Team WebNewsWala
आरोग्य

किती दिवसानंतर ToothBrush बदलावा जाणून घ्या

दररोज सकाळी झोपीतून उठल्यावर आपल्याला सर्वात अगोदर आठवण होते. ती म्हणजे ToothBrush ची कारण जोपर्यंत आपण ब्रश करत नाहीत, तोपर्यंत फ्रेश झाल्यासारखे वाटत नाही.

किती दिवसानंतर ToothBrush बदलावा जाणून घ्या

Webnewswala Online Team – दररोज सकाळी झोपीतून उठल्यावर आपल्याला सर्वात अगोदर आठवण होते. ती म्हणजे ToothBrush ची कारण जोपर्यंत आपण ब्रश करत नाहीत, तोपर्यंत फ्रेश झाल्यासारखे वाटत नाही. बरेच लोक टूथपेस्ट खरेदी करताना अनेक चाैकश्या करतात. मात्र, आपल्याToothBrush  कडे दुर्लक्ष करतात. आपण पाहतो की, आपल्या अजूबाजुला नेहमीच चर्चा होते की, दांतांसाठी कुढले टूथपेस्ट चांगले आहे. मात्र, कधीच टूथब्रशची चर्चा होत नाही. (After how many days should the toothbrush be replaced)

अनेक लोक एक टूथब्रश जवळपास आठ ते दहा महिने वापरतात. जोपर्यंत ब्रश खराब होत नाही, तोपर्यंत ब्रश वापरला जातो. मात्र, ब्रश खराब झाल्यावरच बदलणे चुकीचे आहे. एका विशिष्ट कालावधीपेक्षा जास्त आपण ब्रश वापर असाल तर दात आणि हिरड्यासाठी ते हानिकारक ठरू शकते. आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. एक ब्रश साधारण किती दिवस वापरला पाहिजे.

किती दिवस एक ToothBrush वापरला पाहिजे

द सेंटर्स फॉर डिजिज प्रिवेंशन अँड कंट्रोल यांच्या मते, प्रत्येक व्यक्तीने दर 3 ते 4 महिन्यांनी त्यांचा ब्रश बदलला पाहिजे. याचा अर्थ असा नाही की, ब्रश खराब झाला तरीही आपण वापरला पाहिजे. त्या अगोदर जर आपला ब्रश खराब झाला तर आपण ब्रश बदलावा. शक्यतो चांगल्या कॉलिटीचा ब्रश खरेदी करा. यामुळे आपल्याला 3 ते 4 महिन्यांच्या अगोदर ब्रश बदलण्याची वेळ येणार नाही.

ब्रश बदलण्याचे संकेत

आपण ब्रश करत असताना जर ब्रशच्या ब्रिस्टल्स तुटत असतील तो ब्रश खराब होत आहे, हे आपल्याला समजू शकते. बऱ्याच वेळा ब्रश वाकडा देखील होतो. त्यावेळी आपल्याला वाढते की, पडल्यामुळे वगैरे ब्रश वाकडा झाला असेल. मात्र, तसे नसून आपला ब्रश खराब झाला असल्याचे हे सर्व संकेत आहेत. विशेष करून लहान मुले ब्रश करताना ब्रश चावतात. यामुळे त्यांच्या ब्रशचे ब्रिस्टल्स लवकर तुटतात. याच कारणामुळे लहान मुलांचा ब्रश लवकर खराब होतो.

आजारानंतर बदला ब्रश

कोलगेटच्या वेबसाइटनुसार, जर आपल्याला एखादा आजार झाला असेल आणि त्या आजारामधून आपण बरे झाल्यावर आजारपणात आपण जो ब्रश वापरला होता. तो ब्रश बदलला पाहिजे. कोरोनाच्या काळात बर्‍याच डॉक्टरांनी सल्ला दिला की, कोरोना पॉझिटिव्ह येणा-या रूग्णांनी कोरोना निगेटिव्ह आल्यावर आपला ब्रश सर्वात अगोदर बदलला पाहिजे. कारण ब्रशमध्ये कोरोनाचे जंतू राहण्याची शक्यता असते. या व्यतिरिक्त कोरोनाच्या काळात आपण आपला ब्रश अशा ठिकाणी ठेवला पाहिजे, जिथे दुसरी कोणीही जाणार नाही. आपल्याला सवय असते, घरातील सर्व सदस्यांची ब्रश एकाच जागी ठेवण्याची. मात्र, हे चुकीचे आहे.

Web Title – किती दिवसानंतर ToothBrush बदलावा जाणून घ्या ( After how many days should the toothbrush be replaced )

webnewswala.com च्या Youtube चॅनेल वरील ताज्या बातम्या

आमच्या आणखी बातम्या पाहण्यासाठी क्लिक करा :webnewswala.com आमच्या सर्व बातम्यांसाठी फॉलो करा :फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | youtube | Sharechat | Copyright © Webnewswala All rights reserved.

Related posts

सिनेमागृह, स्विमिंग पूल होणार सुरू आज येणार Unlock 5.0 गाइडलाइन्स

Team webnewswala

रिलायन्स : कर्मचारी आणि कुटुंबीयांचे मोफत लसीकरण

Web News Wala

नारळपाणी सेवनाने करा उन्हाळ्यातील आजारांपासुन बचाव

Web News Wala

1 comment

किती दि&#23... June 9, 2021 at 8:36 pm

[…] दररोज सकाळी झोपीतून उठल्यावर आपल्याला सर्वात अगोदर आठवण होते. ती म्हणजे ToothBrush ची कारण जोपर्यंत आपण ब्रश करत नाही तोपर्यंत फ्रेश झाल्यासारखे वाटत नाही.  […]

Reply

Leave a Reply