Team WebNewsWala
Other मनोरंजन शहर समाजकारण

स्वातंत्र्य दिन व वामनदादा कर्डक जयंतीनिमित्त ऑनलाइन कवी संमेलन

MumUni School of Thoughts अकादमीच्या वतीने स्वातंत्र्य दिन व महाकवी लोकशाहिर वामनदादा कर्डक यांच्या 98 व्या जयंतीनिमित्त ऑनलाइन कवी संमेलन रंगले. 

स्वातंत्र्य दिनानिमित्त व लोकशाहिर वामनदादा कर्डक यांच्या जयंतीनिमित्त १६ ऑगस्ट २०२० रोजी MumUni School of Thoughts मुमयुनी स्कूल ऑफ थॉटस या अकादमीच्या वतीने स्वातंत्र्य दिनानिमित्त व महाकवी लोकशाहिर वामनदादा कर्डक यांच्या 98 व्या जयंतीनिमित्त ऑनलाइन कवी संमेलन झूम अँप च्या माध्यमातून रंगले.

प्रा.संदीप कदम यांनी वामनदादा कर्डक यांचे जीवनचरित्र व काव्यकर्तृत्व आपल्या ओघवत्या शैलीत उलगडून दाखवले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा सहवास लाभलेले व शाबासकी मिळवणारे वामनदादा हे अखेरपर्यंत सच्चे भीमकवी राहिले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या मौलिक विचारांना वामनदादांनी आपली प्रेरणा मानली. तेच त्यांचे धन होते.

नक्की वाचा >>
MumUni School of Thoughts – समाजाचे ऋण फेडण्याचा प्रयत्न

डॉ. बाबासाहेब आंबेडकर ह्यांच्या जीवनचरित्राने व कर्तुत्वाने वामनदादा इतके प्रभावित झाले की तेच त्यांच्या कवितेचा विषय झाले आहेत. असे असले तरी त्यामधील आशयसूत्रांमध्ये कमालीची विविधता आढळते.

सहजतेत सौंदर्य निर्माण करणारी काव्यशैली, सोपे आणि दैनंदिन बोलीतील शब्द,सशक्त भावविभ्रम निर्माण करणारी भाषाशैली हे वामन दादांच्या काव्याचे विशेष आहेत. वामनदादांची काव्यसंपदा आंबेडकरी चळवळीचा ऐतिहासिक दस्तावेज आहे, असे प्रा.संदीप कदम यांनी मार्गदर्शन करतांना सांगितले.

नक्की वाचा >> 
MumUni School Of Thoughts च्यावतीने अण्णा भाऊ साठे यांना मानवंदना

मेरे बोल,नयी सोच, नया जोश!_ ‘ हया शीर्षकांतर्गत कविसंमेलनाचे ऑनलाईन कवी संमेलन घेण्यात आले. यावेळी देशावर आधारीत तर लोकशाहिर वामनदादा कर्डक यांच्या जीवणार कविता सादर करण्यात आल्या.

यात वैभवी अडसूळ, दीक्षा कदम, चरण जाधव, मिलिंद जाधव, अजिंक्य मस्के, प्रा.अनिल साबळे, प्रफुल्ल सावंत या कवींनी देशावर आधारित तर लोकशाहिर वामनदादा कर्डक यांच्या जीवनावर स्वरचित कविता सादर करत देशावर असलेले प्रेम व लोकशाहिर वामनदादा कर्डक यांच्या आठवणींना कावितेतून उजाळा दिला.

नक्की वाचा >> 
MumUni School of Thoughts च्या माध्यमातुन शिक्षणव्यवस्थेवर अभ्यासपूर्ण संयमी चर्चा

सदर कवी संमेलनाचे सूत्रसंचालन संदीप भांगरे यांनी केले. चरण जाधव व वैभवी अडसूळ यांनी गीत सादर केले. सदर कार्यक्रमाची तांत्रिक जबाबदारी मुमयुनी स्कूल ऑफ थॉटस चे प्रशासक प्रशांत भालेराव यांनी सांभाळली.

विविध उपक्रम आम्ही हाती घेतले असून, कवी ,गायक, सामाजिक कार्यकर्ते, शिक्षक कलावंत यांना आम्ही विचार मंच उपलब्ध करून देत असून विविध उपक्रम हाती घेतले आहेत असे मुमयुनी स्कूल ऑफ थॉटस चे प्रशासक प्रशांत भालेराव यांनी बोलताना सांगितले.

For contact email us at – mumunischoolofthoughts@gmail.com

नक्की वाचा >>
नैराश्यावर करा मात एक मिनिटाच्या फिल्ममध्ये उपाय

आमच्या आणखी बातम्या पाहण्यासाठी क्लिक करा : webnewswala.com आमच्या सर्व बातम्यांसाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | Youtube | Sharechat | Copyright © Webnewswala All rights reserved.

Related posts

मुंबईत आज बरे होणाऱ्यांची संख्या बाधितांपेक्षा 9 पटीने अधिक

Web News Wala

लवकरच गुगलचे हे लोकप्रिय अ‍ॅप होणार बंद

Team webnewswala

MumUni School Of Thoughts च्यावतीने अण्णा भाऊ साठे यांना मानवंदना

Team webnewswala

Leave a Reply