Team WebNewsWala
Other नोकरी पर्यावरण शहर

बंदीनंतरच्या दीड महिन्यात जाळ्यात मुबलक मासळी

बंदीनंतरच्या दीड महिन्यात जाळ्यात मुबलक मासळी मिळाल्याने सातपाटी, अर्नाळा, वसई, उत्तन येथील कोळीबांधवांनी समाधान व्यक्त केले आहे.

बंदीनंतरच्या दीड महिन्यात जाळ्यात मुबलक मासळी मिळाल्याने सातपाटी, अर्नाळा, वसई, उत्तन येथील कोळीबांधवांनी समाधान व्यक्त केले आहे.

पापलेटची मोठी आवक

पालघर : करोनाकाळात मासेमारी बंद असल्याने तसेच या नव्या हंगामात खराब हवामानामुळे १५ ऑगस्टपर्यंत मासेमारीस अडचणी येत असल्याने अनेक मच्छीमारांसमोर आर्थिक संकट उभे राहिले होते. मात्र त्यानंतर दीड महिन्यात जाळ्यात मुबलक मासळी पापलेट व इतर मासे मिळाल्याने सातपाटी, अर्नाळा, वसई, उत्तन येथील कोळीबांधवांनी समाधान व्यक्त केले आहे.

बंदीनंतरच्या दीड महिन्यात जाळ्यात मुबलक मासळी मिळाल्याने सातपाटी, अर्नाळा, वसई, उत्तन येथील कोळीबांधवांनी समाधान व्यक्त केले आहे.

करोनाकाळात मासेमारी जवळपास ठप्प झाली होती. व्यवहार पूर्ववत करण्याच्या टप्प्यात खलाशांच्या संख्येवर र्निबध ठेवून मासेमारीस परवानगी  देण्यात आली होती. असे असले तरी बहुतेक मच्छीमारांना या काळात प्रत्यक्षात मासेमारी करता आली नव्हती.

गेल्या वर्षीच्या मासेमारी हंगामात आर्थिक संकटाला सामोरे जावे लागले

१ ऑगस्टपासून मासेमारी हंगाम पुन्हा सुरू झाले. मात्र, या काळात मुसळधार पाऊस आणि वादळी वातावरणामुळे मासेमारी दोन आठवडे बंद ठेवावी लागली होती. या दरम्यानच्या काळात खलाशी व इतर साहित्य बोटीवर असल्याने मच्छीमारांना आर्थिक संकटाला सामोरे जावे लागले. त्यापूर्वी गेल्या वर्षीच्या मासेमारी हंगामात खराब हवामान, चक्रीवादळ व नंतर करोनामुळे मासेमारी बंद राहिल्याने सुमारे ७० टक्के मच्छीमारांची कर्ज फेडणे शक्य झाले नव्हते.

या हंगामात माशाची आवक मोठय़ा प्रमाणात

मासेमारी हंगाम बहुसंख्य मच्छीमारांचे भवितव्य ठरणार होते. ऑगस्टच्या दुसऱ्या आठवडय़ात बहुतांश मच्छीमारांनी मासेमारीला प्रत्यक्ष सुरू केली. या हंगामात चांगला मोबदला देणाऱ्या पापलेट माशाची आवक मोठय़ा प्रमाणात झाल्याने बहुतांश मच्छीमारांचे प्रलंबित कर्ज फेडणे शक्य झाले आहे. मासेमारीच्या अवघ्या दीड महिन्याच्या कार्यकाळात गेल्या वर्षभराच्या कारकीर्दीत मिळणाऱ्या उत्पन्न इतके मासे मिळाले आहेत.

मासेमारी बंदीचा कार्यकाळ तीन महिन्यांचा ठेवण्याची मागणी

बंदीनंतरच्या दीड महिन्यात जाळ्यात मुबलक मासळी मिळाल्याने सातपाटी, अर्नाळा, वसई, उत्तन येथील कोळीबांधवांनी समाधान व्यक्त केले आहे.

मच्छीमारांची राष्ट्रीय संघटना तसेच महाराष्ट्र मच्छीमार कृती समिती इत्यादी संघटनांनी मासेमारी बंदीचा कार्यकाळ १५ मे ते १५ ऑगस्ट असा तीन महिन्यांचा ठेवण्याची मागणी अनेक वर्षांपासून केली होती. असे असताना राज्य शासन आले प्रथम ७५ दिवस व नंतर ६० दिवसांवर मासेमारी बंदीचा काळ कमी केला आहे. त्यामुळे नवीन हंगामात मासेमारी सुरू केल्यावर लहान आकाराच्या पापलेट मासे मिळू लागले होते.

पापलेट मच्छीमारांचा तारक

पापलेट हा उत्तर कोकणातील मच्छीमारांना मिळणारा महत्त्वपूर्ण मासा असून त्याच्या विशिष्ट चवीमुळे या माशाला बाजारात चांगली मागणी आहे. मध्यम ते मोठय़ा आकाराचा हा मासा ८०० ते १२०० रुपये किलो या दराने विकला जात असल्याने आणि त्याची आवक मच्छीमारांना झाल्याने चांगलं उत्पन्न मिळत आहे. नोव्हेंबपर्यंत पापलेट माशाची आवक मोठय़ा प्रमाणात असते. त्यानंतर मिळणाऱ्या माशांच्या किमती पापलेटच्या तुलनेत कमी असल्याने, पापलेटची मासेमारी अर्थकारणाच्या दृष्टिकोनातून महत्त्वपूर्ण ठरत असते.

आमच्या आणखी बातम्या पाहण्यासाठी क्लिक करा : webnewswala.com आमच्या सर्व बातम्यांसाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | youtube | Sharechat | Copyright © Webnewswala All rights reserved.

Related posts

सोमवार पासून अनलॉक सरकारने जारी केली नवी नियमावली

Web News Wala

चिनी बँकेची बजाज फायनान्स मध्ये मोठी गुंतवणूक

Team webnewswala

धोपेश्वर सचिव मनोहर भगवान नवरे यांचा अजब कारभार माहिती अधिकार बाबत अज्ञान

Team webnewswala

Leave a Reply