Team WebNewsWala
थोडक्यात

LPG गॅस सबसिडी मिळविण्याची सोपी पद्धत

लोकांना बर्‍याच काळापासून खात्यात LPG गॅस सबसिडी मिळत नाही.गेल्या काही महिन्यांत पुन्हा एकदा गॅस सिलिंडर्सच्या किंमती वेगाने वाढल्या आहेत.

LPG गॅस सबसिडी मिळविण्याची सोपी पद्धत

भारतातील घरगुती एलपीजीला मोठ्या प्रमाणात अनुदान मिळत आहे. LPG गॅसचे अनुदान वेगवेगळ्या राज्यात आधारित आहे. लोकांना बर्‍याच काळापासून खात्यात LPG गॅस सबसिडी मिळत नाही.गेल्या काही महिन्यांत पुन्हा एकदा गॅस सिलिंडर्सच्या किंमती वेगाने वाढल्या आहेत. त्यामुळे सिलिंडर LPG गॅस सबसिडी साधारण 10-20 रुपये राहीली आहे. पण आता सरकारने सब्सिडीची रक्कम वाढवली आहे. घरगुती LPG गॅस सबसिडी 153.86 रुपयांनी वाढवून 291.48 रुपये करण्यात आलीय. जर तुम्ही उज्ज्वला योजनेअंतर्गत कनेक्शन घेतलय तर तुम्हाला 312 रुपयांपर्यंत सब्सिडी मिळू शकते. जी आधी 174.86 रुपये होती.

तुम्हाला गॅस सिलिंडरवर सब्सिडी हवी असल्यास सब्ससिडी असलेल्या खात्याशी आधार कार्ड लिंक करावे लागले.

असे केल्यास तुमच्या खात्यात 300 रुपयांची सब्सिडी येईल. एलपीजी कनेक्शन आधारशी जोडलेले नसले तरी आपणास अनुदानाची रक्कम मिळणार नाही. अनुदान मिळण्यासाठी, एलपीजी कनेक्शनला आधारशी जोडणे देखील आवश्यक आहे.

तुम्ही घरबसल्या एलपीजी कनेक्शन आधार कार्ड लिंक करु शकता. इंडीयन ऑईलच्या ग्राहकांना https://cx.indianoil.in वर पूर्ण माहिती मिळेल. भारत गैसच्या ग्राहकांना https://ebharatgas.com वर जावे लागले.

चार महिन्यांआधी सिलिंडर 594 रुपयांना मिळत होता. आता दिल्लीत 819 रुपयांना मिळतोय. नोव्हेंबर ते मार्च दरम्यान सिलिंडरची किंमत 225 रुपयांनी वाढली.

सर्व प्रथम, आपण इंडियन ऑइलच्या वेबसाइट https://cx.indianoil.in/ वर जा.
त्यानंतर तुम्हाला Subsidy Status आणि Proceed दिसेल त्यावर क्लिक करा.
यानंतर आपण Subsidy Related (PAHAL) या ऑप्शन वर क्लिक करा.
त्यानंतर तुम्हाला Subsidy Not Received वर क्लिक करावे लागेल.
आता तुम्ही आपला रजिस्टर्ड मोबाइल नंबर आणि LPG ID भरावा लागेल
यानंतर याची पडताळणी करुन ते सबमिट करा असे केल्यावर आपल्याला संपूर्ण माहिती दिसेल.

अनुदानाची रक्कम मिळाली नसेल तर करा तक्रार दाखल

जर आपल्याकडे गॅस बुक केला असेल आणि अनुदानाची रक्कम मिळाली नसेल तर फीडबॅक बटणावर क्लिक करा येथून आपण अनुदानाची रक्कम न मिळाल्याची तक्रार देखील दाखल करू शकता.
या व्यतिरिक्त आपण अद्याप आपल्या खात्यासह एलपीजी आयडी लिंक केलेला नसेल तर आपण वितरकाकडे जा आणि आपले काम पूर्ण करा. आपण 18002333555 वर कॉल करून देखील तक्रार नोंदवू शकता.

► पेटीएमच्या माध्यमातून 100 रुपयांची सवलत 

तुम्ही गॅस बुकींग पेटीएमच्या माध्यमातून करत असाल तर पहिल्या वेळेस बुकिंग करणाऱ्यास 100 रुपयांची सवलत मिळेल. जर तुम्ही याआधी पेटीएमच्या माध्यमातून गॅस बुकींग केला नसेल तर तुम्ही या ऑफरचा फायदा घेऊ शकता.

Related posts

७००० रुपये प्रति लिटर गाढविणीच्या दुधाची देशातील पहिली डेअरी

Team webnewswala

अतिवृष्टीमुळे मुळे कोसळली विजयदुर्ग किल्ल्याची भिंत

Team webnewswala

काय सांगतात मैलाचे दगड जाणुन घ्या

Web News Wala

1 comment

मोबाईल वापरून घरबसल्या मिळवा LPG सबसिडी - Team WebNewsWala May 25, 2021 at 3:56 pm

[…] LPG गॅस सबसिडी मिळविण्याची सोपी पद्धत March 18, 2021146 […]

Reply

Leave a Reply