Team WebNewsWala
Other मनोरंजन

अभिनेत्री निवेदिता सराफ यांना कोरोनाची लागण

'अग्गंबाई सासूबाई' फेम अभिनेत्री निवेदिता सराफ यांना ोरोना विषाणूची लागण झाल्याचं सांगण्यात येत आहे. त्यामुळे त्यांना क्वारंटाईन करण्यात आलं

‘अग्गंबाई सासूबाई’ फेम अभिनेत्री निवेदिता सराफ यांना देखील कोरोनाची लागण झाली आहे.

काही दिवसांपूर्वी निवेदिता सराफ यांना कोरोना विषाणूचे सौम्य लक्षणं असल्याचं जाणवू लागलं होतं. अखेर त्यांना कोरोना विषाणूची लागण झाल्याचं सांगण्यात येत आहे. त्यामुळे त्यांना क्वारंटाईन करण्यात आलं आहे. त्यांच्यावर उपचार देखील सुरू आहेत.

व्हायरसची झळ सर्व सामान्य जनतेसह सेलिब्रिटींना देखील

देशात कोरोना रुग्णांच्या संख्येत दिवसागणिक वाढ होताना दिसत आहे. या धोकादायक व्हायरसची झळ सर्व सामान्य जनतेसह सेलिब्रिटींना देखील बसली आहे. आतापर्यंत अनेक कलाकारांनी कोरोना व्हायरसवर मात केली आहे. देशातील एकूण कोरोनाबाधितांचा आकडा आता ५६ लाखांच्याही पार गेला आहे. तर आता ‘अग्गंबाई सासूबाई’ फेम अभिनेत्री निवेदिता सराफ यांना देखील कोरोनाची लागण झाली आहे.

दरम्यान कोरोना व्हायरसचा वाढता प्रादुर्भाव पाहाता लॉकडाऊन अंतर्गत सरकारने शुटिंगसाठी बंदी घातली होती. त्यानंतर अनलॉक प्रक्रियेच्या माध्यमातून सेटवर योग्य ती खबरदारी बाळगून  मालिका, चित्रपटांची शुटिंग सुरू करण्यास सरकारने परवानगी दिली.

आमच्या आणखी बातम्या पाहण्यासाठी क्लिक करा : webnewswala.com आमच्या सर्व बातम्यांसाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | youtube | Sharechat | Copyright © Webnewswala All rights reserved.

Related posts

‘Tarzan’ फेम Joe Lara चा विमान अपघातात मृत्यू

Web News Wala

विरोधकांकडून मोदींचा वाढदिवस बेरोजगार दिवस घोषित

Team webnewswala

पश्चिम रेल्वेवर 7 AC लोकल प्रवाशांच्या सेवेत

Team webnewswala

Leave a Reply