शहर सिनेमा

Saina Poster Trolling वर अमोल गुप्तेंचं सडेतोड उत्तर

Saina या चित्रपटाचं पोस्टर प्रदर्शित झालं आहे. काही प्रेक्षकांनी या चित्रपटाच्या टीझरचं कौतुक केलं तर काही जणांनी Saina Poster Trolling केलं
Saina Poster Trolling वर अमोल गुप्तेंचं सडेतोड उत्तर

नवी दिल्ली : नुकतंच सोशल मीडियावर सायना या चित्रपटाचं पोस्टर आणि टीझरही प्रदर्शित झालं आहे. काही प्रेक्षकांनी या चित्रपटाच्या टीझरचं कौतुक केलं आहे तर काही जणांनी मात्र Saina Poster Trolling केलं आहे. आता या चित्रपटाचे दिग्दर्शक अमोल गुप्ते यांनी या ट्रोलिंगवर आपली प्रतिक्रिया दिली आहे.

परिणीती चोप्राची प्रमुख भूमिका असलेल्या Saina ह्या चित्रपटाचं पोस्टर काही दिवसांपूर्वी प्रदर्शित करण्यात आलं. काही जण म्हणत आहेत की, बॅडमिंटन हा खेळ खालून खेळला जातो. सर्विससुद्धा खालून करतात. या चित्रपटाच्या टीमने टेनिसच्या चाहत्याकडून हे पोस्टर बनवून घेतलं आहे. त्यामुळे हे झालं असावं.

दिग्दर्शक अमोल गुप्ते यांनी केली खंत व्यक्त 

या चित्रपटाचे दिग्दर्शक अमोल गुप्ते यांनी खुलासा करत खंत व्यक्त केली आहे. त्यांनी आपल्या फेसबुक अकाऊंटवरून एक पोस्ट शेअर केली आहे. यात ते म्हणतात, “पोस्टरवर डिजीटल मीडियावरून बऱ्याच प्रकारच्या चर्चा होत आहेत. सगळं टेनिससारखं वाटत आहे…सायना सानिया बनली आहे वगैरे…”

टेनिसप्रेमीने सायना चे पोस्टर तयार केल्याचा आरोप

“जर सायना ते वर उडणारं शटल आहे तर हे सरळ आहे की राष्ट्रध्वजातले रंग असलेला तो रिस्टबँड बांधलेल्या त्या मुलीचा हात म्हणजे सायना आज ज्या उंचीवर आहे तिथपर्यंत पोहोचण्याची आकांक्षा बाळगणाऱ्या भारतीय मुलीचा हात आहे. राहुल नंदा यांनी उत्तम संकल्पनेतून हे पोस्टर तयार केलं पण दुर्दैवाची गोष्ट ही की, घाईघाईत प्रतिक्रिया देणाऱ्या या जगाला एवढ्या सविस्तरपणे समजावून सांगावं लागत आहे. काहीही बोलण्यापूर्वी विचार का करत नाही…विचार करा.”

सायना नेहवालच्या आयुष्यावर येणाऱ्या या चित्रपटात परिणीती चोप्रा प्रमुख भूमिकेत दिसणार आहे. हा चित्रपट 2020 मध्येच प्रदर्शित होणार होता. मात्र करोनाच्या संकटामुळे याचं प्रदर्शन लांबणीवर पडलं. या चित्रपटाचं दिग्दर्शन अमोल गुप्ते यांनी केलं असून निर्मिती भूषण कुमार यांची आहे.

आमच्या आणखी बातम्या पाहण्यासाठी क्लिक करा : webnewswala.com आमच्या सर्व बातम्यांसाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | youtube | Sharechat | Copyright © Webnewswala All rights reserved.

Related posts

डोंबिवली महानगर गॅस वहिनीसाठी खोदकाम करताना दुर्घटना

Web News Wala

अकरावीची प्रवेश प्रक्रिया मार्गी लावण्याच्या हालचाली

Team webnewswala

नंदनवन संस्थेची दिव्यांग विद्यार्थिनी सोनम पाटील हिला मिस व्हिलचेअर किताब

Web News Wala

Leave a Reply