Team WebNewsWala
आंतरराष्ट्रीय

2 अब्ज लशींपैकी 60 टक्के लशी अमेरिका, चीन, भारतात वितरित

Corona Vaccine देशाला चालू वर्षात मिळून करोनावरील लसींचे सुमारे 187 कोटी डोस उपलब्ध होऊ शकतील. त्यातून सर्व प्रौढांचे लसीकरण पूर्ण होण्याचा विश्‍वास

2 अब्ज लशींपैकी 60 टक्के लशी अमेरिका, चीन, भारतात वितरित

Webnewswala Online Team – जगभरातील कोविड-19 च्या परिस्थितीवर नजर ठेवून असलेल्या जागतिक आरोग्य संघटनेने (World Health Organization WHO) शुक्रवारी आतापर्यंतचा लेखाजोखा मांडला. त्यासाठी WHO चे प्रमुख टेड्रोस घेब्रेयेसुस आणि ब्रुस अलवर्ड यांनी पत्रकार परिषद घेतली. संघटनेचे सदस्य असलेल्या देशांमध्ये सार्वजनिक आरोग्यासंबंधी उपक्रम राबवणं आणि आरोग्यासंबंधी विषयांचं नियमन करणं हे या संघटनेच्या अनेक कामांपैकी एक आहे. त्यामुळे या कामाचा आढावाही अधिकारी अधूनमधून घेतात आणि तो मांडत असतात.

पत्रकार परिषदेत अलवर्ड म्हणाले, ‘या आठवड्यापर्यंत आपण जगभरात 2 अब्ज लशींच्या डोसचं वितरण केलं आहे. बहुतेक लवकरच आपण लशींच्या वितरणाची संख्या आणि कोविड-19 च्या नव्याने विकसित झालेल्या लशींच्या संख्येच्या बाबतीत एक मैलाचा दगड गाठू. सध्याच्या 2 अब्ज लशींचे डोस 212 देशात वितरित करण्यात आले आहेत. यापैकी 75 टक्के डोस 10 देशांमध्ये वितरित झाले असून त्यापैकी 60 टक्के डोस हे चीन, अमेरिका आणि भारतात वितरित झाले आहेत. ‘

ते पुढे म्हणाले, ‘जगभरातील 127 देशात कोविड-19 लशीचे डोस पोहोचवण्याबरोबरच ज्या देशांना लशी मिळणंच आव्हानात्मक होतं अशा देशांमध्ये लशी पोहोचवून तिथलं लसीकरण सुरू करण्यामध्ये COVAX ने खूप महत्त्वाची भूमिका बजावली आहे. एकीकडे या चांगल्या गोष्टी घडत असताना दुसरीकडे जगाच्या एकूण लोकसंख्येच्या 10 टक्के लोकसंख्या राहत असलेल्या गरीब देशात केवळ 0.5 टक्केच कोविड-19 लशीचे डोस पोहचले आहेत. निम्न मध्यम वर्ग राहत असलेल्या देशात लशींचं वितरण होण्याचं प्रमाण अगदी थोडं जास्त आहे.’

Web Title – 2 अब्ज लशींपैकी 60 टक्के लशी अमेरिका, चीन, भारतात वितरित ( About 60 per cent of the 2 billion vaccines are distributed in the US, China and India )

webnewswala.com च्या Youtube चॅनेल वरील ताज्या बातम्या

आमच्या आणखी बातम्या पाहण्यासाठी क्लिक करा :webnewswala.com आमच्या सर्व बातम्यांसाठी फॉलो करा :फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | youtube | Sharechat | Copyright © Webnewswala All rights reserved.

Related posts

आयपीएलच्या 13 व्या हंगामाचे संपूर्ण वेळापत्रक

Team webnewswala

सौदी ने बदलला पाकिस्तान चा भुगोल POK आणि गिलगिट-बाल्टिस्तान ला नकाशातून हटवलं

Team webnewswala

पाकिस्तानचा चीनला मोठा झटका चीनच्या अ‍ॅपवर घातली बंदी

Team webnewswala

Leave a Reply