Team WebNewsWala
Other तंत्रज्ञान

Tik Tok ला पर्याय Instagram Reels

What happened without a tick? Same-to-same feature on Instagram now!

भारतात टिकटॉकवर बंदी घालण्यात आल्याने अनेक जण हिरमुसले असले तरी आता त्यांच्यासाठी इन्स्टाग्रामने शॉर्ट व्हिडीओला मनोरंजक पध्दतीत सादर करण्याची सुविधा देणारे रील्स हे फिचर भारतीय युजर्ससाठी सादर केले आहे.

भारतात अलीकडेच तब्बल ५९ चीनी अ‍ॅप्सवर बंदी लादण्यात आली असून यात टिकटॉकचाही समावेश आहे. टिकटॉकला भारतात तुफान लोकप्रियता मिळाली होती. देशात या अ‍ॅपचे अंदाजे ६० कोटी युजर्स होते. टिकटॉकवरील बंदीचे बहुतांश युजर्सनी स्वागत केले असले तरी अनेक जण हिरमुसले देखील आहेत. त्यांच्या साठी दिलासा देणारी बातमी आहे.

Tick ​​tock

Tik Tok ला पर्याय Instagram Reels

अगदी टिकटॉक प्रमाणेच १५ सेकंदाचा शॉर्ट व्हिडीओ अतिशय मनोरंजक पध्दतीत सादर करण्याची सुविधा देणारे रील्स हे फिचर आता भारतीय युजर्ससाठी सादर करण्यात आले आहे. गेल्या वर्षाच्या अखेरीस हे फिचर पहिल्यांदा ब्राझीलमध्ये सादर करण्यात आले होते. यानंतर जर्मनी, फ्रान्स आणि आता भारतात याला उपलब्ध करण्यात आले आहे.

Instagram Reels सर्व युजर्ससाठी उपलब्ध

टिकटॉकवर बंदी घातल्यानंतर याला प्रयोगात्मक अवस्थेत सादर करण्यात आले होते. आता मात्र सर्व युजर्ससाठी हे उपलब्ध करण्यात आल्याची माहिती इन्स्टाग्रामतर्फे देण्यात आली आहे.

भारतातील सर्व युजर्सला क्रमाक्रमाने हे फिचर देण्यात येत असून यासाठी आपल्या स्मार्टफोनमधील इन्स्टाग्रामच्या अ‍ॅपचे अपडेट असणे आवश्यक आहे.

Alternatives to Tik Tok Instagram Reels

टिकटॉकप्रमाणे १५ सेकंदाचा व्हिडीओ शेअर करण्याची सुविधा

इन्स्टाग्रामचे रील्स हे फिचर टिकटॉकप्रमाणे १५ सेकंदाचा व्हिडीओ हा ध्वनी आणि व्हिडीओच्या विविध इफेक्टसह शेअर करण्याची सुविधा देते. यात इन्स्टाग्रामवर खूप मोठी ऑडिओ लायब्ररी प्रदान करण्यात आलेली आहे. तसेच यात विविध व्हिडीओ इफेक्ट आणि एआर (ऑग्युमेंटेड रिअ‍ॅलिटी) फिल्टर्स देखील दिले असून याच्या मदतीने संबंधीत शॉर्ट व्हिडीओ हा अतिशय चित्ताकर्षक पध्दतीत तयार करून शेअर करता येईल.

कुणीही युजर या प्रकारे तयार करण्यात आलेला हा १५ सेकंदाचा व्हिडीओ स्टोरीज म्हणून वापरू शकतो. इन्स्टाग्रामवर आधीच स्टोरीज हे फिचर मोठ्या प्रमाणात लोकप्रिय झालेले आहे.

यातच आता या माध्यमातून टिकटॉकला टक्कर देण्याचा प्रयत्नदेखील इन्स्टाग्रामतर्फे करण्यात येत असून याला कितपत यश मिळणार हे आता पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

रील्सचा वापर करण्यासाठी इन्स्टाग्रामचा कॅमेरा ओपन करून खालील भागात दिसणार्‍या रील्स या नवीन पर्यायावर टिचकी मारावी लागणार आहे. नंतर येथून १५ सेकंदाचा व्हिडीओ तयार करता येईल. यात मल्टीपल व्हिडीओची सुविधा देखील देण्यात आलेली आहे. या माध्यमातून तयार करण्यात आलेला व्हिडीओ युजर शेअर करू शकतो.

What happened without a tick? Same-to-same feature on Instagram now!

Instagram Reels फिचरचा वापर कसा कराल ?

इन्स्टाग्रामवरील रील्स फिचरचा कुणीही सहजपणे वापर करू शकतो. यासाठी खालील स्टेप्स पूर्ण कराव्या लागणार आहेत.

१) इन्स्टाग्राम कॅमेर्‍याच्या खालील बाजूस असणार्‍या रील्स या पर्यायावर टिचकी मारा.

२) नंतर ऑडिओ या पर्यायाला निवडा. यात युजर म्युझिक लायब्ररीमध्ये उपलब्ध असणार्‍या गाण्यांमधून आपल्याला हवे ते गाणे सिलेक्ट करू शकतो. यात युजर स्वत:चा आवाज देखील रेकॉर्ड करून वापरू शकतो.

३) युजर या व्हिडीओला हवे ते एआर इफेक्ट वापरून याला आकर्षक स्वरूप देऊ शकतो.

४) युजरने तयार केलेला व्हिडीओ फास्ट अथवा स्लो-मोशन मध्ये करण्याची सुविधा देखील यात दिलेली आहे.

या सर्व स्टेप वापरून युजर रील्स या फिचरच्या मदतीने शॉर्ट व्हिडीओ तयार करून तो शेअर करू शकतो.

आमच्या आणखी बातम्या पाहण्यासाठी क्लिक करा : webnewswala.com आमच्या सर्व बातम्यांसाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | Youtube | Sharechat | Copyright © Webnewswala All rights reserved.

Related posts

मोबाईल नेटवर्क नसण्याच्या समस्येवर रामबाण उपाय

Web News Wala

पंतप्रधान मोदींचे आवाहन या वेबसाईट ला नक्की भेट द्या

Team webnewswala

बहीण-भावाच्या नात्याचा उत्सव यंदा डिजिटल स्वरूपात

Team webnewswala

4 comments

IAS ऐश्वर्या श्योराण फेक अकाउंट्समुळे त्रस्त पोलिसांकडे तक्रार - Web News Wala August 9, 2020 at 8:06 pm

[…] मॉडेल ऐश्वर्या श्योराण सध्या फेक इन्स्टाग्राम अकाउंट्स मुळे त्रस्त आहे. तिने या फेक अकाउंट्स […]

Reply
नोकरी शोधणाऱ्यांसाठी google चे नवीन app Kormo Jobs - Web News Wala August 20, 2020 at 4:01 pm

[…] Tik Tok ला पर्याय Instagram Reels […]

Reply
इंस्टाग्राम चे QR कोड फीचर, असा स्कॅन करा QR कोड - Web News Wala August 20, 2020 at 7:02 pm

[…] Tik Tok ला पर्याय Instagram Reels August 7, 2020August 5, 202042 […]

Reply

Leave a Reply