तंत्रज्ञान राष्ट्रीय व्यापार

एका idea ने उभा राहिला 100 कोटींचा startup

टिकेन्द्र, प्रतीक आणि संदीप. 2014 मध्ये हे त्यांनी एकत्र येत एक 100 कोटींचा startUp Idea सुरू केला.

एका idea ने उभा राहिला 100 कोटींचा startup

Webnewswala Online Team – पैसे कमावण्याचं स्वप्न अनेकांचं असतं, मात्र त्याकरता योग्य गुंतवणूक करणं आवश्यक आहे. एक छोटी बिझनेस आयडिया (Business Idea) तुम्हाला करोडपती बनवू शकते. नोएडामध्ये असंच काहीसं तीन मित्रांबरोबर घडलं आहे. या मित्रांची नावं आहेत- टिकेन्द्र, प्रतीक आणि संदीप. 2014 मध्ये हे तिघे वेगवेगळ्या प्रायव्हेट कंपनीमध्ये काम करत होते. त्यांनी एकत्र येत एक स्टार्टअप (StartUp Idea) सुरू केला आणि त्याचा वार्षिक टर्नओव्हर आज 100 कोटींचा आहे.

टिकेन्द्र, प्रतीक आणि संदीप. 2014 मध्ये हे त्यांनी एकत्र येत एक 100 कोटींचा startUp Idea सुरू केला.

टिकेंद्र आणि संदीप नोएडातील टेककंपनी सॅमसंगमध्ये काम करत होते. तर प्रतीक एक्सिकॉममध्ये काम करत होता. प्रतीक आणि टिकेंद्र रुममेट होते. एकेदिवशी तिघे दिल्लीबाहेर फिरायला गेले होते, त्यावेळी त्यांच्या गाडीतील इंधन संपलं. जवळपास 10 किमीपर्यंत त्यांना एकही फ्यूएल स्टेशन मिळालं नाही. त्यावेळी त्यांना ऑनलाइन डिझेलचा व्यवसाय करण्याची संकल्पना सूचली. 2015 साली त्यांनी पेपफ्यूएल डॉट कॉम www.pepfuel.com नावाने स्टार्टअप कंपनी सुरू केली.

सरकार द्वारे मान्यताप्राप्त स्टार्टअप

पेपफ्यूएल डॉट कॉम (Pepfuel.com) हा एक सरकारमान्य स्टार्टअप आहे. पेपफ्यूएलचे इंडियन ऑइलबरोबर थर्डपार्टी अॅग्रीमेंट आहे. हे स्टार्टअप डोर-टू-डोर डिलिव्हरी (online diesel delivery) साठी आहे. या App वर ग्राहक ऑनलाइन मेसेज करून ऑर्डर करू शकता.

कसा सुरू केला व्यवसाय ?

स्टार्टअपचे संस्थापक टिकेंद्र यांनी असं म्हटलं की, आम्ही त्यावर बरेच संशोधन केले. घरोघरी जाऊन लोकांशी बोललो आणि ऑनलाइन अभिप्राय मागवला. अभिप्रायात, प्रत्येक दुसऱ्या व्यक्तीने म्हटले की पेट्रोल आणि डिझेलसाठी एक ऑनलाइन अॅप असणे आवश्यक आहे. परंतू पेट्रोल आणि डिझेलच्या ऑनलाइन वितरणाचा व्यवसाय सुरू करणे अत्यंत धोकादायक आहे. टिकेंद्र म्हणतात की 2016 पर्यंत देशात पेट्रोल डिलिव्हरीची परवानगी नव्हती. अलीकडेच सरकारने यासाठी परवानगी दिली आहे. त्यावेळी आमच्यासमोर फक्त डिझेल डिलिव्हरी हा एकमेव पर्याय होता. आम्ही त्यावेळी फक्त डिझेल डिलिव्हरीचे काम सुरू केलं.

तेल कंपन्यांनी केलं सहकार्य

कंपनीचे दुसरे फाउंडर संदीप सांगतात की, आम्ही इंडियन ऑइल कॉर्पोरेशन (IOC), भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लि. (BPCL), पेट्रोलियम प्रोसेस इंजीनिअरिंग सर्व्हिस को. (PESCO) यांसारख्या कंपन्यांना प्रस्ताव दिला. ही स्टार्टअप आयडिया आम्ही PMO कडे देखील पाठवली. काही दिवसातच आम्हाला PMO कडून उत्तर मिळालं. दुसरीकडे फरीदाबाद स्थित इंडियन ऑइलने देखील आमच्या व्यवसायाचा डिटेल प्रोजेक्ट रिपोर्ट अर्थात DPR सुपूर्द करण्यास सांगितला.’ ते अशी माहिती देतात की इंडियन ऑइलला डीपीआर पाठवल्यानंतर त्यांच्याकडून अप्रुव्हल मिळाल्यानंतर या बिझनेसला सुरुवात झाली.

Web Title – एका idea ने उभा राहिला 100 कोटींचा startup ( An idea raised a 100 crore startup )

webnewswala.com च्या Youtube चॅनेल वरील ताज्या बातम्या

आमच्या आणखी बातम्या पाहण्यासाठी क्लिक करा :webnewswala.com आमच्या सर्व बातम्यांसाठी फॉलो करा :फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | youtube | Sharechat | Copyright © Webnewswala All rights reserved.

 

Related posts

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते गंगापूर धरणावरील पर्यटक संकुलाचे ई-उद्घाटन

Team webnewswala

‘कोरोनिल’ वरुन बाबा रामदेव अडचणीत कोर्टानं बजावले समन्स

Web News Wala

Google Pay साठी गुगलकडून गुड न्यूज

Team webnewswala

Leave a Reply