Team WebNewsWala
तंत्रज्ञान राजकारण राष्ट्रीय

अक्साई चीन चीनचा भाग, विकिपीडियाला नकाशा हटवण्याचा आदेश

विकिपीडियाच्या नकाशामध्ये अक्साई चीनला चीनमध्ये दाखवण्यात आले आहे. भारत सरकारने विकिपीडियाला तो नकाशा हटवण्यास सांगितले.

ऑनलाइन एनसायक्लोपीडिया विकिपीडियाच्या साईटवरील नकाशामध्ये अक्साई चीन ला चीनमध्ये दाखवण्यात आले आहे. भारत सरकारने यावर आक्षेप घेतला आहे. सरकारने विकिपीडियाला तो नकाशा हटवण्यास सांगितले आहे. सरकारने विकिपीडियाला पाठवलेल्या पत्रामध्ये अत्यंत कठोर शब्दांचा वापर केला आहे.

इलेक्ट्रॉनिक्स आणि आयटी मंत्रालयाने आयटी कायद्याच्या कलम ६९ अ अंतर्गत विकिपीडियाला तो नकाशा हटवण्याचे निर्देश दिले आहेत. भारत-भूतान संबंधावरील विकिपीडियाच्या पानावर जम्मू-काश्मीरचा नकाशा चुकीच्या पद्धतीने दाखवण्यात आला आहे. एका टि्वटर युझरने विकिपीडियाच्या या चुकीकडे लक्ष वेधले. त्याने सरकारकडे कारवाई करण्याचीही विनंती केली.

विकिपीडियाला नकाशा हटवण्याचा आदेश

या तक्रारीची दखल घेत मंत्रालयाने २७ नोव्हेंबरला विकिपीडियासाठी आदेश जारी केला. विकिपीडियाच्या साईटवरील चुकीचा नकाशा म्हणजे भारताच्या प्रादेशिक अखंडता आणि सार्वभौमत्वाचे उल्लंघन आहे. त्यामुळे तो नकाशा हटवण्यात यावा असे या आदेशात म्हटले होते. विकिपीडियाने ऐकले नाही, तर भारत सरकार कायदेशीर कारवाई करु शकते असे सूत्रांनी सांगितले.

आमच्या आणखी बातम्या पाहण्यासाठी क्लिक करा : webnewswala.com आमच्या सर्व बातम्यांसाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | youtube | Sharechat | Copyright © Webnewswala All rights reserved.

Related posts

कोरोना लसीवर MRP छापायची सक्ती

Web News Wala

आता Paytm वरून पेमेंट करणं महागणार

Team webnewswala

Corona Vaccine या वर्षात उपलब्ध होणार 187 कोटी डोस

Web News Wala

Leave a Reply