Team WebNewsWala
अर्थकारण तंत्रज्ञान मनोरंजन राष्ट्रीय सिनेमा

OTT चा चित्रपटगृह मालकांना आणखी एक मोठा धक्का

Social Media नंतर OTT साठी 15 दिवसांची 'डेडलाइन' दिली असून नव्या नियमांची अंमलबजावणी करण्यासाठी केंद्राकडून 15 दिवसांची मुदत देण्यात आली आहे.

मुंबई : देशभरातील निवडक राज्यांत १५ ऑक्टोबरपासून चित्रपटगृहे सुरू करण्याच्या तयारीत असणाऱ्या चित्रपटगृह मालकांना आणखी एक मोठा धक्का बसला आहे. मुंबई-महाराष्ट्र, दिल्ली अशा महत्त्वाच्या शहरांत चित्रपटगृहे सुरू होणार नसल्याने ज्या मोठ्या हिंदी चित्रपटांवर चित्रपटगृह मालकांची मदार होती, त्यातील काही हिंदी चित्रपटांनी प्रदर्शनासाठी ‘OTT’ ची वाट धरली आहे, तर अन्य चित्रपटांनी आपले प्रदर्शन आणखी पुढे ढकलले आहे. डिसेंबरपर्यंत हिंदी चित्रपट ‘ओटीटी’ वरच दाखवले जाणार असल्याने चित्रपटगृह चित्रपटगृह मालकांना आणखी एक मोठा धक्का आहे.

ऑक्टोबरमध्ये देशभरात चित्रपटगृहे सुरू झाली तर नोव्हेंबरमधील दिवाळीचा मुहूर्त आणि डिसेंबरचा सुट्टीचा माहौल लक्षात घेता ‘सूर्यवंशी’, ‘८३’, ‘कुली नं. १’ सारख्या मोठ्या हिंदी चित्रपटांच्या आधारे काहीएक व्यवसाय करता येईल, असे आडाखे चित्रपटगृह मालकांनी बांधले होते.

मात्र देशभरातील एकंदरीत चित्रपट व्यवसायापैकी सगळ्यात जास्त उत्पन्न हे मुंबई-महाराष्ट्रातून होत असल्याने जोवर सगळीकडे चित्रपटगृहे सुरू होणार नाहीत, तोवर चित्रपट प्रदर्शित करण्याचा धोका स्वीकारायला हिंदी चित्रपट निर्माते तयार नाहीत.

हिंदी चित्रपटांचा ३५ ते ४० टक्के  व्यवसाय मुंबईतूनच होतो, त्यामुळे इथले उत्पन्न घालवण्याचा धोका निर्माते घेऊच शकत नाहीत, अशी माहिती ट्रेड विश्लेषक अतुल मोहन यांनी दिली. अजूनही ६ ते ७ राज्ये वगळता अन्य ठिकाणी चित्रपटगृहे बंदच राहणार असल्याने मोठे निर्माते किमान या वर्षी तरी चित्रपट प्रदर्शित करणार नाहीत, असे त्यांनी सांगितले.

चित्रपट वितरक चित्रपटगृहे सुरू होण्याची वाट पाहत आहेत

गेल्या सहा महिन्यांपासून छोटे-मोठे चित्रपट वितरक चित्रपटगृहे सुरू होण्याची वाट पाहत आहेत. दसरा-दिवाळी जवळ आले आहेत, तरीही अजून चित्रपटगृहे सुरू करण्याच्या दृष्टीने राज्य सरकारने काहीही पाऊ ल उचलले नसल्याने ‘लक्ष्मी बॉम्ब’, ‘कुली नं. १’ हे दोन्ही मोठे चित्रपट ‘ओटीटी’ वर प्रदर्शित होणार आहेत. आणखी काही छोटे चित्रपट प्रदर्शित करता आले असते तर तेही ‘ओटीटी’वरच गेले असल्यामुळे चित्रपटगृह सुरू झाल्यावर दाखवायचे काय, असा सवाल ‘सिनेमा ओनर्स अ‍ॅण्ड एक्झिबिटर्स असोसिएशन ऑफ इंडिया’चे अध्यक्ष नितीन दातार यांनी केला.

आगामी चित्रपट

अभिनेता अक्षय कुमार याने दिवाळीच्या मुहूर्तावर ९ नोव्हेंबर रोजी ‘लक्ष्मी बॉम्ब’ हा बहुचर्चित चित्रपट ‘डिस्ने हॉटस्टार’ वर प्रदर्शित होणार असल्याची घोषणा केली आहे. त्यासाठी रोहित शेट्टी दिग्दर्शित ‘सूर्यवंशी’ या त्याच्या चित्रपटाचे प्रदर्शन पुढे ढकलण्यात आले आहे. तर अ‍ॅमेझॉन प्राइमनेही हिंदी, तमिळ, तेलुगू, मल्याळम भाषेतील नऊ नवीन चित्रपटांच्या प्रदर्शनाच्या तारखा जाहीर केल्या आहेत. यात वरुण धवनची मुख्य भूमिका असलेला ‘कुली नं. १’ नाताळच्या मुहूर्तावर २५ डिसेंबरला प्रदर्शित होणार आहे, त्याआधी ११ डिसेंबरला भूमी पेडणेकरचा ‘दुर्गावती’ आणि १३ नोव्हेंबरला राजकुमार रावचा ‘छलांग’ प्रदर्शित होणार आहेत.

आमच्या आणखी बातम्या पाहण्यासाठी क्लिक करा : webnewswala.com आमच्या सर्व बातम्यांसाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | youtube | Sharechat | Copyright © Webnewswala All rights reserved.

Related posts

राज्यसभेमध्ये बँक नियमन विधेयक मंजूर

Team webnewswala

पिरॅमिड वरील Tweet मुळे Elon Musk ला इजिप्तचे आमंत्रण

Team webnewswala

Google, Amazon ला 16 कोटी डॉलर्सचा दंड

Team webnewswala

Leave a Reply