Team WebNewsWala
Other मनोरंजन सिनेमा

रक्षाबंधनच्या मुहूर्तावर अक्षय कुमारच्या नव्या चित्रपटाची घोषणा

रक्षाबंधनच्या मुहूर्तावर अभिनेता अक्षय कुमारच्या नव्या चित्रपटाची घोषणा केली आहे. या चित्रपटाचा पोस्टर अक्षयने सोशल मीडियावर शेअर केला आहे

रक्षाबंधनच्या मुहूर्तावर अभिनेता अक्षय कुमारच्या नव्या चित्रपटाची घोषणा केली आहे. या चित्रपटाचा पोस्टर अक्षयने सोशल मीडियावर शेअर केला आहे. ‘रक्षाबंधन’ हेच चित्रपटाचं नाव असून त्यावरून हा चित्रपट बहीण-भावाच्या नात्यावर आधारित असल्याचं स्पष्ट होतंय. या पोस्टरमध्ये अक्षयसोबत त्याच्या चार बहिणी पाहायला मिळत आहेत. त्याच्या हातावर राख्यासुद्धा बांधलेल्या आहेत.

रक्षाबंधनच्या मुहूर्तावर अक्षय कुमारच्या नव्या चित्रपटाची घोषणा

‘बस बहनें देती है १००% रिटर्न’ अशी या चित्रपटाची टॅगलाइन आहे. ‘तुमच्या हृदयाला स्पर्श करणारी कथा आहे. माझ्या करिअरमध्ये मी आतापर्यंत सर्वांत कमी वेळात साइन केलेला हा चित्रपट आहे. हा चित्रपट मी माझी बहीण अल्का हिला आणि जगातलं सर्वांत खास बहीण-भावाच्या नात्याला समर्पित करतो’, असं कॅप्शन अक्षयने या पोस्टरला दिलं आहे.

या चित्रपटाची पटकथा हिमांशू शर्माने लिहिली असून आनंद एल राय याचं दिग्दर्शन करणार आहेत. ५ नोव्हेंबर २०२१ रोजी हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

बातम्या पाहण्यासाठी क्लिक करा : webnewswala.com आमच्या सर्व बातम्यांसाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | Youtube | Sharechat | Copyright © Webnewswala All rights reserved.

Related posts

सुशांतच्या चाहत्यांची दिल बेचारा ला अनोखी श्रद्धांजली

Team webnewswala

सुनील ग्रोवर च्या ‘सनफ्लॉवर’ चा टिझर रिलीज

Web News Wala

रशियात अडकलेल्या विद्यार्थ्यांसाठी सोनू सूद चे एअरलिफ्ट

Team webnewswala

Leave a Reply