Team WebNewsWala
शहर

अहमदाबाद पाठोपाठ मुंबईत सापडला Monolith मोनोलिथ

अहमदाबाद नंतर मुंबईच्या वांद्रे परिसरात 'मोनोलिथ' आढळला. स्थानिकांनी वांद्रे येथील जॉगर्स पार्क परिसरात 'मोनोलिथ' बघितला.

अहमदाबाद पाठोपाठ मुंबईत सापडला Monolith मोनोलिथ

मुंबईः जगातील 30 वेगवेगळ्या शहरांमध्ये दिसल्यानंतर आता मोनोलिथ भारतात सुद्धा आला आहे. हे स्ट्रक्चर अहमदाबादच्या थलतेज परिसरातील सिम्फनी पार्कमध्ये आढळले आहे. यास मिस्ट्री मोनोलिथ सुद्धा म्हटले जाते. मोनोलिथ(monolith) एक स्टीलचे स्ट्रक्चर आहे. याची उंची 6 फुटपेक्षा जास्त आहे. मात्र, हे जमीनीत गाडल्याची कोणतीही खुण दिसत नाही. आश्चर्यकारक गोष्ट ही आहे की, येथे काम करणार्‍या माळ्याला सुद्धा याबाबत काहीही माहित नाही.

नगरसेवक आसिफ झकारिया यांनी ‘मोनोलिथ’चे फोटो केले ट्वीट

स्थानिकांनी ‘मॉर्निंग वॉक’ करताना वांद्रे येथील जॉगर्स पार्क परिसरात ‘मोनोलिथ’ बघितला. वांद्रे येथील नगरसेवक आसिफ झकारिया यांनी ‘मोनोलिथ’चे फोटो ट्वीट केले. (After Ahmedabad, monolith mysteriously appears in Mumbai park)

माळी आसाराम सांगतात की, ते एक वर्षापासून येथे काम करत आहेत. जेव्ह ते सायंकाळी येथून घरी गेले तेव्हा पार्कमध्ये हे स्ट्रक्चर नव्हते. सकाळी परत ड्यूटीवर आले तेव्हा हे स्टीलचे स्ट्रक्चर येथे दिसले. नंतर त्यांनी गार्डन मॅनेजरला याबाबत माहिती दिली. अजूनपर्यंत हे समजलेले नाही की, हे मोनोलिथ कुठून आले.

त्रिकोणी स्टीलच्या स्ट्रक्चरवर काही नंबर सुद्धा

त्रिकोणी स्टीलच्या स्ट्रक्चरवर काही नंबर सुद्धा लिहिलेले आहेत. पार्कमध्ये येणारे लोक यास मोठ्या उत्सुकतेने पहात आहेत. याच्यासोबत फोटो काढत आहेत. या स्टीलच्या मोनोलिथवर एकदम वर एक सिम्बॉलसुद्धा आहे. मोनोलिथला अनेक लोक मिस्ट्री स्टोनच्या नावाने सुद्धा ओळखतात.

जगात सुमारे 30 देशांमध्ये दिसले मोनोलिथ

आतापर्यंत जगात सुमारे 30 देशांमध्ये हे दिसले आहे. सर्वप्रथम अमेरिकेच्या उटाहमध्ये दिसले होते. यानंतर रोमानिया, फ्रान्स, पोलंड, यूके आणि कोलंबियामध्ये दिसले होते. भारतात हे पहिल्यांदा दिसत आहे. याबाबत जगभरात वेगवेगळ्या थेअरीज आहेत. काही लोक हे एलियनचे काम असल्याचे सांगत आहेत.

हमदाबादच्या थलतेज परिसरातील सिम्फनी पार्कमध्ये मोनोलिथ

आश्चर्यकारक गोष्ट ही आहे की, ज्या पार्कमध्ये हे दिसले आहे, ते अहमदाबाद म्युनसिपल कॉर्पोरेशन आणि सिम्फनी कंपनीने एकत्रित पब्लिक-प्रायव्हेट पार्टनरशिपमध्ये बनवले होते. परंतु, हे मोनोलिथ कुठून आले याची माहिती कॉर्पोरेशनच्या अधिकार्‍यांना नाही आणि सिम्फनी कंपनीच्या लोकांनाही याबाबत काहीच माहित नाही.

मोनोलिथ’ म्हणजे सोप्या भाषेत अखंड दगडी स्तंभ. ‘मोनोलिथ’चा वापर प्राचीन काळी मोठ्या वास्तू निर्मितीसाठी केला जात होता. पण काळानुरुप बांधकामाच्या तंत्रज्ञानात बदल झाला. ‘मोनोलिथ’चा मानवी जीवनात होणारा वापर थांबला.

आमच्या आणखी बातम्या पाहण्यासाठी क्लिक करा :webnewswala.comआमच्या सर्व बातम्यांसाठी फॉलो करा :फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | youtube | Sharechat | Copyright © Webnewswala All rights reserved.

Related posts

ओल्या कचऱ्यापासून खतनिर्मिती बंद केलेल्या संकुलांना नोटीस

Team webnewswala

MumUni School of Thoughts – समाजाचे ऋण फेडण्याचा प्रयत्न

Team webnewswala

गणेश नाईक यांनी थोपटले CIDCO विरुद्ध दंड

Web News Wala

Leave a Reply