Team WebNewsWala
शहर

डोंबिवली महानगर गॅस वहिनीसाठी खोदकाम करताना दुर्घटना

महानगर गॅस वाहिनीसाठी खोदकाम करताना विजवाहक केबल तुटल्याने खोदकामच्या ठिकाणी स्फोट झाले.त्यामुळे जवळच असलेल्या दोन ट्रान्सफॉर्मला आग

महानगर गॅस वहिनीसाठी खोदकाम करताना दुर्घटना.

डोंबिवली – महानगर गॅस वाहिनीसाठी खोदकाम करताना विजवाहक केबल तुटल्याने खोदकामच्या ठिकाणी स्फोट झाले. त्यामुळे जवळच असलेल्या दोन ट्रान्सफॉर्मला आग लागल्याची घटना सोमवारी दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास डोंबिवली पूर्वेकडील गांधीनगर येथील महावीर हॉस्पिटलसमोर घडली.या घटनेची माहिती मिळताच अग्निशमक दलाची एक गाडी घटनास्थळी दाखल झाली.

यावेळी अग्नीशमक दलाच्या जवानांनी काही वेळातच आगीवर नियंत्रण मिळवले.मानपाडा पोलीस बिटमार्शल सदर ठीकाणी जात असताना त्यांना ट्रान्सफॉर्मला आग लागल्याचे दिसले. मानपाडा बिटमार्शलच्या सतर्कतेमुळे मोठी घटना टळली असल्याने अश्या पोलिसांचे परिसरातील नागरिकांनी आभार मानले.तर ट्रान्सफॉर्मला आग विझवली असली तरी उन्हाळ्यात चार ते पाच परिसरातही वीजपुरवठा खंडित करण्यात आली होती.

महावितरण कंपनी सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून काळजी घेत नसल्याचे दिसून आले

यावेळी अग्निशमक दलाच्या जवानांनी महानगर गॅस गॅस वाहिनीसाठी खोदकाम करताना विजवाहक केबल तुटल्याने खोदकामच्या ठिकाणी स्फोर्ट झाल्याचे सांगितले. तर घटनास्थळी महानगर गॅस कंपनीच्या एका ठेकेदाराने मात्र यावर आपली बाजू मांडण्यास नकार दिला.तर घटनास्थळी आलेले कामा संघटनेचे अध्यक्ष देवेन सोनी यांनी महावितरण कंपनीने विजवाहिनी सिमेंटच्या बंदीस्त पाईपमधून टाकली पाहिजे असे सांगितले.

तर सुरक्षिततेची कोणतीही काळजी घेतली जात नसल्याने महावितरण कंपनी आणि महानगर गॅस कंपनीने सुरक्षिततेची काळजी घेतली घेणे आवश्यक आहे असे नागरिकांचे म्हणणे आहे.दरम्यान लॉकडाउनच्या काळात भरमसाठ बिले आकारणाऱ्या महावितरण कंपनी सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून काळजी घेत नसल्याचे यावरून दिसून आले

महानगर गॅस वहिनीसाठी खोदकाम करताना दुर्घटना

आमच्या आणखी बातम्या पाहण्यासाठी क्लिक करा :webnewswala.com आमच्या सर्व बातम्यांसाठी फॉलो करा :फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | youtube | Sharechat | Copyright © Webnewswala All rights reserved.

Related posts

सी लिंक आणि एक्सप्रेस वे वर १०० टक्के FastTag सुरू

Web News Wala

डिझायनर कारप्रेमींना धक्का, दिलीप छाबरियाला अटक

Web News Wala

रायगड किल्ल्याचा रोपवे अडचणीत बेस स्टेशनवर औकिरकर कुटुंबाचा दावा

Team webnewswala

Leave a Reply