Team WebNewsWala
आंतरराष्ट्रीय तंत्रज्ञान व्यापार

अ‍ॅपल ची मोठी घोषणा ! ‘आयफोन’ मधील ‘I’ आता India

आपल्या देशातील तरुणाईमध्ये अ‍ॅपल आयफोनची जबरदस्त क्रेझ आहे. आयफोनला आपल्याकडे स्टेटस सिम्बॉल म्हणून देखील ओळखला जातो.

नवी दिल्ली – आपल्या देशातील तरुणाईमध्ये अ‍ॅपलच्या आयफोनची जबरदस्त क्रेझ आहे. आयफोनला आपल्याकडे स्टेटस सिम्बॉल म्हणून देखील ओळखला जातो. त्यामुळे आयफोनच्या नवीन मॉडलची सर्वांनाच उत्सुकता असते. पण हे फोन महाग असले तरी त्याचा मोठा ग्राहक आहे. त्यातच अ‍ॅपलने भारतीयांसाठी एक आनंदाची बातमी जाहीर केली आहे.

अ‍ॅपल आता आयफोन 11 ची निर्मिती करणार भारतात

अ‍ॅपल आता आयफोन 11 ची निर्मिती भारतात करणार असल्यामुळे आपल्या देशात प्रथमच आयफोनची निर्मिती होणार आहे. त्यामुळे केंद्र सरकारच्या मेक ईन इंडिया मोहिमेसाठी ही मोठी आनंदाची बातमी आहे.

त्याशिवाय चीनच्या कुरापतींमुळे देशात चिनी वस्तूंवर बहिष्कार घालण्याची मागणी जोर धरत असतानाच अ‍ॅपलच्या या निर्णयामुळे चीनलाही मोठा धक्का बसल्याची चर्चा सुरू झाली आहे. यासंदर्भातील वृत्त ‘इकॉनॉमिक टाईम्स’ने दिले आहे.

Apple's big announcement! The ‘I’ in the ‘iPhone’ will now be referred to as India

अ‍ॅपलच्या या फोनची निर्मिती चेन्नईत केली जाणार असून त्याचे उत्पादन टप्प्याटप्प्याने वाढवण्यात येणार आहे. भारतात तयार होणाऱ्या या आयफोन 11ची निर्यातही केली जाऊ शकते.

त्यामुळे चीनवर आता अधिक विसंबून राहणे कमी करता येईल, ‘असे उद्योग क्षेत्रातील दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांनी ‘इकॉनॉमिक टाईम्स’ला सांगितले.

भारतात चीनमध्ये तयार झालेल्या आयफोन 11 ची विक्री करण्याच्या पर्यायाचा विचार सध्या करत नसल्याचे अधिकाऱ्याने सांगितले. अ‍ॅपलच्या या निर्णयामुळे त्यांचा 22% आयात कर वाचणार आहे.

त्याचबरोबर आयफोन SE च्या निर्मितीचा विचार बंगळुरू येथील विस्ट्रोन प्लांट येथे सुरू असल्याचेही कंपनीकडून सांगण्यात आले आहे. production linked incentive (PLI) scheme चा फायदाही केंद्राकडून अ‍ॅपलला मिळणार आहे. देशातील अ‍ॅपल उप्तादनाच्या स्थानिकीकरणातही त्यांच्या या निर्णयामुळे वाढ होणार आहे. याशिवाय चीनबाहेर अ‍ॅपलला त्यांच्या उप्तादनाचे जाळे पसरवता येणार आहे.

हे ही वाचा
चीनी वस्तुंना विरोध केवळ दिखावा दोन मिनिटांत 1.5 लाख चिनी मोबाईलची बुकिंग
पाकिस्तानचा चीनला मोठा झटका चीनच्या अ‍ॅपवर घातली बंदी
नेपाळचा भारतीय वृत्तवाहिन्यांवर सर्जिकल स्ट्राईक
अ‍ॅपबंदीला वैतागली ByteDance अमेरिकेला विकणार टीक-टॉक ?

आमच्या आणखी बातम्या पाहण्यासाठी क्लिक करा : webnewswala.com आमच्या सर्व बातम्यांसाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | Youtube | Sharechat | Copyright © Webnewswala All rights reserved.

Related posts

लवकरच गुगलचे हे लोकप्रिय अ‍ॅप होणार बंद

Team webnewswala

मायक्रोसॉफ्टचं Internet Explorer अखेर निवृत्त होणार

Web News Wala

सोलापूरचे शिक्षक रणजीतसिंह डिसले यांना ग्लोबल टीचर पुरस्कार

Team webnewswala

4 comments

Leave a Reply