आंतरराष्ट्रीय क्रीडा व्यापार

चीनला आणखी मोठा झटका, VIVO ची स्पॉन्सरशीप रद्द

IPL 2021 Update आयपीएल 2021 च्या उर्वरित सामने खेळवण्यासाठी बीसीसीआयनं 31 सामन्यांच्या आयोजनासाठी संयुक्त अरब अमिरातीची निवड केली.

आयपीएलचा मुख्य स्पॉन्सर असलेल्या VIVO कंपनीने यावर्षीसाठी आयपीएल स्पॉन्सरशिप न करण्याचा निर्णय घेतला आहे. व्यापारी संघटना, स्वदेशी जागरण मंच यांच्या विरोधानंतर बीसीसीआयने VIVO ची स्पॉन्सरशीप रद्द करण्याचा  निर्णय घेतल्याचे सांगितले जात आहे.

मात्र व्हिवो पुढील वर्षीच्या आयपीएलसाठी पुन्हा एकदा प्रमुख स्पॉन्सर असेल व बीसीसीआय आणि व्हिवोचा करार 2023 पर्यंत कायम असेल. यंदाच्या आयपीएल हंगामासाठी बीसीसीआय लवकरच नवीन स्पॉन्सरची घोषणा करण्याची शक्यता आहे.

सीमावादाच्या पार्श्वभूमीवर चीनी वस्तूंवर बहिष्कार टाकण्याची मागणी केली जात आहे. यामुळे VIVO ची स्पॉन्सरशीप रद्द करण्याची मागणीने जोर पकडला होता. असे असले तरी आयपीएल गर्व्हर्निंग काउसिंलने या चीनी कंपनीसोबत करार मोडला नव्हता. बीसीसीआयच्या या निर्णयाला कडाडून विरोध झाला होता.

व्हिवोने घेतला स्पॉन्सरशिपपासून ब्रेक

आता व्हिवोने या वर्षीसाठी आयपीएलच्या स्पॉन्सरशिपपासून ब्रेक घेण्याचा निर्णय घेतला आहे. व्हिवो करारांतर्गत बीसीसीआयला दरवर्षी 440 कोटी रुपये देते. हा करार 5 वर्षांचा होता व 2022 साली संपणार होता. मात्र आता यंदाचे वर्ष गाळून हा करार एकप्रकारे 2023 पर्यंत वाढविण्यात आला आहे.

आयपीएल 2020 च्या सत्राची सुरुवात 19 सप्टेंबरपासून दुबईमध्ये होणार असून, 10 नोव्हेंबरला अंतिम सामना खेळला जाईल.

आमच्या आणखी बातम्यांसाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | Youtube | Sharechat | Copyright © Webnewswala All rights reserved.

Related posts

General Atlantic ची Reliance मध्ये गुंतवणूक

Team webnewswala

IPL धमाका 19 सप्टेंबरपासून, बीसीसीआय सज्ज

Team webnewswala

व्हिएतनाममध्ये हवेतून कोरोनाचा संसर्ग ? सापडला धोकादायक व्हेरिएंट

Web News Wala

1 comment

Leave a Reply