Team WebNewsWala
आरोग्य राष्ट्रीय समाजकारण

अ‍ॅलोपॅथी वादात अक्षय कुमारची एन्ट्री

अ‍ॅलोपॅथीविरुद्ध आयुर्वेद वादात अभिनेता अक्षय कुमारची एन्ट्री झाली आहे. ही एन्ट्री नक्कीच थेट नाही, पण या प्रकरणात आता तोही पक्षकार नक्कीच बनला आहे.

अ‍ॅलोपॅथी वादात अक्षय कुमारची एन्ट्री 

Webnewswala Online Team – आता अ‍ॅलोपॅथीविरुद्ध आयुर्वेद वादात अभिनेता अक्षय कुमारची एन्ट्री झाली आहे. ही एन्ट्री नक्कीच थेट नाही, पण या प्रकरणात आता तोही पक्षकार नक्कीच बनला आहे. खरे तर, बाबा रामदेव यांनी आपल्या बोलण्याच्या समर्थनार्थ अभिनेत्याचे व्हिडिओ शेअर केले आहेत. यात अक्षयने आयुर्वेदाचे उघडपणे समर्थन केले आहे. त्याने म्हटले आहे, की पारंपरीक भारतीय वैद्यक शास्त्रात असा कुठलाही आजार नाही, ज्यावर उपचार नाही.

अ‍ॅलोपॅथी वादात अक्षय कुमारची एन्ट्री 

बाबा रामदेव आणि अ‍ॅलोपॅथिक डॉक्‍टर यांच्यात सध्या तणावाचे वातावरण आहे. यातच योग गुरूंनी सोमवारी अक्षय कुमारचे व्हिडिओ शेअर करत ट्विट केले आहेत. अक्षयच्या हवाल्याने त्यांनी लिहिले आहे,

‘आपण स्वतःच आपल्या बॉडीचे ब्रँड अ‍ॅम्बेसेडर बना. साधे आणि निरोगी आयुष्य जगा आणि जगाला दाखवून द्या, की आपल्या हिंदुस्तानी योग आणि आयुर्वेदात जे सामर्थ्य आहे, ते कुठल्याही इंग्रजाच्या केमिकल इंजेक्शनमध्ये नाही.

अक्षय कुमार

व्हिडिओमध्ये नेमकं काय म्हणाला अक्षय कुमार ? 

व्हिडिओमध्ये अक्षय कुमार म्हणाला, शरीरात असा एकही आजार नाही, ज्यावर आपल्या पारंपरिक भारतीय वैद्यक शास्त्रात उपचार नाही. देशात आयुष मंत्रालय आहे, जे उपचाराच्या पर्यायी व्‍यवस्‍थेला उत्तेजन देते. अनेक वर्षांपासूनची आपली ही उपचार पद्धती केवल नेच्यूरलच नाही, तर शास्त्रीयदेखील आहे. प्रत्येक उपचाराच्या पाठीशी एक ठोस तर्क आहे. पण, दिव्याखालीच अंधार आहे. बेस्‍ट उपचार देशात आहे. मात्र, आपण तो शोधण्यासाठी बाहेर जातो.

अक्षयने सांगितले, त्याने नुकतेच एका आयुर्वेदिक आश्रमात काही दिवस घालवले. त्या आश्रमात तो एकटाच भारतीय होता. बाकी सर्व जण परदेशातील होते. जर परदेशातील लोक आपल्या देशात बरे होत असतील, तर आपण का नाही? याच वेळी त्याने लोकांना आवाहन केले, की आपण कुण्या एखाद्या आयुर्वेदीक सेंटरचे बँड अ‍ॅम्बेसेडर बनून हे बोलत आहोत, असे कुणीही समजू नये. मी हे सर्व स्वतःच्या बॉडीचा ब्रँड अम्बेसेडर होऊन बोलत आहे, असेही अक्षय म्हणाला. यावेळी लोकांनीही त्यांच्या बॉडीचे ब्रँड अ‍ॅम्बेसेडर व्हावे. साधे आणि निरोगी आयुष्य जगावे. जगाला दाखवावे, की आपल्या भारतीय योग आणि आयुर्वेदात जी शक्ती आहे, ती कुठेही नाही, असेही अक्षय म्हणाला.

अक्षय म्हणाला, आपण भारतीय आपल्या गोष्टींची किंमत केव्हा ओळखणार. परदेशातील लोक येथे येऊन उपचार घेत आहेत. ‘मला अ‍ॅलोपॅथिक उपचार आणि औषधांचा काही प्रॉब्‍लेम नाही. ते त्यांच्या जागी चांगलेच आहे. मात्र, आपण उपचाराची आपली पारंपरीक पद्धत का विसरत आहोत.’

आमिर खानचा एक जुना व्हिडिओही केला शेअर

यातच बाबा रामदेव यांनी अभिनेता आमिर खानचाही एक जुना व्हिडिओ शेअर केला आहे. हा व्हिडिओ टीव्ही शो ‘सत्यमेव जयते’चा आहे. यात डॉ. समित शर्मा यांना जेनेरिक आणि ब्रँडेड औषधी यांतील किंमत आणि फरक समजावताना दाखवले आहे. हा व्हिडिओ पोस्ट करत, मेडिकल माफियांत हिम्मत असेल, तर त्यांनी आमिर खान विरोधात मोर्चा उघडून दाखवा, असे आव्हानही बाबा रामदेव यांनी केले आहे.

Web Title – अ‍ॅलोपॅथी वादात अक्षय कुमारची एन्ट्री ( Akshay Kumar’s entry in the Allopathy controversy )

webnewswala.com च्या Youtube चॅनेल वरील ताज्या बातम्या

आमच्या आणखी बातम्या पाहण्यासाठी क्लिक करा :webnewswala.com आमच्या सर्व बातम्यांसाठी फॉलो करा :फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | youtube | Sharechat | Copyright © Webnewswala All rights reserved.

 

Related posts

पुण्याची ‘सीरम’ आता बनवणार स्फुटनिक V लस

Web News Wala

Laxmi Vilas Bank चं DBS बँकेत विलीनीकरण

cradmin

लवकरच बदलु शकतात ग्रॅच्युईटीचे नियम

Team webnewswala

Leave a Reply