Other पर्यावरण पोटोबा राष्ट्रीय व्यापार

भारतात पहिल्यांदाच हींग शेतीचा प्रयोग

भारतात पहिल्यांदाच हींग शेतीचा प्रयोग (heeng / Asafoetida) होत आहे हिमाचल प्रदेश, उत्तराखंड आणि लडाखमध्ये हींग शेतीसाठी योग्य वातावरण असलेल्या थंड प्रदेशात हा प्रयोग सुरू आहे.

भारतात पहिल्यांदाच हींग शेतीचा प्रयोग (heeng / Asafoetida) होत आहे (scientists are trying to cultivate heeng in India). हिमाचल प्रदेश (Himachal Pradesh), उत्तराखंड (Uttarakhand) आणि लडाखमध्ये (Ladakh) हींग शेतीसाठी योग्य वातावरण असलेल्या थंड प्रदेशात हा प्रयोग सुरू आहे.

२०१६ पासून भारतात हींग शेतीचे प्रयोग सुरू आहेत. आता या प्रयोगांचा पुढचा टप्पा सुरू आहे. हे प्रयोग यशस्वी झाल्यास भारतीयांची मागणी पूर्ण करण्यासाठी देशात मर्यादीत प्रमाणात हींग शेती सुरू होईल. उर्वरित मागणीसाठी भारताला हींग आयात (import) करावे लागेल. सध्या हींग या पदार्थासाठी भारत पूर्णपणे आयातीवर अवलंबून आहे.

भारतात हिंगाचा वापर ही सामान्य बाब

भारतातील घराघरात (Indian Houses) स्वयंपाक करण्यासाठी हींग वापरतात. पोटदुखीच्या (stomach pain) त्रासावर घरगुती उपाय म्हणून हींग सेवनाचा सल्ला दिला जातो. देशात हिंगाचा वापर ही सामान्य बाब आहे. पण भारतीय स्वयंपाक घरात (kitchen) वापरले जाणारे हींग देशात पिकत नाही. भारतामध्ये हींग शेती होत नाही.

भारत दरवर्षी ६०० कोटींचे १२०० मेट्रिक टन हींग करतो आयात

देशात हिंगाची शेती होत नसल्यामुळे भारतीयांची मागणी पूर्ण करण्यासाठी दरवर्षी परदेशातून हींग मोठ्या प्रमाणावर आयात केले जाते. प्रामुख्याने अफगाणिस्तान (Afghanistan), इराण (Iran) आणि उझबेकिस्तान (Uzbekistan) या देशांमधून भारत हींग आयात करतो. दरवर्षी सुमारे ६०० कोटी रुपयांचे १२०० मेट्रिक टन हींग भारत आयात करतो. या परिस्थितीत बदल व्हावा आणि भारताची हींग आयात कमी व्हावी यासाठी देशात हींग शेतीचा प्रयोग सुरू आहे. प्रयोग यशस्वी झाला आणि हींग शेती करणे शक्य झाले तर किमान काही कोटी रुपयांची बचत होईल. आयात कमी होईल.

भारत दरवर्षी ६०० कोटींचे १२०० मेट्रिक टन हींग करतो आयातशेतीचा प्रयोग यशस्वी झाल्यास आयात कमी करणे होईल शक्य

हिंगाच्या जगातील एकूण खपापैकी ४० टक्के खप फक्त भारतात

भारतात पहिल्यांदाच हींग शेतीचा प्रयोग (heeng / Asafoetida) होत आहे हिमाचल प्रदेश, उत्तराखंड आणि लडाखमध्ये हींग शेतीसाठी योग्य वातावरण असलेल्या थंड प्रदेशात हा प्रयोग सुरू आहे.

जगात जेवढ्या प्रमाणात हिंगाचा खप होतो त्यापैकी किमान ४० टक्के हींग भारतात खपते. अशा परिस्थितीत भारतात हींग शेती शक्य झाली तर देशाचा मोठा फायदा होईल. टप्प्याटप्प्याने हिंगाच्या बाबतीत भारत आत्मनिर्भर होत जाईल. हींग आयातीवर खर्च होणाऱ्या पैशांपैकी काही रक्कम ही देशातील इतर आवश्यक योजनांकडे वळवणे शक्य होईल.

इन्स्टिट्युट ऑफ हिमालयन बायोरिसोर्स करत आहे हींग शेतीचा प्रयोग

भारतामध्ये पालमपूरची सीएसआयआर इन्स्टिट्युट ऑफ हिमालयन बायोरिसोर्स (Constituent Laboratory of the Council of Scientific and Industrial Research – Institute of Himalayan Bioresource Technology, Palampur – CSIR-IHBT, Palampur) ही संस्था हींग शेतीचे प्रयोग २०१६ पासून करत आहे.

आमच्या आणखी बातम्या पाहण्यासाठी क्लिक करा : webnewswala.com आमच्या सर्व बातम्यांसाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | youtube | Sharechat | Copyright © Webnewswala All rights reserved.

Related posts

लॉकडाउन इफेक्ट दूरसंचार कंपन्यांनी एप्रिलमध्ये गमावले ८२ लाख ग्राहक

Team webnewswala

James Bond च्या पहिल्या पिस्तुलाचा लिलाव

Team webnewswala

2021 च्या नोबेल शांतता पुरस्कारासाठी डोनाल्ड ट्रम्प नामांकित

Team webnewswala

Leave a Reply