Team WebNewsWala
आंतरराष्ट्रीय नोकरी

भारतीय वंशाचे अनिल सोनी WHO Foundation चे पहिले CEO

भारतीय वंशाचे आरोग्य क्षेत्रातील तज्ज्ञ अनिल सोनी यांना जागतिक आरोग्य संघटना फाऊंडेशनच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदी नियुक्त करण्यात आलं आहे.

भारतीय वंशाचे आरोग्य क्षेत्रातील तज्ज्ञ अनिल सोनी यांना जागतिक आरोग्य संघटना फाऊंडेशनच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदी नियुक्त करण्यात आलं आहे. आरोग्य विषयक समस्यांना तोंड देण्यासाठी जागतिक आरोग्य संघटनेनं या जागतिक आरोग्य संघटना फाऊंडेशनची निर्मिती केली आहे. अनिल सोनी हे या संघटनेचे पहिले मुख्य कार्यकारी अधिकारी बनले आहेत.

कधीपासून सांभाळणार कार्यभार

अनिल सोनी यांच्याकडे १ जानेवारीपासून मुख्य कार्यकारी अधिकारीपदाचा कार्यभार दिला जाणार आहे. या दरम्या त्यांची लक्ष्य आरोग्य क्षेत्रातील नव्या तंत्रज्ञानाचा वापर आणि त्याचा फायदा सामान्य लोकांपर्यंत पोहोचवण्याचा असणार आहे. जागतिक आरोग्य संघटनेनं करोना महासाथीच्या दरम्यान मे २०२० मध्ये जागतिक आरोग्य संघटना फाऊंडेशनची सुरूवात केली होती. आतापर्यंत अनिल सोनी हे ग्लोबव हेल्थकेअर कंपनी वियाट्रिस सोबत कार्यरत होते. ते ‘ग्लोबल इन्फेक्शन डिजिज’ चे प्रमुख म्हणून वियाट्रिसमध्ये सेवा बजावत होते.

दरम्यान, जागतिक आरोग्य संघटनेचे महासंचालक डॉ. टेड्रोस यांनी अनिल सोनी यांच्या कार्याची स्तुती केली आहे. तसंच सोनी हे आरोग्य क्षेत्रातील समस्यांचं निराकरण करण्यासाठी नवे प्रयोग करणारे असल्याचंही म्हटलं आहे. आज संपूर्ण जग कठीण वेळेतून पुढे जात आहे. अशात त्यांचे नवे विचार त्याचा सामना करण्याची संधी देणार असल्याचंही ते म्हणाले.

कोण आहेत सोनी

यापूर्वी अनिल सोनी हे क्लिंटन हेल्थ अॅक्सेसमध्येही कार्यरत होते. २००५ ते २०१० या कालावधीत त्यांनी या ठिकाणी सेवा बजावली. याव्यतिरिक्त सोनी यांनी बिल आणि मलिंडा गेट्स फाऊंडेशनच्या आरोग्य विभागातही कार्यभार सांभाळला होता. त्यांनी एचआयव्हीच्या उपचारांमध्येही मोलाची भूमिका बजावली आहे.

आमच्या आणखी बातम्या पाहण्यासाठी क्लिक करा : webnewswala.com आमच्या सर्व बातम्यांसाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | youtube | Sharechat | Copyright © Webnewswala All rights reserved.

Related posts

बंदीनंतरच्या दीड महिन्यात जाळ्यात मुबलक मासळी

Team webnewswala

Loan Moratorium सुप्रीम कोर्टाने दिला मोठा दिलासा

Team webnewswala

६ जिल्ह्यातील महिलांनी सुरू केली ट्रॅव्हल्स कंपनी

Team webnewswala

Leave a Reply