Team WebNewsWala
Other आंतरराष्ट्रीय नोकरी शिक्षण

हार्वर्ड बिझिनेस स्कूल डीन पदी श्रीकांत दातार यांची नियुक्ती

अमेरिकेच्या प्रसिद्ध हार्वर्ड बिझिनेस स्कूलचे डीन म्हणून भारतीय वंशाचे श्रीकांत दातार यांची नियुक्ती करण्यात आली असून भारतीय वंशाच्याच असलेल्या नितीन नोहरीयाची जागा दातार घेतील.
वॉशिंग्टन – अमेरिकेच्या प्रसिद्ध हार्वर्ड बिझिनेस स्कूलचे डीन म्हणून भारतीय वंशाचे श्रीकांत दातार यांची नियुक्ती करण्यात आली असून भारतीय वंशाच्याच असलेल्या नितीन नोहरीयाची जागा दातार घेतील. हॉवर्ड बिझनेस स्कूलचे आर्थर लोव्हस डिकिन्सन बिझिनेस अ‍ॅडमिनिस्ट्रेशनचे प्राध्यापक आणि हार्वर्ड बिझिनेस स्कूल (एचबीएस) येथील विद्यापीठातील वरिष्ठ सहकारी डीन श्रीकांत दातार हे पुढील डीन असतील, अशी माहिती अध्यक्ष लॅरी बाको यांनी दिली.

हार्वर्ड बिझिनेस स्कूल डीन पदी श्रीकांत दातार यांची नियुक्ती या पदी दातार १ जानेवारी २०२१ पासून रुजू होतील.

एक नाविन्यपूर्ण शिक्षक, एक प्रतिष्ठित विद्वान आणि एक अनुभवी प्राध्यापक अशी श्रीकांत दातार यांची ओळख असल्याचे बाको नियुक्तीची घोषणा करताना म्हणाले.

त्याचबरोबर दातार व्यावसायिक शिक्षणाच्या भवितव्याविषयी अग्रगण्य विचारवंत म्हणून प्रसिद्ध आहेत. तसेच हॉवर्ड बिझनेस स्कूलमध्ये त्यांनी कोरोना महासाथीदरम्यान उद्र्भवलेल्या आव्हानंचा सामना करण्यासाठी मोलाची भूमिका बाजवली आहे.गेली २५ वर्षे त्यांनी हॉवर्ड बिझनेस स्कूलमध्ये अनेक पदांवर आपली सेवा बजावली असल्याचेही बाको यांनी नमूद केले. १ जानेवारी रोजी हार्वर्ड बिझिनेस स्कूलच्या डीन पदाचा पदभार श्रीकांत दातार स्वीकारतील.

सुरूवातीचे शिक्षण मुंबई विद्यापीठातून 

मुंबई विद्यापीठातून दातार यांनी आपले सुरूवातीचे शिक्षण पूर्ण केले. ते १९७३ मध्ये उत्तीर्ण झाले. चार्टर्ड अकाउंटंट झाल्यानंतर त्यांनी आयआयएम अहमदाबाद येथून पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा घेतल्यानंतर दातार यांनी स्टॅनफोर्ड विद्यापीठातून सांख्यिकी आणि अर्थशास्त्र विषयात पीएचडी केली. १९८४ ते १९८९ पर्यंत कार्नेगी मेलॉन ग्रॅज्युएट स्कूल ऑफ इंडस्ट्रियल अॅडमिनिस्ट्रेशनमध्ये सहयोगी प्राध्यापक म्हणून दातार कार्यरत होते. त्यानंतर ते १९९६ पर्यंत स्टॅनफोर्ड विद्यापीठाच्या बिझिनेस स्कूलमध्ये त्यांनी प्राध्यापक म्हणून सेवा बजावली. आयआयएम कोलकाताच्या गव्हनिंग बॉडीचाही दातार हे एक भाग आहेत. दातार हे हॉवर्ड बिझनेस स्कूलचे ११ डीन असतील.

आमच्या आणखी बातम्या पाहण्यासाठी क्लिक करा : webnewswala.com आमच्या सर्व बातम्यांसाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | youtube | Sharechat | Copyright © Webnewswala All rights reserved.

Related posts

EMI Moratorium वर तारीख पे तारिख

Team webnewswala

रिलायन्सची थ्रीडी जिओ ग्लास ची व्हर्च्युअल क्लासरूम

Team webnewswala

मराठी तरुणाने आणला shareit ला पर्याय SENDit

Team webnewswala

Leave a Reply