Team WebNewsWala
Other राजकारण राष्ट्रीय शहर समाजकारण

पद्म पुरस्कार समिती अध्यक्षपदी आदित्य ठाकरे

पद्म पुरस्कारांसाठी मान्यवरांच्या नावांची शिफारस करण्यासाठी समितीच्या अध्यक्षपदी राज्याचे पर्यटन, पर्यावरण मंत्री अदित्य ठाकरे यांची नियुक्ती करण्यात आली. 

केंद्र सरकारकडून दिल्या जाणाऱ्या पद्म पुरस्कारांसाठी मान्यवरांच्या नावांची शिफारस करण्यासाठी राज्य सरकारने एक समिती स्थापन केली आहे. या पद्म पुरस्कार समिती अध्यक्षपदी राज्याचे पर्यटन, पर्यावरण आणि राजशिष्टाचार मंत्री आदित्य ठाकरे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

केंद्र सरकारतर्फे दरवर्षी हे पुरस्कार; कला, साहित्य, विज्ञान, शिक्षण, उद्योग, क्रीडा, वैद्यक, सामाजिक सेवा इत्यादी क्षेत्रात उल्लेखनीय काम केलेल्या व्यक्तींना देऊन त्यांच्या कार्याचा गौरव केला जातो.

याच नावांची शिफारस करण्यासंदर्भातील काम या समितीच्या माध्यमातून केलं जातं. यंदा या समितीचे अध्यक्षपद आदित्य ठाकरेंना देण्यात आलं आहे. या नियुक्तीनंतर त्यांचे अभिनंदन करणारे ट्विट शिवसेनेचे आमदार आणि महाराष्ट्र राज्याचे कार्यकारी अध्यक्ष राज्य नियोजन मंडळाचे कॅबीनेट मंत्री राजेश क्षीरसागर यांनी केलं आहे.

राजेश क्षीरसागर यांनी, “वेगवेगळ्या क्षेत्रात अतिउत्कृष्ट कामगिरी बजावलेल्या मान्यवरांची पद्म पुरस्कारासाठी शिफारस करण्यासाठी समिती गठीत करण्यात आली आहे. या समितीच्या अध्यक्षपदी पर्यटन, पर्यावरण आणि राजशिष्टाचार मंत्री आदित्य ठाकरे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. अभिनंदन आदित्य ठाकरे साहेब,” असं ट्विट करत या नियुक्तीबद्दल आदित्य यांना शुभेच्छा दिल्या आहेत.

नक्की वाचा >> 
बिग बॉस मुळे रातोरात पालटलं शहनाज गिलचं नशीब 
सुशांतच्या आयुष्यावर आधारित Suicide or Murder चा फर्स्ट लूक रिलीज 
चित्रपटाची कमाई जाणून तुम्हाला काय करायचंय ? पंकज त्रिपाठी 

राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनाही ट्विटवरुन या समितीमध्ये निवड झालेल्यांचे अभिनंदन केलं आहे.

कोण कोण आहे या समितीमध्ये?

आदित्य ठाकरे हे पद्म पुरस्कार समितीचे अध्यक्ष असून या समितीमध्ये पाच कॅबिनेट मंत्री, दोन राज्यमंत्री, प्रधान सचिव, मुख्य राजशिष्टाचार अधिकारी अशा एकूण नऊ जणांचा समावेश आहे. यामध्ये उद्योगमंत्री सुभाष देसाई, पशुसंवर्धन मंत्री सुनील केदार, वैद्यकीय शिक्षण आणि सांस्कृतिक कार्य मंत्री अमित देशमुख, उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत, सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे, राज्यमंत्री उद्योग अदिती तटकरे, राज्यमंत्री सार्वजनिक बांधकाम दत्तात्रय भरणे यांचा सदस्य म्हणून समावेश करण्यात आला आहे.  प्रधान सचिव आणि मुख्य राजशिष्टाचार अधिकारी या दोघांचीही या समितीमध्ये सदस्य सचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

आमच्या आणखी बातम्या पाहण्यासाठी क्लिक करा : webnewswala.com आमच्या सर्व बातम्यांसाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | Youtube | Sharechat | Copyright © Webnewswala All rights reserved.

Related posts

MumUni School Of Thoughts च्यावतीने अण्णा भाऊ साठे यांना मानवंदना

Team webnewswala

अहमदाबाद पाठोपाठ मुंबईत सापडला Monolith मोनोलिथ

Web News Wala

फेक ओळखपत्र, मीरा चोप्रा नाहीतर 21 श्रीमंतांच्या पोरांनी घेतली लस

Web News Wala

Leave a Reply