Team WebNewsWala
तंत्रज्ञान व्यापार समाजकारण

Myntra पाठोपाठ Amazon ने केला लोगोत बदल

Amazon changed the logo following Myntra

Myntra पाठोपाठ Amazon ने केला लोगोत बदल नेटकऱ्यांच्या विरोधापुढे अ‍ॅमेझॉन नमले अ‍ॅप लोगो मध्ये केला बदल

मुंबई : सोशल मीडिया ही खूप मोठी ताकद आहे आणि ही ताकद आपल्याला मान्य करायला हवीच. मागील काही महिन्यांपूर्वी Myntra या ऑनलाइन शॉपिंग अ‍ॅप विरोधात याचिका केली गेली आणि निकाल याचिकाकर्त्याच्या बाजूने लागला. मिंत्रा कंपनीला आपला लोगो बदलावा लागला. या नंतर सर्व नेटकरी खूपच सावध झाले. प्रत्येक कंपनीचा लोगो यावर बारीक लक्ष ठेवू लागले.

आता हेच पहा ना Amazon 25 जानेवारी 2021 रोजी त्यांचा नवीन अ‍ॅप लोगो अपडेट केला. लोगो अपडेट करताच ही बाब नेटीयन्स लोकांच्या लक्षात आली. अनेकांना हा लोगो खटकला. लोकांनी त्या लोगोला विरोध देखील दर्शविला.

अ‍ॅमेझॉन ला देखील घ्यावी लागली या विरोधाची दखल

शेवटी अ‍ॅमेझॉन ला देखील या गोष्टची दखल घ्यावी लागली आणि आपल्या लोगोमध्ये बदल करावा लागला. Amazon ने अगदी शांतपणे आपला लोगो यामध्ये बदल केला आणि नवीन बदल केलेला लोगो नेटीयन्सला दिसू लागला. नेटीयन्स लोकांनी देखील हा बदल आनंदाने स्वीकारला.

नेमके काय खटकत होते नेटीयन्स लोकांना 

अ‍ॅमेझॉनचा लोगो अशा प्रकारचा आहे. एक कार्डबोर्ड असून त्यावर अ‍ॅमेझॉनचा एक बाण असतो तो बाण म्हणजे स्माईली होय . त्या नंतर वरती निळ्या रंगाचा एक टेप असतो. या निळ्या रंगाच्या टेपवरुन खरा वाद सुरू झाला.

Myntra पाठोपाठ Amazon ने केला लोगोत बदल नेटकऱ्यांच्या विरोधापुढे अ‍ॅमेझॉन नमले अ‍ॅप लोगो मध्ये केला बदल 25 जानेवारी 2021 रोजी अ‍ॅप लोगो केला अपडेट

लोगो हिटलरच्या मिशाप्रमाणे

अ‍ॅमेझॉनने पहिला जो लोगो बनविला होता त्यामध्ये तो लोगो हिटलरच्या मिशाप्रमाणे दिसत होता. नेटीयन्स लोकांना हा लोगो अजिबात आवडला नाही. हा लोगो त्यांना नको होता. मग काय सोशल मिडियावर सुरू झाला एक नवीन वाद. अ‍ॅमेझॉनने हा लोगो बदलावा अशी मागणी नेटीयन्स करू लागले. अ‍ॅमेझॉननेही ही गोष्ट मान्य केली आणि लोगो मध्ये बदल केला. आता नवीन केलेला लोगो हा अतिशय साधा आहे. तो निळ्या रंगाचा टेप आता अर्धवट असा लावलेला आहे. अशा प्रकारे नेटकऱ्यांच्या विरोधापुढे अ‍ॅमेझॉनला देखील नमते घ्यावे लागले.

आमच्या आणखी बातम्या पाहण्यासाठी क्लिक करा : webnewswala.com आमच्या सर्व बातम्यांसाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | youtube | Sharechat | Copyright © Webnewswala All rights reserved.

Related posts

True Caller ला टक्कर देणार गुगल आणले भन्नाट फीचर

Team webnewswala

amzon ने आणली कर्नाटकाच्या झेंडयाची बिकिनी

Web News Wala

मंगळावर यान पाठवणारा पहिला मुस्लीम देश ठरला UAE

Team webnewswala

Leave a Reply