Team WebNewsWala
क्रीडा राष्ट्रीय

IPL 14 साठी १८ किंवा १९ फेब्रुवारीला लिलाव

IPL 14 हंगामासाठी १८ किंवा १९ फेब्रुवारी रोजी खेळाडूंचा लिलाव होणार आहे. या संदर्भातील घोषणा लवकरच होणार असल्याची माहिती अधिकाऱ्याने दिली. 
मुंबईः  IPL14 हंगामासाठी १८ किंवा १९ फेब्रुवारी रोजी चेन्नईत खेळाडूंचा लिलाव होणार आहे. या संदर्भातील अधिकृत घोषणा लवकरच होणार असल्याची माहिती बीसीसीआयच्या एका अधिकाऱ्याने दिली.
चेन्नईत खेळाडूंचा लिलाव होणार

भारतात आयपीएलचा चौदावा हंगाम होणार की यावेळीही संयुक्त अरब आमिराती येथे स्पर्धा खेळवली जाणार हे अद्याप जाहीर झालेले नाही. मात्र आयपीएलच्या चौदाव्या हंगामासाठी १८ किंवा १९ फेब्रुवारी रोजी चेन्नईत खेळाडूंचा लिलाव होणार आहे. या संदर्भातला अंतिम निर्णय सर्व संघांच्या व्यवस्थापनांशी चर्चा करुन लवकरच जाहीर केला जाणार आहे.

बीसीसीआयने आधीच केलेल्या घोषणेनुसार आयपीएलच्या चौदाव्या हंगामात आठ संघ खेळतील. ज्या संघांनी तेराव्या हंगामात भाग घेतला ते सर्व संघ चौदाव्या हंगामात खेळणार आहेत. पण पंधराव्या हंगामात म्हणजे २०२२ मध्ये आयपीएलमध्ये सध्याच्या आठ संघांसोबत आणखी दोन संघ खेळतील. यामुळे आयपीएलच्या पंधराव्या हंगामातील संघांची संख्या दहा असेल.

भारत आणि इंग्लंड यांच्यातील पहिल्या दोन कसोटी चेन्नईत आहेत. पहिली कसोटी ५ ते ९ फेब्रुवारी आणि दुसरी कसोटी १३ ते १७ फेब्रुवारी या कालावधीत होणार आहे. हे दोन्ही सामने चेन्नईत एमए चिदंबरम स्टेडियम येथे होणार आहेत. दुसरा कसोटी सामना झाल्यानंतर दोन्ही संघातील खेळाडू चेन्नईतच थांबतील. तसेच जे इतर खेळाडू लिलावात सहभागी होणार आहेत ते लिलावासाठी चेन्नईत पोहोचतील. खेळाडूंचा लिलाव १८ किंवा १९ फेब्रुवारी रोजी चेन्नईत पार पडेल. यानंतर भारत आणि इंग्लंडचा संघ अहमदाबादला रवाना होणार आहे.

अहमदाबादमध्ये भारतीय संघ तिसरी आणि चौथी कसोटी तसेच पाच टी-२० सामन्यांची मालिका खेळणार आहे. इंग्लंडच्या भारत दौऱ्याची सांगता पुण्यात भारताविरुद्धच्या तीन एकदिवसीय सामन्यांनी (वन डे) होणार आहे. कोरोना संकटाचे भान ठेवून बीसीसीआयने फक्त चेन्नई, अहमदाबाद आणि पुणे या तीन शहरांमध्येच क्रिकेट सामन्यांचे आयोजन केले आहे.

करारातून मुक्त झालेल्या खेळाडूंचा नव्याने लिलाव

आयपीएलच्या चौदाव्या हंगामाआधी ज्या संघ व्यवस्थापनांना त्यांच्या एक किंवा त्यापेक्षा जास्त खेळाडूंना करारातून मुक्त करायचे असेल त्यांना तशी संधी देण्यात आली आहे. करारातून मुक्त झालेल्या खेळाडूंचा नव्याने लिलाव होणार आहे. बीसीसीआय २०२१ आयपीएल स्पर्धा, २०२१ टी ट्वेंटी वर्ल्ड कप स्पर्धा तसेच महिला क्रिकेट आणि इतर देशांतर्गत क्रिकेट स्पर्धांच्या आयोजनाची तयारी करत आहे. आयपीएल स्पर्धेचा भाग म्हणून चेन्नईत खेळाडूंचा लिलाव होणार आहे.

आमच्या आणखी बातम्या पाहण्यासाठी क्लिक करा : webnewswala.com आमच्या सर्व बातम्यांसाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | youtube | Sharechat | Copyright © Webnewswala All rights reserved.

Related posts

Kia Motors बहुचर्चित Kia Sonet कॉम्पक्ट एसयूव्ही लाँच

Team webnewswala

Ola Uber स्वस्त दरात उपलब्ध होण्याची शक्यता

Team webnewswala

पंतप्रधान मोदींचे आवाहन या वेबसाईट ला नक्की भेट द्या

Team webnewswala

Leave a Reply