Team WebNewsWala
आंतरराष्ट्रीय क्रीडा

अनिल कुंबळेचा विक्रम धोक्यात, ‘या’ गोलंदाजाला रेकॉर्डसाठी 6 विकेट्सची गरज

गोलंदाज जेम्स अँडरसनचा डोळा कुंबळेच्या रेकॉर्डवर असणार आहे. अँडरसनला कसोटीमधील विकेट्सच्या बाबतीतअनिल कुंबळेचा विक्रम पछाडण्याची संधी आहे. 

अनिल कुंबळेचा विक्रम धोक्यात, ‘या’ गोलंदाजाला रेकॉर्डसाठी 6 विकेट्सची गरज 

Webnewswala Online Team – टीम इंडिया इंग्लंड दौऱ्यावर (India Tour England 2021) जाणार आहे. या दौऱ्यात भारतीय संघ वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप फायनल (World Test Championship Final 2021) आण इंग्लंड विरुद्ध कसोटी मालिका खेळणार आहे. या दौऱ्यासाठी टीम इंडियाने तयारी सुरु केली आहे. तर दुसऱ्या बाजूला इंग्लंडही या टेस्ट सीरिजसाठी सज्ज आहे. इंग्लंड भारताआधी न्यूझीलंड विरुद्ध 2 कसोटी सामन्यांची मालिका खेळणार आहे. या मालिकेत इंग्लंडचा वेगवान आणि अनुभवी गोलंदाज जेम्स अँडरसनचा (James Anderson) डोळा टीम इंडियाचा माजी फिरकीपटू (Anil Kumble) अनिल कुंबळेच्या रेकॉर्डवर असणार आहे. अँडरसनला कसोटीमधील विकेट्सच्या बाबतीत कुंबळेला पछाडण्याची संधी आहे.

अँडरसनच्या नावे 614 विकेट्स

38 वर्षीय अँडरसनला कुंबळेला पछाडण्यासाठी अवघ्या 6 विकेट्सची आवश्यकता आहे. अँडरसनने 2003 मध्ये कसोटी पदार्पण केलं होतं. अँडरसनने आतापर्यंत 160 कसोटींमध्ये 614 विकेट्स घेतल्या आहेत. तर कुंबळेच्या नावे 614 विकेट्सची नोंद आहे. त्यामुळे अँडरसनला कुंबळेचा रेकॉर्ड ब्रेक करण्यासाठी फक्त 6 विकेट्सची आवश्यकता आहे. अँडरसन कसोटीमध्ये सर्वाधिक विकेट्स घेण्याच्या बाबतीत चौथ्या क्रमांकावर आहे. तर कुंबळे 619 विकेट्ससह तिसऱ्या क्रमांकावर विराजमान आहे.

पहिल्या क्रमांकावर श्रीलंकेचा माजी दिग्गज फिरकी गोलंदाज मुथैय्या मुरलीधरन आहे. मुरलीधरनने आपल्या कसोटी कारकिर्दीत 800 विकेट्सचा टप्पा गाठला आहे. तर दुसऱ्या क्रमांकावर ऑस्ट्रेलियाचा स्टार फिरकीपटू शेन वॉर्न आहे. वॉर्नच्या नावे 708 विकेट्स आहेत. अँडरसन हा सर्वाधिक विकेट्स घेणारा सक्रीय (खेळत असलेला) गोलंदाज आहे. त्यामुळे अँडरसन हा विक्रम न्यूझीलंड विरुद्धच्या मालिकेत पूर्ण करणार की भारता विरुद्धच्या कसोटी मालिकेपर्यंत वाट पाहावी लागणार, याकडे क्रिकेट विश्वाचं लक्ष असणार आहे.

Web Title – अनिल कुंबळेचा विक्रम धोक्यात, ‘या’ गोलंदाजाला रेकॉर्डसाठी 6 विकेट्सची गरज ( Anil Kumble’s record in jeopardy, bowler needs 6 wickets for record )

webnewswala.com च्या Youtube चॅनेल वरील ताज्या बातम्या

आमच्या आणखी बातम्या पाहण्यासाठी क्लिक करा :webnewswala.com आमच्या सर्व बातम्यांसाठी फॉलो करा :फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | youtube | Sharechat | Copyright © Webnewswala All rights reserved.

 

Related posts

ग्रेटर नेपाळ च्या नावाखाली नेपाळ चा नैनिताल देहाराडून वर डोळा

Team webnewswala

तरुणाई व्यसनाच्या विळख्यात जगभरात 1.1 अब्ज स्मोकर्स

Web News Wala

2021 च्या नोबेल शांतता पुरस्कारासाठी डोनाल्ड ट्रम्प नामांकित

Team webnewswala

Leave a Reply