Team WebNewsWala
शहर

मुंबई लोकल कधी सुरू होणार आदित्य ठाकरे यांचे स्पष्टीकरण

मुंबई लोकल कधी सुरू होणार आदित्य ठाकरे यांचे स्पष्टीकरण राज्यात करोना लाटेचा प्रभाव कमी झाला असून अनलॉकची प्रक्रिया चालू करण्यात आली.

मुंबई लोकल कधी सुरू होणार आदित्य ठाकरे यांचे स्पष्टीकरण

Webnewswala Online Team – राज्यात करोना लाटेचा प्रभाव कमी झाला असून त्यापार्श्वभूमीवर अनलॉकची प्रक्रिया चालू करण्यात आली. यासंदर्भातील आदेश शनिवारी (५ जून) मध्यरात्रीनंतर जारी करण्यात आले. नवीन आदेशानुसार सोमवारपासून पाच टप्प्यांमध्ये महाराष्ट्रात अनलॉक झाले. अनलॉकच्या प्रक्रियेत मुंबई शहर तिसऱ्या गटात येत असल्याचे महापौर किशोरी पेडणेकर यांनी स्पष्ट केले होते.

लोकल कधी सुरु होणार ?

अशातच लोकल कधी सुरु होणार ? हा प्रश्न मुंबईकरांना पडला असून आहे. याबाबत आज पत्रकरांशी बोलतांना महाराष्ट्र राज्याचे पर्यावरणमंत्री आणि शिवसेना युवा सेनेचे अध्यक्ष आदित्य ठाकरे मुंबईची लाइफ लाईन असलेल्या लोकल ट्रेनसंदर्भातही भाष्य केले.

ते म्हणाले,’करोनाचे आकडे कमी झाल्यानंतर आम्ही असे वागू लागलो, की आता कोरोना संपलाच आहे.

मात्र, लोकल ट्रेनसंदर्भात बोलायचे, तर हा निर्णय आम्ही आता घेऊ शकत नाही. प्रत्येक निर्णयापूर्वी, आम्हाला वैद्यकीय तज्ज्ञांचे मत जाणून घ्यावे लागेल. यासंदर्भात जेव्हा मेडिकल टास्क फोर्स सांगेल, तेव्हाच यावर निर्णय घेतला येईल.’ असेही आदित्य ठाकरे यांनी स्पष्ट केले आहे.

Web Title – मुंबई लोकल कधी सुरू होणार आदित्य ठाकरे यांचे स्पष्टीकरण ( Aditya Thackeray’s explanation when Mumbai Local will start )

webnewswala.com च्या Youtube चॅनेल वरील ताज्या बातम्या

आमच्या आणखी बातम्या पाहण्यासाठी क्लिक करा :webnewswala.com आमच्या सर्व बातम्यांसाठी फॉलो करा :फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | youtube | Sharechat | Copyright © Webnewswala All rights reserved.

Related posts

अतिवृष्टीमुळे मुळे कोसळली विजयदुर्ग किल्ल्याची भिंत

Team webnewswala

महाड दुर्घटनाग्रस्तांना मदतीचा हात देणाऱ्या संस्थांचा पालकमंत्र्यांच्या हस्ते सत्कार

Team webnewswala

कोविड 19 जनजागृती अभियान अंतर्गत ऑनलाइन विचारमंथन

Team webnewswala

1 comment

मुंबई ल&#23... June 9, 2021 at 8:10 pm

[…] मुंबई लोकल कधी सुरू होणार आदित्य ठाकरे यांचे स्पष्टीकरण राज्यात करोना लाटेचा प्रभाव कमी झाला असून अनलॉकची प्रक्रिया चालू करण्यात आली.  […]

Reply

Leave a Reply