Team WebNewsWala
आंतरराष्ट्रीय मनोरंजन व्यापार

James Bond च्या पहिल्या पिस्तुलाचा लिलाव

James Bond चित्रपटांमध्ये वापरल्या गेलेल्या एका पिस्तुलाचा लिलाव करण्यात आला. हे पिस्तुल‘डॉक्टर नो’ या चित्रपटात वापरलं होतं.

अलिकडेच जेम्स बॉण्ड चित्रपटांमध्ये वापरल्या गेलेल्या एका पिस्तुलाचा लिलाव करण्यात आला. जूलियन ऑक्शनने दिलेल्या माहितीनुसार हे पिस्तुल १९६२ साली सॅन कॉनरी यांनी ‘डॉक्टर नो’ या चित्रपटात वापरलं होतं. बॉण्ड फ्रेंचाईजीमधील हा पहिला चित्रपट होता. लक्षवेधी बाब म्हणजे हे पिस्तुल २ लाख ५६ हजार अमेरिकी डॉलर्स म्हणजेच जवळपास १ कोटी ९० लाख रुपयांना विकलं गेलं.

सॅन कॉनरी यांनी या पिस्तुलाला बॉण्ड शॉट्स असं नाव दिलं होतं.

सात चित्रपटात या पिस्तुलाचा केला वापर

कॉनरी यांचा मित्र ख्रिस्तोफर वूड यांनी या पिस्तुलाची निर्मिती केली होती. त्या काळात चित्रपटांमध्ये वजनदार पिस्तुलांचा ट्रेंड होता. याच्या बरोबर उलट वूड यांनी एका हलक्या पिस्तुलाची निर्मिती केली होती. हे पिस्तुल पकडून स्टंट करणं सोपं जात होतं. त्यामुळे हे त्यांचं आवडतं पिस्तुल होतं. त्यांनी आपल्या करिअरमध्ये एकूण सात बॉण्डपटांमध्ये काम केलं. अन् या सातही चित्रपटात त्यांनी या पिस्तुलाचा वापर केलेला आहे. या पार्श्वभूमीवर हे लहानसं पिस्तुल कोट्यवधी रुपयांना विकलं गेलं.

आमच्या आणखी बातम्या पाहण्यासाठी क्लिक करा : webnewswala.com आमच्या सर्व बातम्यांसाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | youtube | Sharechat | Copyright © Webnewswala All rights reserved.

Related posts

जगात सर्वप्रथम कोरोना लस घेतलेल्या विल्यम शेक्सपिअर यांचे निधन

Web News Wala

आसनगावात ऊर्जा प्रकल्पातील राखेच्या वाहतुकीवरून रण

Team webnewswala

तरुणाई व्यसनाच्या विळख्यात जगभरात 1.1 अब्ज स्मोकर्स

Web News Wala

Leave a Reply