Team WebNewsWala
ऑटो शहर

उपनगरीय स्थानकांतही स्वयंचलित प्रवेशद्वार 

सर्वसामान्यांसाठी लोकलच्या वेळा बदलणार करोनामुळे सर्वसामान्य प्रवाशांसाठी बंद झालेली उपनगरी रेल्वेची दारे जवळपास दहा महिन्यांनी खुली झाली आहेत

उपनगरीय स्थानकांतही स्वयंचलित प्रवेशद्वार 

मुंबई : गर्दी नियंत्रणाबरोबरच प्रवाशांना शिस्त लागावी, यासाठी मेट्रो रेल्वे स्थानकांप्रमाणेच रेल्वे स्थानकांतही स्वयंचलित प्रवेशद्वार चा (फ्लॅप गेट) प्रयोग करण्याचा विचार असून सीएसएमटी स्थानकात प्रायोगिक तत्त्वावर हे प्रवेशद्वार तयार केले जाईल.

मुंबई मेट्रो स्थानकांत स्वयंचलित प्रवेशद्वार आहेत. प्लास्टिकच्या नाणेसदृश तिकिटाआधारे हे प्रवेशद्वार प्रवाशाकरिता खुले होते. त्यामुळे मध्य रेल्वेनेही असाच काहीसा प्रयोग सीएसएमटी स्थानकातील मेल-एक्स्प्रेस स्थानकाच्या प्रवेशद्वारावर करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार ऑक्टोबर २०२० मध्ये स्वयंचलित प्रवेशद्वार बसवण्यात आले. यामध्ये क्यूआर कोड स्कॅनर आणि थर्मल स्कॅनिंगही होते. प्रवेशासाठी प्रवाशांना क्यूआर कोड असलेले तिकीट प्रवेशद्वारावरील क्यूआर कोड स्कॅनरसमोर दाखवावे लागते. तिकीट तपशील आणि तापमान तपासणी केल्यानंतर प्रवेश मिळतो.

सीएसएमटी उपनगरीय स्थानकातही हाच प्रयोग करण्याचा निर्णय

टर्मिनसवरील प्रयोगानंतर सीएसएमटी उपनगरीय स्थानकातही हाच प्रयोग करण्याचा निर्णय घेतला आहे. नेमक्या कोणत्या प्रवेशद्वारावर हा प्रयोग यशस्वी होईल, याची चाचपणी सुरू आहे. मेल-एक्स्प्रेस स्थानकात बसवण्यात आलेल्या स्वयंचलित प्रवेशद्वारामुळे काही तांत्रिक समस्या उद्भवत आहेत. उदाहरणार्थ प्रवेशद्वार उघड-बंद होण्यास थोडा वेळ लागतो. या समस्या दूर करता येतील तसेच उपनगरीय मार्गावर हा प्रयोग यशस्वी ठरेल का, हे तपासले जात असल्याचे एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.

उपनगरीय स्थानकातून प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या जास्त असते. त्यामुळे या प्रयोगाबाबत रेल्वे सावध भूमिका घेत आहे. साधारण जानेवारीनंतर या प्रयोगाला सुरुवात होईल. उपनगरीय प्रवाशांनाही देण्यात येणाऱ्या लोकल प्रवासावरील तिकीट व पासावर क्यूआर कोड दिले जातील. त्यानंतर प्रवेशद्वारातून बाहेर जाताना किंवा प्रवेश करताना तिकिटावरील क्यूआर कोडचा वापर करावा लागेल, अशी त्यामागील संकल्पना आहे.

प्रवाशांच्या संख्येनुसार प्रवेशद्वाराची गरज

सीएसएमटी’ स्थानकातून टाळेबंदीआधी ५ लाख ८९ हजार प्रवासी दररोज प्रवास करतात. इतक्या प्रवाशांसाठी स्वयंचलित प्रवेशद्वार तापदायकही ठरू शकतात. त्याचा रेल्वेला कितपत फायदा होईल, हे सांगणेही कठीण असल्याचे सूत्रांनी सांगितले. एखाद्या स्थानकातून प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या जास्त असेल तर त्या स्थानकात अधिकाधिक अधिकृत प्रवेशद्वार असणे गरजेचे आहे, असे म्हटले जात आहे.

उपनगरीय स्थानकात स्वयंचलित प्रवेशद्वाराचे बंधन कितपत यशस्वी होईल, असा प्रश्न उपस्थित झाला आहे.

आमच्या आणखी बातम्या पाहण्यासाठी क्लिक करा : webnewswala.com आमच्या सर्व बातम्यांसाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | youtube | Sharechat | Copyright © Webnewswala All rights reserved.

Related posts

‘बाबा का ढाबा’ आता झोमॅटोवर

Team webnewswala

रेल्वे वाहतुकीच्या नियोजनासाठी 139 क्रमांकाची सुरुवात

Web News Wala

Covid Center मध्ये आरोग्य कर्मचाऱ्यांचा गरबा Video Viral

Team webnewswala

Leave a Reply