ऑटो शहर

नागपुर मुंबई बुलेट ट्रेन साठी हवाई सर्वेक्षण सुरू

मुंबई-नागपूर बुलेट ट्रेन साठी हवाई सर्वेक्षण सुरू करण्यात आलं आहे. नॅशनल हाय स्पीड रेल्वे महामंडळातर्फे हे सर्वेक्षण

नागपुर मुंबई बुलेट ट्रेन साठी हवाई सर्वेक्षण सुरू

नागपूर – नागपूर मुंबई हाय स्पीड रेल कॉरिडॉर म्हणजेच नागपुर मुंबई बुलेट ट्रेन साठी हवाई सर्वेक्षण सुरू करण्यात आलं आहे. नॅशनल हाय स्पीड रेल्वे महामंडळातर्फे हे सर्वेक्षण करण्यात येत आहे. सोमवारी विमानाद्वारे नाशिक ते अकोलादरम्यान हे सर्वेक्षण करण्यात आलं. काल अकोला ते नागपूर दरम्यानचं सर्वेक्षण पार पडलं. आजही हे सर्वेक्षण सुरू राहणार आहे.

लीडार सर्वेक्षणामुळे हे काम तीन ते चार महिन्यात पूर्ण

लाइट डिटेक्शन अँड रेंजिंग म्हणजे लिडार असं या सर्वेक्षणाचं नाव आहे. या सर्वेक्षणामध्ये एकाच विमानात लीडार आणि फोटो किंवा व्हिडिओ घेणारे सेंसर लावलेले असतात. हे विमान हवेतून प्रस्तावित मार्गाचा सर्वे पूर्ण करतं.

नेहमीच्या पद्धतीने हा सर्वे केल्यास त्याला एक वर्षापेक्षा जास्त काळ लागतो मात्र लीडार सर्वेक्षणामुळे हे काम तीन ते चार महिन्यात पूर्ण होणार आहे.

आमच्या आणखी बातम्या पाहण्यासाठी क्लिक करा :webnewswala.com आमच्या सर्व बातम्यांसाठी फॉलो करा :फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | youtube | Sharechat | Copyright © Webnewswala All rights reserved.

Related posts

राज्यसेवा परीक्षा पुढे ढकलण्याचा MPSC चा निर्णय

Team webnewswala

६ जिल्ह्यातील महिलांनी सुरू केली ट्रॅव्हल्स कंपनी

Team webnewswala

ग्रामीण भागात राहणाऱ्या आदिवासींना ओल्या गवतामुळे रोजगार

Team webnewswala

Leave a Reply