आंतरराष्ट्रीय व्यापार

एलन मस्क श्रीमंतांच्या यादीत दुसऱ्या क्रमांकावर

टेस्ला इंक आणि स्पेस एक्सचे फाऊंड एलन मस्क यांनी बिल गेट्सना मागे टाकत जगातल्या श्रीमंताच्या यादीत दुसरं स्थान मिळवलं आहे.

टेस्ला इंक आणि स्पेस एक्सचे फाऊंडर एलन मस्क यांनी बिल गेट्सना मागे टाकत जगातल्या श्रीमंताच्या यादीत दुसरं स्थान मिळवलं आहे. ४९ वर्षीय एलन मस्क यांची नेटवर्थ १२७.९ अरब डॉलर्स इतकी झाली आहे. टेस्लाचे शेअर्स उंचावल्याने त्यांचं नेटवर्थ वाढलं आहे. टेस्लाची मार्केट व्हॅल्यू आता ४९१ अरब डॉलरपर्यंत पोहचली आहे. जानेवारी महिन्यात एलन मस्क हे जगातल्या श्रीमंतांच्या यादीत ३५ व्या क्रमांकावर होते. मात्र आता मायक्रोसॉफ्टच्या बिल गेट्सना मागे टाकत एलन मस्क यांनी जगातल्या श्रीमंताच्या यादीत दुसरं स्थान पटकावलं आहे.

जानेवारी महिन्यात ३५ व्या क्रमांकावर होते एलन मस्क

एलन मस्क यांच्या नेटवर्थ १००.३ अरब डॉलर्सची वाढ झाली आहे. ब्लूमबर्ग इंडेक्सच्या माहितीनुसार जानेवारीत मस्क हे श्रीमंताच्या यादीत ३५ व्या स्थानावर होते. आता ते दुसऱ्या क्रमांकावर पोहचले आहेत. या वर्षात आत्तापर्यंत एलन मस्क यांच्या संपत्तीत सर्वाधिक वाढ झाली आहे. ब्लूमबर्ग बिलिनेयर इंडेक्सने दिलेल्या माहितीनुसार शनिवारी १८३ अरब डॉलरच्या संपत्तीसह जेफ बेजोस पहिल्या क्रमांकावर होते. तर १२८ अरब डॉलर्सच्या संपत्तीसह बिल गेट्स दुसऱ्या क्रमांकावर होते. हे स्थान आता एलन मस्क यांनी पटकावलं आहे. १०२ अरब डॉलर्सच्या संपत्तीसह मार्क झुकरबर्ग हे पाचव्या क्रमांकावर आहेत.

आमच्या आणखी बातम्या पाहण्यासाठी क्लिक करा : webnewswala.com आमच्या सर्व बातम्यांसाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | youtube | Sharechat | Copyright © Webnewswala All rights reserved.

Related posts

रिलायन्स : कर्मचारी आणि कुटुंबीयांचे मोफत लसीकरण

Web News Wala

BARC कडून पुढील 12 आठवडे TRP वर बंदी

Team webnewswala

गुगल पे येणार नव्या स्वरूपात

Team webnewswala

Leave a Reply