Other नोकरी राजकारण शहर समाजकारण

नगरसेविका रुचिता मोरे यांच्यातर्फ़े महिलांना ऑटोरिक्षा वाटप

ठामपा प्रभाग क्र.१२ मधील शिवसेना नगरसेविका रुचिता राजेश मोरे आणि ठामपा माजी परिवहन समिती सदस्य राजेश मोरे यांच्यावतीने ऑटो रिक्षा प्रशिक्षण दिलेल्या महिलांना ऑटो रिक्षांचे वितरण करण्यात आले.

ठाणे- ठामपा प्रभाग क्र.१२ मधील शिवसेना नगरसेविका रुचिता राजेश मोरे आणि ठामपा माजी परिवहन समिती सदस्य राजेश मोरे यांच्यावतीने ऑटो रिक्षा प्रशिक्षण दिलेल्या महिलांना ऑटो रिक्षांचे वितरण करण्यात आले.

◆ ठाणे महापालिका भवन, कचराळी तलाव, येथे आयोजित कार्यक्रमात महाराष्ट्र राज्याचे नगर विकास मंत्री तथा ठाणे जिल्हा पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते हे वितरण करण्यातआले.

◆ यावेळी खासदार राजन विचारे, शिवसेना ठाणे शहर विधानसभा क्षेत्रप्रमुख हेमंत पवार, महापालिका आयुक्त विपीन शर्मा,नगरसेविका रुचिता मोरे,माजी परिवहन समिती सदस्य राजेश मोरे आदी उपस्थित होते.

◆ आपल्या प्रभागातील महिलांच्या सक्षमीकरणासाठी त्यांना स्वतःच्या पायावर उभे राहून स्वयंरोजगार करता यावा यासाठी ठामपा प्रभाग क्र.१२ च्या नगरसेविका रुचिता राजेश मोरे व ठामपा मा.परिवहन सदस्य राजेश मोरे यांच्या वतीने गेल्या वर्षेभरात या प्रशिक्षण कार्यक्रमात ठाणे शहरातील जवळ जवळ २०० महिला-मुलींना ऑटो रिक्षा प्रशिक्षण देण्यात आले
होते.

ठामपा प्रभाग क्र.१२ मधील शिवसेना नगरसेविका रुचिता राजेश मोरे आणि ठामपा माजी परिवहन समिती सदस्य राजेश मोरे यांच्यावतीने ऑटो रिक्षा प्रशिक्षण दिलेल्या महिलांना ऑटो रिक्षांचे वितरण करण्यात आले.

◆ प्रशिक्षणासोबत लर्निंग लायसंन्स,परमंनट लायसंन्स,ऑटो रिक्षा batch, तसेच कच्चे व पक्के परमिट देखील काढून देण्याची संपूर्ण व्यवस्था राजेश मोरे यांनी करून दिलेली आहे.

◆ या कार्यक्रमात महिला उत्तम प्रकारे प्रशिक्षित होवून ऑटो रिक्षा चालविण्यास सक्षम झाल्या आहेत. तर यापैकी ७० महिलांचे बॅचेस काढून त्यांना ड्रायव्हींग लायसन्सही देण्यात आले आहेत. गुरुवार यापैकी काही महिलांना ऑटो रिक्षांचे वाटप ठाणे महापालिका भवन, कचराळी तलाव समोर, ठाणे येथे आयोजित कार्यक्रमात महाराष्ट्र राज्याचे नगर विकास मंत्री तथा ठाणे जिल्हा पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते देण्यात आल्या.

◆ नगरसेविका रुचिता राजेश मोरे व ठामपा मा. परिवहन सदस्य राजेश मोरे हे गेली अनेक वर्षे आपल्या प्रभागातील महिलांच्या कला-गुणांना वाव मिळावा, आर्थिकदृष्ट्या दुर्बल असलेल्या महिलांनी स्वतःच्या पायावर उभे राहावे, तसेच त्यांचे प्रशिक्षण अपूर्ण राहू नये, व त्यांना शासकीय यंत्रणेमध्ये कोणताच त्रास होऊ नये, हे सर्व काम सुखकर व्हावे यासाठी त्यांची फी भरल्यापासून, महिलांच्या हातात गाडी देण्यापर्यंतची सर्व जबाबदारी मोरे दाम्पत्यांनी निस्वार्थीपणे पार पाडली आहे.

◆ २०० महिला ऑटो रिक्षा चालविण्याचे प्रशिक्षण घेवून सक्षम झाल्याने त्या आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी स्वतःच्या पायावर उभ्या राहू शकतात.या सर्वसाठी सुप्रीम टिव्हीएस, टिव्हीएस मोटर्स,ठाणे प्रादेशिक परिवहन अधिकारी नंदकिशोर नाईक व नौपाडा पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल मांगले यांचे विशेष सहकार्य लाभले असे आयोजकांनी सांगितले.

नक्की वाचा >>
देशातील पहिली किसान रेल्वे, शेतकऱ्यांना होणार फायदा
बिग बॉस मुळे रातोरात पालटलं शहनाज गिलचं नशीब
मोदींचे आवाहन या वेबसाईट ला नक्की भेट द्या

आमच्या आणखी बातम्या पाहण्यासाठी क्लिक करा : webnewswala.com आमच्या सर्व बातम्यांसाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | Youtube | Sharechat | Copyright © Webnewswala All rights reserved.

Related posts

रामदेव बाबा नी मारल्या 10 सेकंदात 18 दोरीच्या उड्या

Team webnewswala

ड्रीम्स मॉल आग २९ मॉलना पाच महिन्यांपूर्वीच पालिकेची नोटीस

Web News Wala

सरकारी कर्मचारी मालामाल, 1 जुलैपासून पगारवाढ

Web News Wala

Leave a Reply