Team WebNewsWala
शहर

वसई-विरार महापालिकेचे सहाय्यक आयुक्त बेपत्ता

वसई-विरार महापालिकेचे सहाय्यक आयुक्त प्रेमसिंग जाधव गेल्या दोन दिवसांपासून बेपत्ता आहेत. महानगरपालिकेत मागच्या एक वर्षापासून कोरोना रुग्णांची विल्हेवाट लावण्याचा प्रभारी पदभार प्रेमसिंग जाधव यांच्याकडे होता.

वसई-विरार महापालिकेचे सहाय्यक आयुक्त बेपत्ता

Webnewswala Online Team – वसई-विरार महापालिकेचे सहाय्यक आयुक्त प्रेमसिंग जाधव गेल्या दोन दिवसांपासून बेपत्ता आहेत. महानगरपालिकेत मागच्या एक वर्षापासून कोरोना रुग्णांची विल्हेवाट लावण्याचा प्रभारी पदभार प्रेमसिंग जाधव यांच्याकडे होता.

प्रेमसिंग जाधव यांनी सहाय्यक आयुक्तपदावर काम करताना वसई-विरार शहरातील अनेक अनधिकृत बांधकामेही भुईसपाट केलेली आहेत. दोन जून रोजी कामावरून सुटल्यानंतर ते घरी परतलेच नाहीत. याबाबत विरार पोलीस ठाण्यात बेपत्ता असल्याची तक्रार त्यांच्या कुटुंबियांकडून देण्यात आली आहे.

पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, प्रेमसिंग जाधव यांचे शेवटचे लोकेशन विरार रेल्वे स्थानकातले असल्याचे समजले असून पोलीस अधिक तपास करीत आहेत. जाधव हे अचानक बेपत्ता झाल्याने महापालिका वर्तुळात खळबळ उडाली आहे. त्यांना बेपत्ता केले की बेपत्ता झाले, याविषयी पोलीस तपास करीत आहेत.

Web Title – वसई-विरार महापालिकेचे सहाय्यक आयुक्त बेपत्ता ( Assistant Commissioner of Vasai-Virar Municipal Corporation goes missing )

webnewswala.com च्या Youtube चॅनेल वरील ताज्या बातम्या

आमच्या आणखी बातम्या पाहण्यासाठी क्लिक करा :webnewswala.com आमच्या सर्व बातम्यांसाठी फॉलो करा :फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | youtube | Sharechat | Copyright © Webnewswala All rights reserved.

 

Related posts

कोस्टल रोड साठी मुंबईच्या समुद्रात महाकाय दगडांचा भराव

Web News Wala

मोबाईल वापरून घरबसल्या मिळवा LPG सबसिडी

Web News Wala

मल्टिप्लेक्सच्या प्रत्येक खेळासाठी १००० रुपये रंगभूमी कर

Team webnewswala

Leave a Reply