Team WebNewsWala
मनोरंजन शहर

अमिताभ बच्चन सनी लिओनी बनले सख्खे शेजारी

भारतीय वंशाची कॅनेडियन सनी लिओनी आता एका दिग्गज अभिनेत्याचा रहिवास असलेल्या इमारतीत राहणार आहे. हा एक साधासुधा माणूस नसून 'अमिताभ बच्चन असून 'शहेनशहा' या नावानेही तो ओळखला जातो.

अमिताभ बच्चन सनी लिओनी बनले सख्खे शेजारी

Webnewswala Online Team – हिंदी चित्रपटसृष्टीत स्थिरावलेली मूळ भारतीय वंशाची कॅनेडियन सनी लिओनी आता एका दिग्गज अभिनेत्याचा रहिवास असलेल्या इमारतीत राहणार आहे. हा एक साधासुधा माणूस नसून ‘अमिताभ बच्चन असून ‘शहेनशहा’ या नावानेही तो ओळखला जातो.

बॉलीवूड सुपरस्टार अमिताभ बच्चन अभिनयाप्रमाणेच गुंतवणुकीतही आघाडीवर आहेत. बिग बींनी अलीकडेच पुन्हा एकदा मुंबईत एक मोठे आलिशान घर विकत घेतले आहे, जे आता चर्चेचा विषय बनले आहे.

5,184 चौरस फुटांचे नवीन घर 31 कोटी रुपयांमध्ये खरेदी

अमिताभ बच्चन यांनी मुंबईत तब्बल 5,184 चौरस फुटांचे नवीन घर 31 कोटी रुपयांमध्ये खरेदी केले आहे. अमिताभ बच्चन गेल्या बऱ्याच दिवसांपासून स्वत:साठी चांगला गुंतवणूक पर्याय शोधत होते. मात्र, आता त्यांचा हा शोध आता संपला आहे.

आपली वार्षिक संपत्ती आणि मानधनामुळे अमिताभ बच्चन चर्चेत असतात. या वयातही ते अतिशय उत्साहाने काम करताना दिसतात. आता देखील त्यांच्या हातात अनेक प्रोजेक्‍ट्‌स असून, ते कामात पूर्णपणे व्यस्त आहेत.

2020 च्या डिसेंबर महिन्यामध्ये अमिताभ बच्चन यांनी ही संपत्ती विकत घेतली आहे. मात्र, एप्रिल 2018मध्येच त्यांनी ही मालमत्ता नोंदवली होती. त्यावेळी अभिनेत्याने घरासाठी 2 टक्के मुद्रांक शुल्क भरले होते आणि 62 लाख रुपये देखील भरले होते.

अमिताभ बच्चन यांच्या या मालमत्तेची प्रति चौरस फूट किंमत सुमारे 60,000 रुपये आहे. या मालमत्तेत अमिताभ बच्चन यांना सहा कार पार्किंग मिळाल्या आहेत. त्यांचे नवीन घर 27 आणि 28 व्या मजल्यावर आहे.

लॉकडाऊनदरम्यान, मालमत्तांमध्ये गुंतवणूक करणाऱ्यांची मागणी वाढत असल्याचे दिसते आहे. इतकेच नाही तर तुम्हाला हे जाणून आश्‍चर्य वाटेल की, अमिताभ बच्चन च्या या इमारतीत अभिनेत्री सनी लिओनी चेही घर असणार आहे.

सनी लिओनी ने या इमारतीच्या 12 व्या मजल्यावर स्वत:साठी नवीन घर घेतले आहे. जिथे ती आपल्या कुटुंबीयांसमवेत राहायला येणार आहे. सनी लिओनी च्या या घराची किंमत तब्बल 16 कोटी रुपये आहे.

Web Title – अमिताभ बच्चन सनी लिओनी बनले सख्खे शेजारी ( Amitabh Bachchan became Sunny Leone’s neighbor )

webnewswala.com च्या Youtube चॅनेल वरील ताज्या बातम्या

आमच्या आणखी बातम्या पाहण्यासाठी क्लिक करा :webnewswala.com आमच्या सर्व बातम्यांसाठी फॉलो करा :फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | youtube | Sharechat | Copyright © Webnewswala All rights reserved.

 

Related posts

पर्यावरणाला घातक माशांची मांगूर पैदास

Web News Wala

लोटे एमआयडीसी मध्ये आगीचे सत्र सुरूच M R Farma कंपनीत आग

Web News Wala

फक्त सलमान खान साठी केला राधे चित्रपट – प्रवीण तरडे

Web News Wala

Leave a Reply