Team WebNewsWala
मनोरंजन

अनिल कपुर चा मराठी बाणा, गुजराथी प्रश्नाला मराठीत उत्तर

अनिल कपुर चा मराठी बाणा सध्या चर्चेचा विषय ठरत आहे कारण एका चाहतीने गुजरातीमध्ये विचारलेल्या प्रश्नाला अनिल कपूर यांनी थेट मराठीत उत्तर

बॉलिवूड अभिनेता अनिल कपूर AK vs AK या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीस आला आहे. याच चित्रपटानिमित्त नुकताच अनिल कपूर यांनी सोशल नेटवर्किंगवरुन आपल्या चाहत्यांशी संवाद साधला. #AkVsAk हा हॅशटॅग वापरुन मला प्रश्न विचारा मी उत्तर देईन असं सांगत अनिल यांनी चाहत्यांच्या अनेक प्रश्नांना दिलखुलासपणे उत्तरं दिलं. मात्र या सर्वांमध्ये अनिल कपुर चा मराठी बाणा सध्या चर्चेचा विषय ठरत आहे कारण एका चाहतीने गुजरातीमध्ये विचारलेल्या प्रश्नाला अनिल कपूर यांनी थेट मराठीत उत्तर दिलं आहे.

अनिल कपुर चा मराठी बाणा

युट्यूबर असणाऱ्या अदिती रावल या तरुणीने अनिल कपूर यांच्या AK vs AK या चित्रपटाचं कौतुक केलं. यामध्ये अनिल कपूर यांनी खूपच छान अभिनय केला आहे. पडद्यावर वावरताना ते अभिनय करत आहेत असं वाटतं नाही, अशा शब्दांमध्ये अदितीने गुजराती आणि इंग्रजी भाषेत अनिल कपूर यांचं कौतुक केलं. तसेच आपल्या या ५८ सेकंदांच्या व्हिडीओच्या शेवटी तिने अनिल कपूर यांना मला तुम्हाला भेटून तुमची मुलाखत घेण्याची इच्छा आहे असंही म्हटलं. हा व्हिडीओ ट्विट करताना अदितीने तुम्ही एवढी ऊर्जा कुठून आणता असा प्रश्न अनिल कपूर यांना #AkVsAk हा हॅशटॅग वापरुन विचारला.

सध्या हा रिप्लाय चर्चेचा विषय ठरतोय

मात्र त्यावर अदितीने मला ही भाषा समजत नाही असं उत्तर दिलं होतं. अनिल कपूर यांच्या मराठी चाहत्यांनी अदिती गुजराती असल्याने ती गुजराती भाषेतून चित्रपटांचे परिक्षण करते. त्यामुळे मुंबईकर असणाऱ्या अनिल कपूर यांनी तिला मराठीत उत्तर दिल्याचं या ट्विटला रिप्लाय करुन म्हटलं आहे.

अनिल कपूर यांनी नक्की मराठीत उत्तर का दिलं हे स्पष्ट झालं नसलं तरी त्यांनी गुजराती प्रश्नाला मराठीत दिलेलं उत्तर हा चर्चेचा विषय ठरत आहे.

आमच्या आणखी बातम्या पाहण्यासाठी क्लिक करा : webnewswala.com आमच्या सर्व बातम्यांसाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | youtube | Sharechat | Copyright © Webnewswala All rights reserved.

Related posts

मल्टिप्लेक्सच्या प्रत्येक खेळासाठी १००० रुपये रंगभूमी कर

Team webnewswala

बिग बॉस 14 मध्ये दोन नवे स्पर्धक करणार एण्ट्री

Team webnewswala

रामदेव बाबा नी मारल्या 10 सेकंदात 18 दोरीच्या उड्या

Team webnewswala

Leave a Reply