Team WebNewsWala
आंतरराष्ट्रीय आरोग्य पर्यावरण

ऑस्ट्रेलिया उंदरांमुळे त्रस्त; भारताकडे 5 हजार लिटर विषाची मागणी

ऑस्ट्रेलिया उंदरांमुळे त्रस्त; भारताकडे 5 हजार लिटर विषाची मागणी

Webnewswala Online Team – जगात सध्या कोविड 19 च्या साथीचा उद्रेक सुरु आहे. एकीकडे जग कोरोनाला संपवण्यासाठी प्रयत्न करत आहे, तर दुसरीकडे ऑस्ट्रेलियाला आणखी एक संकटाचा सामना करावा लागत आहे. ऑस्ट्रेलियामध्ये उंदरांमुळे दहशत निर्माण झाली आहे. ऑस्ट्रेलिया उंदरांमुळे त्रस्त झाली आहे. ऑस्ट्रेलियात उंदरांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याने तेथे Biblical Plague जाहीर करण्यात आला आहे. तेथील सरकारने भारताकडून 5000 लिटर ब्रॉमेडीओलोन विषाची मागणी केली आहे, जेणेकरून उंदरांच्या या समस्येचा नायनाट करता यावा.

मोठ्या प्रमाणात उंदीर असल्यामुळे ऑस्ट्रेलियातील शेतकरी त्रस्त झाले आहेत. उंदीर त्यांचे पीक नष्ट करत आहेत. परिस्थिती इतकी भंयकर बनली आहे की लोकांच्या अंथरुणात घुसून उंदीर लोकांना चावा घेत आहेत. एका कुटुंबाच्या घराला लागलेल्या आगीसाठी त्यांनी उंदरांना जबाबदार ठरवलं. कारण वायर चावल्याने शॉर्ट सर्कीट होऊन आग लागली होती. उंदरांमुळे निर्माण झालेल्या कठीन स्थितीमुळे यावर तोडगा काढण्यासाठी तेथील सरकार प्रयत्न करत आहे.

उंदरांची संख्या कमी न झाल्यास आर्थिक आणि सामाजिक संकट

कृषिमंत्री अ‍ॅडम मार्शल यांनी सांगितली की, आम्ही सध्या एका गंभीर समस्येतून जात आहोत. आम्ही लवकरात लवकर उंदीरांची संख्या कमी केली नाही तर ग्रामीण आणि न्यू साउथ वेल्समध्ये आम्हाला संपूर्ण आर्थिक आणि सामाजिक संकटाचा सामना करावा लागू शकतो.

ऑस्ट्रेलियातील न्यू साउथ वेल्स राज्याच्या सरकारने या घटनेचे अभूतपूर्व असे वर्णन केले आहे. ब्रुस बार्नेस नावाच्या एका शेतकऱ्याने सांगितले की, मध्य न्यू साऊथ वेल्स शहर बोगन गेटच्या जवळ त्याच्या शेतात पिक लावून तो एका प्रकारे जुगार खेळत आहे. आम्ही फक्त पेरणी करत आहोत आणि आशा आहे की मेहनत वाया जाणार नाही.

अनेक लोक आजारी पडत आहेत

अहवालानुसार उंदीर सर्वत्र आढळत आहेत. ते शेतात, घरे, छतावर, शाळा आणि रुग्णालयांना फर्निचरमध्ये आढळत आहेत. यामुळे लोक त्रस्त आहेत. बरेच लोक यापासून आजारी पडल्याच्या बातम्या देखील आल्या आहेत.

Web Title – ऑस्ट्रेलिया उंदरांमुळे त्रस्त; भारताकडे 5 हजार लिटर विषाची मागणी ( Australia plagued by rats; Demand for 5,000 liters of poison from India )

webnewswala.com च्या Youtube चॅनेल वरील ताज्या बातम्या

आमच्या आणखी बातम्या पाहण्यासाठी क्लिक करा :webnewswala.com आमच्या सर्व बातम्यांसाठी फॉलो करा :फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | youtube | Sharechat | Copyright © Webnewswala All rights reserved.

 

Related posts

रामदेव बाबा नी मारल्या 10 सेकंदात 18 दोरीच्या उड्या

Team webnewswala

सिगल पक्षांच्या संरक्षणासाठी Yeur Environmental Society ची जनजागृती मोहीम

Web News Wala

अंबानी कुटुंब आशियातील दुसर्‍या श्रीमंत व्यक्तीपेक्षा दुप्पट श्रीमंत

Team webnewswala

Leave a Reply