Team WebNewsWala
क्राईम तंत्रज्ञान राष्ट्रीय समाजकारण

5 G प्रकरणी अभिनेत्री ‘जुही चावला’ ला 20 लाखांचा दंड

मोबाइलच्या 5 G तंत्रज्ञानाला विरोध करणारी अभिनेत्री जुही चावला हिने केलेली याचिका दिल्ली उच्च न्यायालयाने शुक्रवारी फेटाळून लावली. तसेच जुही चावला हिला २० लाख रुपयांचा दंडही ठोठावला आहे.

5 G प्रकरणी अभिनेत्री ‘जुही चावला’ ला 20 लाखांचा दंड

Webnewswala Online Team – मोबाइलच्या 5 G तंत्रज्ञानाला विरोध करणारी अभिनेत्री जुही चावला हिने केलेली याचिका दिल्ली उच्च न्यायालयाने शुक्रवारी फेटाळून लावली. स्वत:ला प्रसिद्धी मिळावी यासाठी जुहीने ही याचिका केली असल्याचे व त्यामुळे न्याययंत्रणेचा महत्त्वाचा वेळ वाया गेल्याचे ताशेरे न्यायालयाने ओढले आहेत. तसेच जुही चावला हिला २० लाख रुपयांचा दंडही ठोठावला आहे.

तंत्रज्ञानाला विरोध नाही

जुही चावला हिने नुकतेच म्हटले होते की, आधुनिक तंत्रज्ञानाला माझा विरोध नाही. मात्र 5 G तंत्रज्ञानाने पर्यावरणाची हानी होणार नाही हे मोबाइल कंपन्यांनी पटवून दिले पाहिजे. मी 5 G च्या विरोधात नाही, मात्र हे तंत्रज्ञान मानवी आरोग्यास अपायकारक आहे की नाही याबाबत सरकारने भूमिका स्पष्ट केली पाहिजे.

कोर्टाचा विचार आहे की त्याचा प्रसिद्धी स्टंट आहे

मोबाइल टॉवरच्या विकिरणांमुळे पर्यावरण तसेच मानवी आरोग्याला धोका आहे असा दावा अभिनेत्री जुही चावला गेल्या काही वर्षांपासून करत आहे. तसेच या तंत्रज्ञानाविरोधात तिने कायम विरोधाची भूमिका घेतली आहे. तिने 5 G तंत्रज्ञानाविरोधात दिल्ली उच्च न्यायालयाकडे दाद मागितली होती. याचिका फेटाताना न्यायालयाने म्हटले आहे की, 5 G विरोधातील याचिका जुही चावला हिने केलेली याचिका हा पब्लिसिटी स्टंट आहे. याचिका करण्याआधी जुही चावलाने हिने सरकारकडे हा प्रश्न का मांडला नाही ? 5 G तंत्रज्ञानाविरोधात जुही हिचे म्हणणे सरकारने ऐकले नाही ? असे घडले आहे का? सरकारने तुमच्या हक्कावर गदा आणल्याचा प्रकार घडला आहे का? अशा प्रश्नांची सरबत्ती न्यायालयाने केली.

Web Title – 5 G प्रकरणी अभिनेत्री ‘जुही चावला’ ला 20 लाखांचा दंड ( Actress Juhi Chawla fined Rs 20 lakh in 5G case )

webnewswala.com च्या Youtube चॅनेल वरील ताज्या बातम्या

आमच्या आणखी बातम्या पाहण्यासाठी क्लिक करा :webnewswala.com आमच्या सर्व बातम्यांसाठी फॉलो करा :फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | youtube | Sharechat | Copyright © Webnewswala All rights reserved.

 

Related posts

हिंमत असेल, तर आमीर खान विरुद्ध मोर्चा काढा

Web News Wala

True Caller ला टक्कर देणार गुगल आणले भन्नाट फीचर

Team webnewswala

Covid Center मध्ये आरोग्य कर्मचाऱ्यांचा गरबा Video Viral

Team webnewswala

Leave a Reply