मनोरंजन सिनेमा

दिवाळीच्या मुहूर्तावर येणार अक्षय कुमार चा लक्ष्मी बॉम्ब

दिवाळीच्या मुहूर्तावर अक्षय कुमार चा लक्ष्मी बॉम्ब हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. अक्षयने नुकतंच ट्विट करत माहिती दिली.

अक्षय कुमार चा बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित चित्रपट ‘लक्ष्मी बॉम्ब’ च्या प्रदर्शनाची तारीख अखेर ठरली आहे. येत्या दिवाळीच्या मुहूर्तावर अक्षय कुमार चा लक्ष्मी बॉम्ब हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. अक्षयने नुकतंच ट्विट करत याबद्दलची माहिती दिली. येत्या ९ नोव्हेंबर रोजी ‘लक्ष्मी बॉम्ब’ हा आगळ्या वेगळ्या विषयाचा चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे.

‘या दिवाळीला तुमच्या घरी लक्ष्मीसोबतच धमाकेदार बॉम्बसुद्धा येईल’, असं म्हणत अक्षयने प्रदर्शनाची तारीख जाहीर केली. ९ नोव्हेंबर रोजी डिस्ने प्लस हॉटस्टार या ओटीटी प्लॅटफॉर्मवर हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. चित्रपटातील अक्षयच्या भूमिकेविषयी फार उत्सुकता आहे. कारण तो एका ट्रान्सजेंडर भूताची भूमिका साकारत असून त्याचा लूकसुद्धा लक्षवेधी आहे.

‘कंचना’ या तामिळ चित्रपटाचा हिंदी रिमेक ‘लक्ष्मी बॉम्ब’

‘लक्ष्मी बॉम्ब’ हा चित्रपट ‘कंचना’ या तामिळ चित्रपटाचा हिंदी रिमेक असल्याचं म्हटलं जात आहे. हा एक हॉरर कॉमेडी चित्रपट आहे. यामध्ये अमिताभ बच्चनसुद्धा भूमिका साकारणार असल्याची चर्चा आहे. राघव लॉरेन्सने चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे.

विशेष म्हणजे या चित्रपटाचे हक्क १२५ कोटी रुपयांना विकल्याचं सांगण्यात येत आहे. त्यामुळे हा चित्रपट प्रदर्शनापुर्वीच मालामाल झाल्याचं म्हटलं जात आहे.

आमच्या आणखी बातम्या पाहण्यासाठी क्लिक करा : webnewswala.com आमच्या सर्व बातम्यांसाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | youtube | Sharechat | Copyright © Webnewswala All rights reserved.

Related posts

सारा आणि वरुणचा ‘कुली नंबर १’ रिलीज डेट जाहिर

Team webnewswala

अभिनेत्री निवेदिता सराफ यांना कोरोनाची लागण

Team webnewswala

इंदू की जवानी मधलं पहिलं गाणं रिलिज

Team webnewswala

Leave a Reply