसेल तर सर्वात कमी प्रिमियम असणारा प्लॅनदेखील कदाचित चांगली निवड नसेल.

लाइफ कव्हर रक्कम कमी घेणे

अनेकजण लाईफ कव्हरची नेमकी किती गरज आहे याचा विचार न करताच मुदत विमा योजना विकत घेतात. अपुरी व्याप्ती देणारी मुदत विमा योजना खरेदी करणं कदाचित त्याचं उद्धिष्ट पूर्ण करणार नाही. शक्यतो आपल्या वार्षिक उत्पन्नाच्या १५ ते २० पट कव्हरेज ठेवा. आपले वय, आर्थिक जबाबदाऱ्या आणि कौटुंबिक परिस्थितीनुसार आपल्यास जास्त रकमेची आवश्यकता भासू शकते. म्हणूनच, योजना खरेदी करण्यापूर्वी आवश्यक असलेल्या लाइफ कव्हरची रक्कम योग्यरित्या मोजण्याची शिफारस केली जाते.

कमी काळासाठी खरेदी करणं

आयुष्यातील ध्येय पूर्ण करणे हे मुदत विमा योजनेचं उद्दिष्ट आहे. आपले सध्याचे वय काहीही असो, किमान वयाच्या ६० व्या वर्षापर्यंत मुदत विमा योजना खरेदी करा. मुलांचे शिक्षण, घर खरेदी अशी जीवनातील ध्येयं सहसा त्या वेळेत पूर्ण होतात. मात्र, उशिरा सुरुवात करणार्‍यांसाठी किंवा ज्यांच्यांवर वयाच्या साठीनंतरही आर्थिक जबाबदाऱ्या आहेत त्यांना, दीर्घ मुदतीच्या कालावधीसाठीदेखील मुदत विमा योजनेचा विचार करावा लागेल. एकदा जबाबदाऱ्या पूर्ण झाल्यानंतर आपण विम्याच्या हप्त्याची रक्कम भरणं थांबवू शकता कारण त्यामध्ये कोणतेही मॅच्युरिटी मूल्य नाही. आजकाल, आपल्याकडे ८५ तसंच त्याहून अधिक वयापर्यंत कव्हर उपलब्ध आहेत.

उशिरा विकत घेणे

आपण तरुण आणि अविवाहित असल्यास, मुदत विमा खरेदी करणं आपल्या यादीत नसेल. पुन्हा विचार करा! आपले पालक आपल्यावर आर्थिक अवलंबून असतील किंवा येणाऱ्या काही वर्षांमध्ये तुमचं लग्न होऊ शकतं. तरुण वयात तुम्ही विम्याचा हप्ता भराल तो वय जास्त असताना असणाऱ्या रकमेच्या तुलनेत फार कमी असेल. तरुण वयात खरेदी केल्यावर आपण २५ ते ३० वर्षांसाठी दरवर्षी समान विम्याचा हप्ता भरत राहाल.

विमा कंपनीकडून ‘लोडिंग’ न स्वीकारणे

मुदत विमा योजनेतील विम्याच्या हप्त्याची रक्कम आपलं वय, विमा रक्कम आणि कालावधी यावर अवलंबून असते. अनेक खरेदीदारांसाठी हे सत्य आहे जोपर्यंत एखादी प्रतिकूल वैद्यकीय परिस्थिती निर्माण होत नाही. विमाधारक काही खरेदीदारांच्या वैद्यकीय चाचण्या करतात, त्यांचे बॉडी-मास इंडेक्स तपासतात तसंच कुटुंबाची वैद्यकीय पार्श्वभूमीदेखील विचारतात. सध्याची वैद्यकीय स्थिती किंवा निरोगी जीवनशैली नसल्यास विमाधारक बेस प्रीमियम ‘लोडिंग’ करून अतिरिक्त प्रीमियमची मागणी करतात. ही एक महत्त्वपूर्ण अंडररायटिंग प्रक्रिया आहे आणि तुम्ही ‘लोडिंग’चा पर्याय निवड करण्याचा विचार केला पाहिजे कारण अजिबात विमा न घेण्याऐवजी विमा काढणं महत्वाचं आहे.

रायडर्स न जोडणे

नैसर्गिक कारणांमुळे अकाली मृत्यूच्या जोखमीसोबत इतर आघाड्यांवरही धोका आहे. अपंगत्व एखाद्याची उत्पन्न क्षमता कमी करु शकतं तर वैद्यकीय आपत्कालीन परिस्थितीमुळे एखाद्याच्या बचतीवरही परिणाम होतो. मुदत विमा योजना अपघातग्रस्त रायडर, अपंगत्व रायडर, गंभीर आजार रायडर असे रायडर्स नावाचे पर्यायी लाभ जोडण्याचं एक साधन प्रदान करतं. आपल्या बेस मुदत विमा योजनेत अशा रायडर्सना जोडणं फायदे वाढवतं आणि सर्वांगीण संरक्षण प्रदान करतं.

तफावतींची माहिती न घेणं

प्लेन व्हॅनिला मुदत विमा योजनेच्या कालावधीत मृत्यूचा लाभ समान असतो. तथापि, आणखी काही योजना आहेत ज्यामध्ये वाढणारे किंवा कमी होणारे कव्हरेज मिळतात. काही योजनांमध्ये, कुटुंबास विमा रकमेचा काही भाग एकरकमी आणि नियमित हप्त्यांमध्ये उर्वरित रक्कम मिळण्याचा पर्याय उपलब्ध आहे. प्रदीर्घ कालावधीसाठी कव्हर सुरू ठेवताना आपल्याकडे वयाच्या साठीपर्यंत पैसे भरण्याचादेखील पर्याय आहे.

स्वत: फॉर्म न भरणे

सर्वसाधारणपणे, खरेदीदार विमा मध्यस्थांवरच आपला फॉर्म भरण्याची जबाबदारी सोडतात. ही एक मोठी चूक आहे जी बहुतेक खरेदीदार करतात. अर्ज पडताळून पाहताना तुम्हाला विमाधारकाला हव्या असलेल्या माहितीची कल्पना येते. याचसोबत आपल्याला फॉर्ममध्ये उघड केल्या जाणाऱ्या माहितीवर नियंत्रण ठेवता येतं. तुम्ही तुमच्या जीवनाचा विमा उतरवत असतो त्यामुळेचआपण स्वतः फॉर्म भरल्यानंतर मालकीची भावना येते. हे अत्यंत महत्त्वाचं आहे.

महत्वाची माहिती उघड न करणं

अशा अनेक महत्वाच्या गोष्टी आहेत ज्या आपण अर्जामध्ये जाहीर करणं विमाधारकास अपेक्षित असतं. यामध्ये आपल्या कुटुंबासह उत्पन्न आणि वैद्यकीय परिस्थितीची माहिती विचारली जाऊ शकते. अर्ज करताना आपण त्यांचा पूर्णपणे खुलासा करणं महत्वाचे आहे. माहिती देताना एखादी गोष्ट जाहीर केलेली नसेल तर नॉमिनीला दावा नाकारला जाऊ शकतो. यामुळे आपण ज्या कारणासाठी मुदत विमा योजना खरेदी केली आहे ते उद्दिष्ट साध्य होत नाही.

आपल्या नॉमिनीला न कळवणं

मुदत विम्याचा फायदा आपल्या आपल्या पत्नी आणि मुलांना व्हावा अशी जर तुमची इच्छा असेल तर आपण विवाहित महिला मालमत्ता कायद्यांतर्गतही योजनेला मान्यता देऊ शकता. तसंच, कुटुंबातील सदस्यांच्या फायद्यासाठी मुदत विमा योजना खरेदी करताना त्यांना याबद्दल कल्पना आहे याची खात्री करणं तसंच त्यांच्याकडे योजनेच्या कागदपत्रांची आणि हप्ते भरल्याच्या पावत्यांची प्रत असणं आवश्यक आहे.

Title – Tearm insurance घेताना या १० महत्वपूर्ण चुका टाळा  ( Avoid these 10 important mistakes when taking tearm insurance )

webnewswala.com च्या Youtube चॅनेल वरील ताज्या बातम्या

आमच्या आणखी बातम्या पाहण्यासाठी क्लिक करा :webnewswala.com आमच्या सर्व बातम्यांसाठी फॉलो करा :फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | youtube | Sharechat | Copyright © Webnewswala All rights reserved.

 

Related posts

कोरोना विरोधात लढण्यासाठी भारतीय Covaxin No 1

Web News Wala

दिव्यांग आणि ज्येष्ठ नागरिकांना जवळच्या केंद्रावर लस

Web News Wala

Swiggy कर्मचाऱ्यांना आता आठवड्यात 4 दिवस काम

Web News Wala

Leave a Reply